मुंबईत लसीकरणाला दुसऱ्या दिवशीही ब्रेक, खासगी रुग्णालयात मात्र साठा उपलब्ध – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

मुंबईत लसीकरणाला दुसऱ्या दिवशीही ब्रेक, खासगी रुग्णालयात मात्र साठा उपलब्ध

मुंबई – कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी ब्रेक लागला आहे. पुरेसा लस साठ्याअभावी उद्या गुरुवारीही मुंबईतील शासकीय आणि महानगरपालिका केंद्रांवर लसीकरण बंद राहणार असल्याचे मुंबई महापालिका प्रशासनाच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे. मात्र खाजगी रुग्णालयामध्ये लसीकरण सुरळीततपणे चाललेले पाहायला मिळते. गेल्या काही दिवसांपासून पुरेशा प्रमाणात लसपुरवठा होत नसल्याने लसीकरणात सातत्याने अडथळे येत असल्याचे सांगितले जात आहे.
लसीचे डोस नसल्याने लसीकरण केंद्रावर गोंधळ पाहायला मिळत आहे. अनेक तास थांबूनही लस मिळत नसल्याने नागरिकांची कोंडीही झाली आहे. काहींना दुसऱ्या डोसची मुदत संपून लस मिळत नसल्याच्या तक्रारीही पुढे आल्या आहेत. कोविड-19 प्रतिबंध लसीकरण मोहिमेतंर्गत बृहन्मुंबई महानगरपालिकेला आज रात्री उशिरा पर्यंत लससाठा प्राप्त होणार आहे. त्याचं वितरण उद्या दिवसभरात सर्व शासकीय आणि महानगरपालिका केंद्रांना करण्यात येणार आहे.
महानगरपालिकेला, कोविशिल्डचे 50 हजार तर कोवॅक्सिनचे 11 हजार 200 असे एकूण 61 हजार 200 डोस प्राप्त होणार आहेत. हा लससाठा उपलब्ध झाल्यानंतर त्याचे उद्या दिवसभरात वितरण केलं जाईल. त्यामुळे उद्या 22 जुलै 2021 मुंबईत लसीकरण होणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. पण, शुक्रवारी म्हणजे 23 जुलैला मुंबईतील शासकीय आणि महानगरपालिका केंद्रांवर लसीकरण सुरू होणार आहे. मुंबईकर नागरिकांनी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असं आवाहन करण्यात आलं आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

CoronaUpdate: बरे झालेल्या रुग्णांपेक्षा नव्या कोरोनाबाधितांची संख्या अधिक, मृतांचाही आकडा वाढतोय

मुंबई – राज्यात गेल्या २४ तासांत ८ हजार १५९ नव्या कोरोनाबाधितांची नोंंद झाली आहे. तर ७ हजार ८३९ बाधित कोरोनामुक्त झाले आहेत. तर गेल्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

मुंबईत लसीकरणाला दुसऱ्या दिवशीही ब्रेक, खासगी रुग्णालयात मात्र साठा उपलब्ध

मुंबई – कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी ब्रेक लागला आहे. पुरेसा लस साठ्याअभावी उद्या गुरुवारीही मुंबईतील शासकीय आणि महानगरपालिका केंद्रांवर लसीकरण...
Read More
post-image
विदेश

पाकिस्तानमध्ये करोना डेल्टाचे थैमान, रुग्णालयात उपचारासाठी जागाच नाही!

इस्लामाबाद – पाकिस्तानमध्येही कोरोनाच्या संसर्गाने थैमान घातले आहे. भारतात आढळलेल्या कोरोना डेल्टा वेरिएंट पाकिस्तानमध्ये फैलावत आहे. कराचीमधील रुग्णालयांमध्ये बाधितांवर उपचार करण्यासाठी जागा अपुरी पडत...
Read More
post-image
महाराष्ट्र मुंबई

खबरदारी घेऊ, पण यंदा दहीहंडी साजरी करणार; मनसेने ठोकला शड्डू

ठाणे – कोरोना संकट आल्यामुळे राज्यात सर्व सण आणि उत्सवांवर गेल्या वर्षापासून बंधने आली आहेत. दहीहंडीवरही गेल्यावर्षी गंडांतर आले होते. पण यावेळी मनसेने मात्र...
Read More
post-image
महाराष्ट्र

ऐकावे ते नवलच! विहिरीला लागले गरम पाणी, गावकऱ्यांचा जादुटोण्यावर संशय

बुलढाणा – बुलढाणा जिल्ह्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या एका गावातील विहिरीतून गेल्या चार ते पाच दिवसांपासून गरम पाणी निघत असल्याने गावासह परिसरात कुतूहल निर्माण झालं...
Read More