रितेश देशमुख पुन्हा एकदा मराठी चित्रपटात, प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर करणार दिग्दर्शन – eNavakal
मनोरंजन

रितेश देशमुख पुन्हा एकदा मराठी चित्रपटात, प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर करणार दिग्दर्शन

ताल, परदेस, कहो ना प्यार है, वेल कम बॅक आदी चित्रपटांचे चित्रिकरणाची धुरा सांभाळलेले कबीर लाल आता एका मराठी चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत. अदृश्य असं या चित्रपटाचं नाव असून या चित्रपटात अभिनेता रितेश देशमुख पुन्हा एकदा मराठी चित्रपटात पहायला मिळणार आहे. तसेच, त्याच्यासोबत पुष्कर जोग, मंजिरी फडणीससुद्धा आहेत.

विशेष बाब म्हणजे कबीर लाल आणि रितेश देशमुख २० वर्षानंतर पहिल्यांदा काम करत आहेत, रितेशचा पहिला सिनेमा तुझे मेरी कसमचे सिनेमॅटोग्राफर कबीर लाल हे होते. या विषयी रितेश म्हणतो मी चित्रपटांत काम करतो याचे कारण कबीर लाल हेच आहेत … सुभाष घई यांच्या चित्रपटाच्या सेटवर शूटिंग बघायला मी गेलो होतो, त्यावेळेस माझी आणि कबीर लाल यांची भेट झाली. कदाचित त्यावेळीच त्यांना असे वाटले असेल की मला ऍक्टर बनायचे आहे, पुढे तुझे मेरी कसम चित्रपटासाठी त्यांनी माझे नाव सुचवले आणि त्याच फिल्मने माझ्या फिल्मी करिअरला सुरवात झाली.

रितेश पुढे म्हणतो २० वर्षांनंतर पुन्हा एकदा कबीर लाल यांच्या सोबत काम करतांना मला खूप छान वाटत आहे आणि ते मराठी फिल्मचे दिग्दर्शन करत आहेत आणि त्याचा मी भाग आहे हि गोष्ट माझ्यासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे. पुष्कर जोग आणि मंजरी फडणीस यांच्या सह सौरभ गोखले , अनंत जोग , अजय कुमार सिंह हे अभिनेते या चित्रपटात आहेत. साहिद लाल यांनी या चित्रपटाच्या सिनेमॅट्रोग्राफीची धुरा सांभाळली आहे, लवली वर्ल्ड एंटरटेनमेंट या बॅनर खाली चित्रपटाची निर्मिती अजय कुमार सिंह यांनी केली आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
मनोरंजन

रितेश देशमुख पुन्हा एकदा मराठी चित्रपटात, प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर करणार दिग्दर्शन

ताल, परदेस, कहो ना प्यार है, वेल कम बॅक आदी चित्रपटांचे चित्रिकरणाची धुरा सांभाळलेले कबीर लाल आता एका मराठी चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत. अदृश्य...
Read More
post-image
विदेश

कोरोनानंतर चीनमध्ये पूराचे थैमान; २५ ठार, २ लाख नागरिकांचे स्थलांतर

बिजिंग: आधीच कोरोनाने घातलेले थैमान आणि त्यातून झालेले देशाचे अनेक प्रकारचे नुकसान यातून चीन कुठेतरी सावरताना दिसत असतानाच चीनसमोर पुन्हा एक नवीन संकट आवासून...
Read More
post-image
महाराष्ट्र मुंबई

ठाण्याची तहान भागवणारं बारवी धरण ५२ टक्के भरले

ठाणे –   दमदार पावसामुळे ठाणेकरांची तहान भागवणारं बारवी धरण 52 टक्के भरले आहे. या धरणाची पाणीपातळी 65.80 मीटरवर पोहोचली आहे. आणखी काही दिवस पाऊस असाच बरसत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

CoronaUpdate: बरे झालेल्या रुग्णांपेक्षा नव्या कोरोनाबाधितांची संख्या अधिक, मृतांचाही आकडा वाढतोय

मुंबई – राज्यात गेल्या २४ तासांत ८ हजार १५९ नव्या कोरोनाबाधितांची नोंंद झाली आहे. तर ७ हजार ८३९ बाधित कोरोनामुक्त झाले आहेत. तर गेल्या...
Read More
post-image
मनोरंजन महाराष्ट्र

राज कुंद्राच्या कार्यालयातील सर्व्हर पोलिसांच्या हाती

मुंबई – पॉर्न फिल्म बनविल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या राज कुंद्राच्या कार्यालयातील सर्व्हर पोलिसांच्या हाती लागला आहे. या सर्व्हरच्या माध्यमातून अ‍ॅप आणि दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर पोर्नोग्राफिक...
Read More