खबरदारी घेऊ, पण यंदा दहीहंडी साजरी करणार; मनसेने ठोकला शड्डू – eNavakal
महाराष्ट्र मुंबई

खबरदारी घेऊ, पण यंदा दहीहंडी साजरी करणार; मनसेने ठोकला शड्डू

ठाणे – कोरोना संकट आल्यामुळे राज्यात सर्व सण आणि उत्सवांवर गेल्या वर्षापासून बंधने आली आहेत. दहीहंडीवरही गेल्यावर्षी गंडांतर आले होते. पण यावेळी मनसेने मात्र दहीहंडी उत्सवासाठी शड्डू ठोकला आहे. मनसे नेते अभिजीत पानसे यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर यांची घोषणा केली आहे. कोरोनाचे सर्व नियम पाळत आणि योग्य खबरदारी घेऊन 31 ऑगस्टला विश्‍वविक्रमी दहीहंडी साजरी करणार असल्याचे पानसे यांनी म्हटले आहे.

अभिजीत पानसे यांनी फेसबुकवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, यंदा 31 ऑगस्टला दहीहंडी साजरी करणार आहोत. त्यासाठी अनेक मंडळांना आवाहन केले आहे. कोरोना लसीचे दोन्ही डोस घेऊन दहीहंडी उत्सवात सामील व्हा आणि आपला मराठी सण एकत्र येऊन आनंदाने साजरा करा. यावेळी त्यांनी ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांचेही नाव नमूद केले आहे. मनसेच्या या आवाहनामुळे आता जोरदार चर्चा रंगू लागली आहे. त्यामुळे राज्य सरकार, स्थानिक प्रशासन आणि पोलीस याबाबत काय निर्णय घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र मुंबई

खबरदारी घेऊ, पण यंदा दहीहंडी साजरी करणार; मनसेने ठोकला शड्डू

ठाणे – कोरोना संकट आल्यामुळे राज्यात सर्व सण आणि उत्सवांवर गेल्या वर्षापासून बंधने आली आहेत. दहीहंडीवरही गेल्यावर्षी गंडांतर आले होते. पण यावेळी मनसेने मात्र...
Read More
post-image
महाराष्ट्र

ऐकावे ते नवलच! विहिरीला लागले गरम पाणी, गावकऱ्यांचा जादुटोण्यावर संशय

बुलढाणा – बुलढाणा जिल्ह्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या एका गावातील विहिरीतून गेल्या चार ते पाच दिवसांपासून गरम पाणी निघत असल्याने गावासह परिसरात कुतूहल निर्माण झालं...
Read More
Uncategoriz

लोकल सेवेबाबत आठवडाभरात निर्णय घ्या, भाजपाचा आंदोलनाचा इशारा

  मुंबई : . कोरोनाचे दोन डोस घेतलेल्यांना उपनगरीय लोकल सेवा सुरु करण्याबाबत राज्य सरकारने आठवड्याभरात निर्णय घ्यावा अन्यथा भाजपच्यावतीने तीव्र आंदोलन केलं जाईल...
Read More
post-image
देश विदेश

२६/११ हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाला भारताकडे सोपवा, बायडन प्रशासनाचा कोर्टाला प्रस्ताव

वॉशिंग्टन – मुंबईवर २००८ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सहभागाचा आरोप असलेला तहव्वूर राणा याला भारताकडे सोपवावे, असा प्रस्ताव अमेरिकेच्या बायडन प्रशासनाने लॉस एंजेलिस न्यायालयाकडे...
Read More
post-image
मनोरंजन

“झिम्माड” रिफ्रेशिंग अनुभव देणारा अमृता नातूचा नवा म्युझिक व्हिडिओ

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसानं सगळीकडे आता हिरव्या रंगाची उधळण आणि वातावरण प्रसन्न झालं आहे. या प्रसन्न वातावरणासारखच आनंद देणारं, “झिम्माड” हे श्रवणीय...
Read More