युट्यूबने लाँच केले नवे ‘सुपर थँक्स’, व्हिडीओ क्रिएटर्सची बक्कळ कमाई – eNavakal
देश

युट्यूबने लाँच केले नवे ‘सुपर थँक्स’, व्हिडीओ क्रिएटर्सची बक्कळ कमाई

नवी दिल्ली – सध्या तरुणाईमध्ये युट्यूब आणि त्यावरील व्हिडीओ हा चर्चेचा आवडीचा विषय बनला आहे. पण आता व्हिडीओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म यूट्यूबने एक नवीन ‘सुपर थँक्स’ फीचर लाँच केले आहे. या नवीन फीचरद्वारे युजर्स आपल्या आवडत्या युट्यूब चॅनेलला टिप देऊ शकतात. हे फीचर व्हिडिओ क्रिएटर्सला पैसे कमविण्यास मदत करणार आहे.

युट्यूबच्या एका निवेदनानुसार, यूट्यूब व्हिडीओ पाहणारे चाहते आता आपले आभार व्यक्त करण्यासाठी आणि समर्थन दाखविण्यासाठी ‘सुपर थँक्स’ खरेदी करू शकतात. हे अतिरिक्त बोनस म्हणून त्यांना अ‍ॅनिमेटेड जीआयएफ दिसेल व त्यांच्या खरेदीचे प्रतिनिधित्व करण्यासाठी वेगळ्या, रंगीबेरंगी टिप्पणीचा पर्याय मिळेल, ज्याचे क्रिएटर्स सहजपणे उत्तर देऊ शकतात.

दरम्यान, सुपर थँक्स फीचर सध्या २ डॉलर आणि ५० डॉलरमध्ये उपलब्ध आहे. हे फीचर बीटा टेस्टिंग टप्प्यात होते आणि आता ते हजारो क्रिएटर्ससाठी उपलब्ध होईल. हे फीचर ६८ देशांमधील डेस्कटॉप आणि मोबाईल डिव्हाइसवर क्रिएटर्स आणि दर्शकांसाठी उपलब्ध आहे. जर क्रिएटर्सजवळ आताच ऍक्सेस नसेल तर या वर्षाच्या शेवटी युट्यूब भागीदारी कार्यक्रमांतर्गत सर्व पात्र क्रिएटर्ससाठी उपलब्धता वाढविणार आहे, असे चीफ प्रॉडक्ट ऑफिसर नील मोहन यांनी म्हटले आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
देश

युट्यूबने लाँच केले नवे ‘सुपर थँक्स’, व्हिडीओ क्रिएटर्सची बक्कळ कमाई

नवी दिल्ली – सध्या तरुणाईमध्ये युट्यूब आणि त्यावरील व्हिडीओ हा चर्चेचा आवडीचा विषय बनला आहे. पण आता व्हिडीओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म यूट्यूबने एक नवीन ‘सुपर...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

आता एटीएममधून पैसे काढणे महागणार

मुंबई – सध्या कोरोनाच्या काळात अनेकजण आर्थिकदृष्ट्या चिंतेत असताना आता एटीएममधून पैसे काढणाऱ्या लोकांनाही मोठा दणका बसणार आहे. आता आपलेच पैसे एटीएममधून काढणे अधिक...
Read More
post-image
देश

केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता २८ टक्क्यांपर्यंत वाढला

नवी दिल्ली – देशातील केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांना महागाई भत्ता २८ टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा आदेश केंद्रीय अर्थ मंत्रालयाने जारी केला आहे. विशेष म्हणजे हा आदेश १...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या कोरोना मुंबई

मुंबईत लसीकरणाला दुसऱ्या दिवशीही ब्रेक

मुंबई – कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी ब्रेक लागला आहे. पुरेशा लस साठ्याअभावी आज गुरुवारीही मुंबईतील शासकीय आणि महानगरपालिका केंद्रांवर लसीकरण...
Read More
post-image
मनोरंजन

रितेश देशमुख पुन्हा एकदा मराठी चित्रपटात, प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर करणार दिग्दर्शन

ताल, परदेस, कहो ना प्यार है, वेल कम बॅक आदी चित्रपटांचे चित्रिकरणाची धुरा सांभाळलेले कबीर लाल आता एका मराठी चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत. अदृश्य...
Read More