चंद्रमुखीच्या चित्रिकरणाला सुरुवात, सिनेमाचा मुहूर्त सोहळा संपन्न – eNavakal
मनोरंजन

चंद्रमुखीच्या चित्रिकरणाला सुरुवात, सिनेमाचा मुहूर्त सोहळा संपन्न

सुरुवातीपासून ज्या मराठी सिनेमाची चर्चा सर्वत्र रंगली आणि केवळ सिनेमाच्या शीर्षकावरून सिनेमाप्रती उत्सुकता वाढली तो सिनेमा म्हणजे  ‘चंद्रमुखी’.  काही दिवसांपूर्वी प्रसाद ओक यांचा  ‘चंद्रमुखी’ सिनेमा हा महाराष्ट्र सरकारने सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून आखून दिलेल्या नियमांचे पालन करूनच ऑन फ्लोर जाणार ही आनंदाची बातमी  प्रेक्षकांना देण्यात आली होती. आणि आता या सिनेमाच्या मुहूर्त सोहळ्यामुळे ‘चंद्रमुखी’ सिनेमा पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनला आहे. 

‘प्लॅनेट मराठी’चे अक्षय बर्दापूरकर आणि ‘गोल्डन रेशो फिल्म्स’चे पियूष सिंह यांची निर्मिती असलेल्या ‘चंद्रमुखी’ सिनेमाचा मुहूर्त सोहळा नुकताच पार पडला आणि यावेळी या सिनेमाचे दिग्दर्शक प्रसाद ओक, निर्माते अक्षय बर्दापूरकर, पियूष सिंह, संगीतकार अजय-अतुल उपस्थित होते. सिनेमाचा मुहूर्त सोहळा म्हणजे आता चित्रीकरणाला सुरुवात होणार याचाच अर्थ असा की लवकरच संपूर्ण महाराष्ट्राला ‘चंद्रमुखी’ नावामागे कोणाचा चेहरा आहे हे समजणार. अर्थात त्यासाठी प्रेक्षकांना अजून काही क्षणांची प्रतिक्षा करावी लागेल.

प्रसिद्ध लेखक विश्वास पाटील यांच्या ‘चंद्रमुखी’ या कादंबरीवर आधारित हा सिनेमा आहे. या सिनेमात चिन्मय मांडलेकर यांची पटकथा, संजय मेमाणे यांची सिनेमॅटोग्राफी,  निलेश वाघ यांचं कला दिग्दर्शन पाहायला, अनुभवयाला मिळणार आहे आणि ब-याच वर्षांनी अजय-अतुल यांचं अस्सल मातीतलं संगीत ऐकण्याची संधी देखील मिळणार आहे.

मुहूर्ताच्या वेळी दिग्दर्शक राजेश मापुस्कर आणि  फॅशन डिझायनर विक्रम फडणीस उपस्थित होते. या चित्रपटाची कथा एका स्त्री भोवती फिरते जी समाजात चालणा-या अपारंपारिक मार्गावर स्वत:च्या वास्तवतेचा शोध घेते. चित्रपटाची कथा सांगण्यास आम्ही उत्साही आहोत, पण त्याच वेळी विश्वास पाटील यांची बेस्टसेलरची सत्यता टिकवून ठेवण्याची देखील मोठी जबाबदारी आहे. मराठी चित्रपटसृष्टीला आणखी उंचीवर नेण्याचे आश्वासन या चित्रपटाने दिले आहे.”

प्लॅनेट मराठी आणि गोल्डन रेशो फिल्म्स् निर्मित या चित्रपटात प्रसाद ओक यांचे दिग्दर्शन, चिन्मय मांडलेकर यांची पटकथा, संजय मेमाणे यांची सिनेमॅटोग्राफी,  निलेश वाघ यांचं कला दिग्दर्शन पाहायला, अनुभवयाला मिळणार आहे आणि ब-याच वर्षांनी अजय-अतुल यांचं अस्सल मातीतलं संगीत ऐकण्याची संधी देखील मिळणार आहे. मुहूर्ताच्या वेळी दिग्दर्शक राजेश मापुस्कर आणि  फॅशन डिझायनर विक्रम फडणीस उपस्थित होते.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
मनोरंजन

चंद्रमुखीच्या चित्रिकरणाला सुरुवात, सिनेमाचा मुहूर्त सोहळा संपन्न

सुरुवातीपासून ज्या मराठी सिनेमाची चर्चा सर्वत्र रंगली आणि केवळ सिनेमाच्या शीर्षकावरून सिनेमाप्रती उत्सुकता वाढली तो सिनेमा म्हणजे  ‘चंद्रमुखी’.  काही दिवसांपूर्वी प्रसाद ओक यांचा  ‘चंद्रमुखी’...
Read More
post-image
News आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राजकीय

शेतकऱ्यांना मोठा दिलासा, आचारसंहितेतही मिळणार राज्य सरकारची मदत

मुंबई – यंदा कोरोनासोबत अवकाळी आणि अतिवृष्टी पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. शेतकऱ्यांना सणासुदीच्या काळात मदत मिळावी म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १० हजार...
Read More
post-image
News आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राजकीय

शरद पवार उद्धव ठाकरेंच्या भेटीला, वर्षा बंगल्यात कोणत्या विषयावर होणार चर्चा?

मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची आज सायंकाळी भेट होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’...
Read More
post-image
News आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राजकीय

या आत्महत्यांची जबाबदारी सरकार घेणार का? देवेंद्र फडणवीसांचा सवाल

मुंबई – लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवा देणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना गेल्या तीन महिन्यांपासून वेतनच मिळालेले नाही. एसटी महामंडळाचे आर्थिक बजेट कोलमडल्याने कर्मचाऱ्यांना पगार देणं कठीण...
Read More
post-image
News आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राजकीय

जळगावनंतर रत्नागिरी आगारातही एसटी वाहकाची आत्महत्या

रत्नागिरी – गेल्या तीन महिन्यांपासून वेतन थकल्यामुळे जळगावमध्ये एसटी कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच आता रत्नागिरीतही एसटीच्या वाहकाने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. पांडुरंग...
Read More