अनिल देशमुखांच्या याचिकेवर गुरूवारी उच्च न्यायालयाचा निर्णय  – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

अनिल देशमुखांच्या याचिकेवर गुरूवारी उच्च न्यायालयाचा निर्णय 

मुंबई – माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सीबीआयच्या एफआयआरविरोधात केलेल्या याचिकेचा मुंबई उच्च न्यायालय उद्या गुरुवारी निर्णय देणार आहे. या एफआयआरमध्ये सीबीआयने देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहे. तर सीबीआय जाणीवपूर्वक, राजकीय हेतूने आरोप करत असून कायदेशीर तरतुदींचे पालन करत नसल्याचे या याचिकेतून देशमुखांनी स्पष्ट केले.

अनिल देशमुखांच्या याचिकेवरील सुनावणी मुंबई उच्च न्यायालयामध्ये सोमवारी पूर्ण झाली. या याचिकेत अनिल देशमुखांनी म्हटले आहे की, आपल्याविरोधात कोणतेही पुरावे तपास यंत्रणेकडे नाहीत. सीबीआयने केवळ राजकीय सूडापोटी आपल्याविरोधात एफआयआर घेतली आहे. या कथित आरोपांमागील मुख्य सूत्राधार असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांची नावे एफआयआरमध्ये का घेतली नाहीत? त्यांचा सीबीआय काहीच तपास का करत नाही? असे सवाल या याचिकेतून उपस्थित केले आहेत. मात्र, देशमुखांचे हे सारे आरोप बिनबुडाचे असून तपास यंत्रणा याप्रकरणाची सखोल चौकशी करत आहे, सर्व बाजूंनी चौकशी करून तपास सुरू असल्याचा दावा सीबीआयच्यावतीने करण्यात आला. सोमवारी दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर उच्च न्यायालयाने या याचिकेचा निर्णय गुरुवारी देण्यात येईल, असे सांगितले.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

अनिल देशमुखांच्या याचिकेवर गुरूवारी उच्च न्यायालयाचा निर्णय 

मुंबई – माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सीबीआयच्या एफआयआरविरोधात केलेल्या याचिकेचा मुंबई उच्च न्यायालय उद्या गुरुवारी निर्णय देणार आहे. या एफआयआरमध्ये सीबीआयने देशमुख यांच्यावर...
Read More
post-image
महाराष्ट्र

तलवारीने हल्ला झालेल्या रामदास आखाडे यांचे निधन

पुणे – पुण्यातील गारवा हॉटेलचे मालक रामदास आखाडे यांचे आज पहाटे निधन झाले. रविवारी त्यांच्यावर हल्ला झाल्यानंतर पुण्यातील जहांगीर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

दहशतवाद्यांनी दानिशच्या मृतदेहाची विटंबना करत मृत्यूनंतर त्याचे डोके गाडीखाली चिरडले, अफगाणी कमांडरचा खुलासा

नवी दिल्ली – पुलित्‍जर पुरस्‍कार विजेते फोटो जर्नालिस्ट दानिश सिद्दीकी यांच्या मृत्यूबाबत एक भयानक सत्य समोर आले आहे. आतापर्यंत दानिश सिद्दीकी यांचा मृत्यू अफगाण...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

नवश्या गणपती मंदिरात जितेंद्र आव्हाडांनी केली आरती, कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

नाशिक – कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील धार्मिक स्थळे बंद आहेत. मात्र असे असतानाही महाविकास आघाडीतील नेते आणि राज्‍याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्‍हाड यांनी गंगापूर रोडवरील...
Read More
post-image
देश

ऐतिहासिक निर्णय! कर्नाटकातील सरकारी नोकऱ्यांमध्ये आता तृतीयपंथीयांना १ टक्का आरक्षण

बंगळुरू – सरकारी नोकऱ्यांमध्ये तृतीयपंथीयांना १ टक्का आरक्षण देणार असल्याची माहिती कर्नाटक सरकारने कर्नाटक उच्च न्यायालयात बुधवारी दिली आहे, अशा प्रकारचे आरक्षण ठेवणारे कर्नाटक हे...
Read More