दहशतवाद्यांनी दानिशच्या मृतदेहाची विटंबना करत मृत्यूनंतर त्याचे डोके गाडीखाली चिरडले, अफगाणी कमांडरचा खुलासा – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश

दहशतवाद्यांनी दानिशच्या मृतदेहाची विटंबना करत मृत्यूनंतर त्याचे डोके गाडीखाली चिरडले, अफगाणी कमांडरचा खुलासा

नवी दिल्ली – पुलित्‍जर पुरस्‍कार विजेते फोटो जर्नालिस्ट दानिश सिद्दीकी यांच्या मृत्यूबाबत एक भयानक सत्य समोर आले आहे. आतापर्यंत दानिश सिद्दीकी यांचा मृत्यू अफगाण सैन्य आणि तालिबान यांच्यात झालेल्या चकमकीदरम्यान झाल्याचे बोलले जात होते. मात्र दानिश सिद्दीकी यांना फक्त गोळीच मारण्यात आली नाही, तर तालिबानच्या दहशतवाद्यांनी त्यांचे डोके कारखाली चिरडल्याचे सांगण्यात येत आहे. अर्थात दानिश यांची हत्या करून मृत्युंनतरही त्यांच्या मृतदेहही वाईट कृत्य केले, अशी माहिती अफगाण सैन्याचा प्रमुख बिलाल अहमद यांनी एका वृत्तवाहिनीला दली.

दरम्यान, १६ जुलै रोजी अफगाण सैन्याने पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या स्पिन बोल्दक शहरावरील बाजारपेठेवर पुन्हा नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांची तालिबानशी चकमक झाली. या चकमकीत एका अफगान अधिकाऱ्यासह दानिश सिद्दीकी यांचा मृत्यू झाला, अशी माहिती देण्यात आली होती. मात्र एका वृत्तावाहिनीने अफगाण सैन्याचे कमांडर बिलाल अहमद यांच्याशी बातचीत केली. त्यांनी सांगितल्यानुसार, तालिबानने दानिशच्या मृतदेहासोबत वाईट कृत्य केले. अहमद यांनी पुढ सांगितले की, तालिबानच्या दहशतवाद्यांनी आधी दानिश सिद्दीकी यांना गोळी मारली, त्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर अतिरेक्यांना समजले की दानिश भारतीय आहेत. तालिबान भारताचा राग करतात म्हणून त्यांनी दानिशच्या मृतदेहाची विटंबना केली. मृत्यू झाल्यानंतरही दहशतवाद्यांनी दानिश यांच्या डोक्यावर गाडी चढवली आणि त्यांचे डोके चिरडले, अशी माहिती अफगाण कमांडर बिलाल अहमद यांनी दिली.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र

तलवारीने हल्ला झालेल्या रामदास आखाडे यांचे निधन

पुणे – पुण्यातील गारवा हॉटेलचे मालक रामदास आखाडे यांचे आज पहाटे निधन झाले. रविवारी त्यांच्यावर हल्ला झाल्यानंतर पुण्यातील जहांगीर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

दहशतवाद्यांनी दानिशच्या मृतदेहाची विटंबना करत मृत्यूनंतर त्याचे डोके गाडीखाली चिरडले, अफगाणी कमांडरचा खुलासा

नवी दिल्ली – पुलित्‍जर पुरस्‍कार विजेते फोटो जर्नालिस्ट दानिश सिद्दीकी यांच्या मृत्यूबाबत एक भयानक सत्य समोर आले आहे. आतापर्यंत दानिश सिद्दीकी यांचा मृत्यू अफगाण...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

नवश्या गणपती मंदिरात जितेंद्र आव्हाडांनी केली आरती, कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

नाशिक – कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील धार्मिक स्थळे बंद आहेत. मात्र असे असतानाही महाविकास आघाडीतील नेते आणि राज्‍याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्‍हाड यांनी गंगापूर रोडवरील...
Read More
post-image
देश

ऐतिहासिक निर्णय! कर्नाटकातील सरकारी नोकऱ्यांमध्ये आता तृतीयपंथीयांना १ टक्का आरक्षण

बंगळुरू – सरकारी नोकऱ्यांमध्ये तृतीयपंथीयांना १ टक्का आरक्षण देणार असल्याची माहिती कर्नाटक सरकारने कर्नाटक उच्च न्यायालयात बुधवारी दिली आहे, अशा प्रकारचे आरक्षण ठेवणारे कर्नाटक हे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

रावसाहेब दानवेंचा क्लास लावू, पण आधी मराठा आरक्षण द्या; संजय राऊत यांची टीका

नवी दिल्ली – रावसाहेब दानवे यांची शिकवणी लावू. त्यांची शिकवणी लावून मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार असेल तर तेही करू. इथे माझ्यापासून दोन पावलांवरच आमचे...
Read More