मराठी चित्रपटाचं डबिंग लंडनच्या स्टुडिओत, सुव्रतने घेतला क्रेझी अनुभव – eNavakal
मनोरंजन

मराठी चित्रपटाचं डबिंग लंडनच्या स्टुडिओत, सुव्रतने घेतला क्रेझी अनुभव

कोरोना विषाणू संसर्गामुळे अनेकांना वेगवेगळ्या प्रकारच्या अनुभवांना सामोरं जावं लागलं. पण अभिनेता सुव्रत जोशीनं एक क्रेझी अनुभव घेतला. लॉकडाऊनपूर्वी चित्रीत केलेल्या ‘गोष्ट एका पैठणी’ची या चित्रपटाचं त्याचं राहिलेलं डबिंग त्यानं चक्क लंडनमध्ये पूर्ण केलं. गंमत म्हणजे या डबिंगवेळी दिग्दर्शक शंतनू रोडे ‘झूम’द्वारे ऑनलाइन उपस्थित असायचे, तर लंडनमधील डबिंग स्टुडिओतील तंत्रज्ञ बांगलादेश आणि पोलंडचे होते.

वाचा – अगं बाई! नेहा कक्कर ‘या’ गायकासोबत लग्न करणार?

प्लॅनेट मराठी, गोल्डन रेशो फिल्म्सनं, लेकसाईड प्रोडक्शनने ‘गोष्ट एका पैठणीची’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. अक्षय बर्दापूरकर, अभयानंद सिंग आणि चिंतामणी दगडे हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. शंतनू गणेश रोडे यांनी चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटात सायली संजीव, सुव्रत जोशी, शशांक केतकर, मिलिंद गुणाजी आदी कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत.

“गोष्ट एका पैठणीची’ या चित्रपटाचं चित्रीकरण लॉकडाऊनपूर्वीच पूर्ण झालं होतं. शासनाने अनलॉकिंग सुरू केल्यावर चित्रपटाच्या डबिंगची प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्यानुसार बाकी सर्व कलाकारांचं डबिंग पूर्ण झालं. मात्र सुव्रत लंडनमध्ये अडकल्यानं त्याला मुंबईत येऊन डबिंग करणं शक्य नव्हतं. अखेर तंत्रज्ञानामुळे या अडचणींवर मार्ग निघाला असे चित्रपटाचे निर्माते अक्षय बर्दापूरकर यांनी सांगितले.

वाचा – बिग बॉस 14 : अभिनेता सिद्धार्थ शुक्ला जखमी

लंडनमध्ये डबिंग करण्याविषयी सुव्रत म्हणाला, की माझ्या नाटकाच्या दौऱ्यासाठी मी अमेरिकेला गेलो होतो. पण कोरोना संसर्गामुळे दौरा स्थगित करावा लागल्यानं मी लंडनला गेलो. त्यामुळे माझं गोष्ट एका पैठणी चित्रपटाचं डबिंग करता येत नव्हतं. निर्माते अक्षय बर्दापूरकर यांनी धाडसी निर्णय घेऊन मला लंडनमध्ये डबिंग करायला सांगितलं. त्यानुसार लंडनमध्ये एक स्टुडिओ शोधला आणि डबिंग पूर्ण केलं. या डबिंगसाठी दिग्दर्शक शंतनू रोडे झूमद्वारे ऑनलाइन उपस्थित असायचे. पण स्टुडिओतल्या तंत्रज्ञांपैकी एक जण बांगलादेशातील आणि एक जण पोलंडमधील होते. त्यांना मराठी येण्याचा प्रश्नच नव्हता. त्यामुळे भाषेचा अडथळा येत होता. पण त्यातूनही डबिंग उत्तम पद्धतीने झाले हा अनुभव खरोखरच क्रेझी होता.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
मनोरंजन

मराठी चित्रपटाचं डबिंग लंडनच्या स्टुडिओत, सुव्रतने घेतला क्रेझी अनुभव

कोरोना विषाणू संसर्गामुळे अनेकांना वेगवेगळ्या प्रकारच्या अनुभवांना सामोरं जावं लागलं. पण अभिनेता सुव्रत जोशीनं एक क्रेझी अनुभव घेतला. लॉकडाऊनपूर्वी चित्रीत केलेल्या ‘गोष्ट एका पैठणी’ची...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

पती-पत्नीमध्ये जोरदार भांडण! स्कायवॉकवरच पत्नीने घातला पतीच्या डोक्यात पेव्हर ब्लॉक

मुंबई – काही दिवसांपूर्वी भर रस्त्यात भांडण करणाऱ्या पत्नीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. आता त्याहीपेक्षा भयंकर घटना घडली असून एका पत्नीने वांद्रे पूर्व...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

पंपोरमध्ये हल्ला! दहशतवाद्यांच्या गोळीबारात सीआरपीएफचे दोन जवान शहीद

श्रीनगर – एकीकडे जग कोरोनाविरोधात लढत असताना दुसरीकडे भारताच्या सीमांना शेजारील देशांशी आणि दहशतवाद्यांशी सामना करावा लागत आहे. गेल्या काही दिवासंपासून काश्मीरचे खोरे पुन्हा...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

आताच सोने खरेदी करा! किंमती घसरल्या, दिवाळीत वाढण्याची शक्यता

नवी दिल्ली – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुकारलेल्या लॉकडाऊनच्या काळात सोन्याची किंमत ५५ हजार पार गेली होती. सोने-चांदीच्या किंमतीत सतत चढ-उतार पाहायला मिळत असतानाच सोन्याच्या किंमतीत...
Read More
post-image
मनोरंजन

प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी येतोय ‘फ्री हिट दणका’, नव्या चित्रपटाची घोषणा

मुंबई – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेली चित्रपटसृष्टी हळू हळू पूर्वपदावर येत आहे. लॉकडाऊननंतर प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी पुन्हा मनोरंजन सृष्टी उभी राहत आहे. याच गोष्टीला लक्षात घेऊन...
Read More