दैनिक भास्करच्या कार्यालयांवर आयकर विभागाचे छापे – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश

दैनिक भास्करच्या कार्यालयांवर आयकर विभागाचे छापे

नवी दिल्ली – केंद्र सरकार आणि मध्य प्रदेश सरकारविरोधात बेधडक लिहिणारे देशातील आघाडीचे वृत्तपत्र ‘दैनिक भास्कर’च्या कार्यालयांवर आज आयकर विभागाने छापे टाकले. देशभरात पसरलेल्या या वृत्तपत्राशी संबंधित मध्य प्रदेश, दिल्ली, राजस्थान आणि गुजरात या राज्यांतील अनेक ठिकाणांवर आयकर विभागाने आज सकाळी छापेमारीची कारवाई केली. या वृत्तपत्राचे मालक सुधीर अग्रवाल यांच्या भोपाळमधील अरोरा कॉलनीतील घरावरही छापा टाकण्यात आला. या कारवाईत स्थानिक पोलिसांचीही मदत घेण्यात आली होती. महत्त्वाचे म्हणजे दैनिक भास्कर सतत केंद्रातील मोदी सरकारविरोधात लिहीत होते, त्यानंतर हळूहळू त्यांच्या सरकारी जाहिराती बंद केल्या होत्या. आता त्यातूनच हे छापे टाकल्याची जोरदार चर्चा आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आयकर विभागाने आज सकाळी भोपाळच्या प्रेस कॉम्प्लेक्स येथील द्वारका सदनात छापेमारी केली. यावेळी बुधवारी रात्रीपासून कामावर असलेल्या दैनिक भास्करच्या डिजिटल विभागातील जवळपास दोन डझन कर्मचाऱ्यांचे मोबाईल जप्त करण्यात आले. त्याचबरोबर या कार्यालयातील कॉम्प्युटर आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणेही आयकर विभागाने ताब्यात घेतल्याचे कळते आहे. दैनिक भास्करच्या अनेक कार्यालयांवर दिल्ली आणि मुंबईतील टीमकडून ही छापेमारीची कारवाई करण्यात आली असून यात १०० हून अधिक अधिकारी सहभागी होते.

दरम्यान, दैनिक भास्कर समूह अनेक वर्षांपासून कार्यान्वित आहे. मागील काही महिन्यांपासून या वृत्तपत्रातून केंद्रातील मोदी सरकारसह मध्य प्रदेशातील शिवराज सिंह चौहान सरकारविरोधात सातत्याने टीकेची झोड उठवली जातेय. विशेषतः कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान या वृत्तपत्राने अतिशय उघडपणे या दोन्ही सरकारांविरोधात लिहिले होते. मध्य प्रदेश सरकार आणि गुजरात सरकार कोरोना रुग्णांबाबत, लसीकरणाबाबत आकडे लपवत असल्याचे या वृत्तपत्राने छापले होते.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

दैनिक भास्करच्या कार्यालयांवर आयकर विभागाचे छापे

नवी दिल्ली – केंद्र सरकार आणि मध्य प्रदेश सरकारविरोधात बेधडक लिहिणारे देशातील आघाडीचे वृत्तपत्र ‘दैनिक भास्कर’च्या कार्यालयांवर आज आयकर विभागाने छापे टाकले. देशभरात पसरलेल्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

कुंद्रा प्रकरणात आरोपी म्हणून फोटो; अभिनेता उमेश कामतकडून कारवाईचा इशारा

मुंबई – उद्योजक राज कुंद्राला अटक झाल्यानंतर अश्लील चित्रपट रॅकेट प्रकरणात सातत्याने नवीन माहिती समोर येतेय. राज कुंद्राचा माजी पीए उमेश कामत याला काही...
Read More
post-image
विदेश

पाकमध्ये २०२५ पर्यंत मोठे पाणीसंकट; थेंबा थेंबासाठी तडफडतील नागरिक

इस्लामाबाद – सतत दहशतवादाचा पुरस्कार करत आलेल्या पाकिस्तानवर आता मोठे पाणीसंकट कोसळणार, अशी भीती व्यक्त केली जात आहे. आताच या पाणी समस्येची झळ पाकिस्तानमधील...
Read More
post-image
देश

युट्यूबने लाँच केले नवे ‘सुपर थँक्स’, व्हिडीओ क्रिएटर्सची बक्कळ कमाई

नवी दिल्ली – सध्या तरुणाईमध्ये युट्यूब आणि त्यावरील व्हिडीओ हा चर्चेचा आवडीचा विषय बनला आहे. पण आता व्हिडीओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म यूट्यूबने एक नवीन ‘सुपर...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

आता एटीएममधून पैसे काढणे महागणार

मुंबई – सध्या कोरोनाच्या काळात अनेकजण आर्थिकदृष्ट्या चिंतेत असताना आता एटीएममधून पैसे काढणाऱ्या लोकांनाही मोठा दणका बसणार आहे. आता आपलेच पैसे एटीएममधून काढणे अधिक...
Read More