नवश्या गणपती मंदिरात जितेंद्र आव्हाडांनी केली आरती, कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

नवश्या गणपती मंदिरात जितेंद्र आव्हाडांनी केली आरती, कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

नाशिक – कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील धार्मिक स्थळे बंद आहेत. मात्र असे असतानाही महाविकास आघाडीतील नेते आणि राज्‍याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्‍हाड यांनी गंगापूर रोडवरील नवश्‍या गणपती मंदिरात रविवारी देवदर्शन घेत आरती केली. कोरोना प्रतिबंधक नियम मोडल्याने जितेंद्र आव्हाड यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने एप्रिल महिन्यातच धार्मिक स्थळे बंद करण्यात आली होती. हा नियम सामान्यांपासून ते सर्वांसाठी लागू असतानाही जितेंद्र आव्हाड यांनी देवदर्शन करून आरती केली. या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर त्यांच्यावर टीका होऊ लागली. त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निर्बंधांचे पालन न करणाऱ्या पाच जणांविरोधात गंगापूर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.  आव्हाड यांनी त्र्यंबकेश्वर येथेही भेट दिली होती. तेथे मात्र पोलिसांनी कारवाई केलेली नाही.

मनाई आदेश असताना, नियमांचे पालन न केल्‍याने हवालदार एस. एन. बच्‍छाव यांच्‍या फिर्यादीवरून हा गुन्‍हा दाखल झाला आहे. योगेश नामदेव दराडे, स्‍वप्‍नील प्रभाकर चिंचोले, (रा. अश्‍विननगर, सिडको), विक्रांत उल्‍लास सांगळे, संतोष पांडुरंग काकडे, आनंद बाळीबा घुगे (रा. मोरवाडी गाव, सिडको) अशी संशयितांची नावे आहेत. नियमांचे उल्‍लंघन करत देवदर्शन करताना मंत्री जितेंद्र आव्‍हाड पोलिसांच्‍या कारवाईपासूनही बचावले आहेत.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

नवश्या गणपती मंदिरात जितेंद्र आव्हाडांनी केली आरती, कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

नाशिक – कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील धार्मिक स्थळे बंद आहेत. मात्र असे असतानाही महाविकास आघाडीतील नेते आणि राज्‍याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्‍हाड यांनी गंगापूर रोडवरील...
Read More
post-image
देश

ऐतिहासिक निर्णय! कर्नाटकातील सरकारी नोकऱ्यांमध्ये आता तृतीयपंथीयांना १ टक्का आरक्षण

बंगळुरू – सरकारी नोकऱ्यांमध्ये तृतीयपंथीयांना १ टक्का आरक्षण देणार असल्याची माहिती कर्नाटक सरकारने कर्नाटक उच्च न्यायालयात बुधवारी दिली आहे, अशा प्रकारचे आरक्षण ठेवणारे कर्नाटक हे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

रावसाहेब दानवेंचा क्लास लावू, पण आधी मराठा आरक्षण द्या; संजय राऊत यांची टीका

नवी दिल्ली – रावसाहेब दानवे यांची शिकवणी लावू. त्यांची शिकवणी लावून मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार असेल तर तेही करू. इथे माझ्यापासून दोन पावलांवरच आमचे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना लॉकडाऊनमधून सूट द्या, अजित पवार करणार मुख्यमंत्र्यांकडे मागणी

पुणे – कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरत असली तरीही धोका अद्यापही टळलेला नाही. त्यामुळे राज्यातील निर्बंध अद्यापही उठवण्यात आलेले नाहीत. त्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित...
Read More
post-image
मनोरंजन

प्राजक्ता माळीचा ‘प्राजक्तप्रभा’ काव्यसंग्रह रसिकांच्या भेटीला   

प्राजक्ताचे नाव काढताच समोर येतात ती मंद सुगंधाची, मन प्रफुल्लित करणारी मोहक फुले. जुलै महिन्यात ही फुले बहरून येतात आणि त्याचा सुगंध सर्वत्र दरवळू...
Read More