मेट्रो ३ मार्गावरील महालक्ष्मी मेट्रो स्थानकाच्या भूयारीकरणाचा टप्पा पूर्ण – eNavakal
मुंबई

मेट्रो ३ मार्गावरील महालक्ष्मी मेट्रो स्थानकाच्या भूयारीकरणाचा टप्पा पूर्ण

मुंबई – मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनद्वारे (मुं.मे.रे.कॉ) कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-३ मार्गावरील महालक्ष्मी मेट्रो स्थानकावर भुयारीकरणाचा ३९ वा टप्पा यशस्वीरित्या पार पडला. रॉबिन्स बनावटीच्या टनेल बोरिंग मशीन तानसा-२ द्वारे सायन्स म्यूझियम मेट्रो स्थानक ते महालक्ष्मी मेट्रो स्थानक हा अप-लाईन मार्गाचा १११७.५ मी. भुयारीकरणाचा टप्पा एकूण ७४५ रिंग्सच्या साहाय्याने २५७ दिवसात पूर्ण करण्यात आला.

”सायन्स म्युझियम ते महालक्ष्मी स्थानक दरम्यान भुयारीकरण आव्हानात्मक होते. या टप्प्यातील भुयारीकरण ८० वर्षांपेक्षा जास्त जुन्या इमारतींच्या आणि पश्चिम रेल्वेच्या महालक्ष्मी आणि लोअर परेल स्थानकांच्या दरम्यान थेट रेल्वेमार्गाच्या खालून करण्यात आले आहे. अतिशय जिकिरीचे हे कार्य आमच्या टीमने कौशल्यपूर्णरित्या पार पाडले आहे, ‘ असे मुं.मे.रे.कॉचे व्यवस्थापकीय संचालक रणजित सिंह देओल यांनी सांगितले.

मेट्रो-३ मार्गिकेतील पॅकेज-३ मध्ये पाच स्थानके असून हा या मार्गिकेतील सर्वात लांब टप्पा आहे. या अंतर्गत मुंबई सेंट्रल, महालक्ष्मी, सायन्स म्यूझियम, आचार्य अत्रे चौक आणि वरळी मेट्रो स्थानकांचा समावेश आहे. आतापर्यंत या पॅकेज अंतर्गत तीन भुयारीकरणाचे टप्पे पूर्ण झाले आहेत.

पॅकेज-३ च्या भुयारीकरणाचा तपशील पुढील प्रमाणे:-

१) सायन्स म्यूझियम ते वरळी (अप लाईन- २०७२ मी, डाऊन लाईन- २०५७ मी)

२) सायन्स म्यूझियम ते महालक्ष्मी (अप लाईन- १११७.५ मी)

मेट्रो-३ प्रकल्पाचे आतापर्यंत  एकूण ५२.६ कीमी म्हणजेच ९६.५% भुयारीकरण पूर्ण झाले आहे.(समाप्त)

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

CoronaUpdate: बरे झालेल्या रुग्णांपेक्षा नव्या कोरोनाबाधितांची संख्या अधिक, मृतांचाही आकडा वाढतोय

मुंबई – राज्यात गेल्या २४ तासांत ८ हजार १५९ नव्या कोरोनाबाधितांची नोंंद झाली आहे. तर ७ हजार ८३९ बाधित कोरोनामुक्त झाले आहेत. तर गेल्या...
Read More
post-image
मनोरंजन महाराष्ट्र

राज कुंद्राच्या कार्यालयातील सर्व्हर पोलिसांच्या हाती

मुंबई – पॉर्न फिल्म बनविल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या राज कुंद्राच्या कार्यालयातील सर्व्हर पोलिसांच्या हाती लागला आहे. या सर्व्हरच्या माध्यमातून अ‍ॅप आणि दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर पोर्नोग्राफिक...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

मुंबईत लसीकरणाला दुसऱ्या दिवशीही ब्रेक, खासगी रुग्णालयात मात्र साठा उपलब्ध

मुंबई – कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी ब्रेक लागला आहे. पुरेसा लस साठ्याअभावी उद्या गुरुवारीही मुंबईतील शासकीय आणि महानगरपालिका केंद्रांवर लसीकरण...
Read More
post-image
विदेश

पाकिस्तानमध्ये करोना डेल्टाचे थैमान, रुग्णालयात उपचारासाठी जागाच नाही!

इस्लामाबाद – पाकिस्तानमध्येही कोरोनाच्या संसर्गाने थैमान घातले आहे. भारतात आढळलेल्या कोरोना डेल्टा वेरिएंट पाकिस्तानमध्ये फैलावत आहे. कराचीमधील रुग्णालयांमध्ये बाधितांवर उपचार करण्यासाठी जागा अपुरी पडत...
Read More
post-image
मुंबई

मेट्रो ३ मार्गावरील महालक्ष्मी मेट्रो स्थानकाच्या भूयारीकरणाचा टप्पा पूर्ण

मुंबई – मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनद्वारे (मुं.मे.रे.कॉ) कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-३ मार्गावरील महालक्ष्मी मेट्रो स्थानकावर भुयारीकरणाचा ३९ वा टप्पा यशस्वीरित्या पार पडला. रॉबिन्स बनावटीच्या टनेल बोरिंग...
Read More