चिपळूणमध्ये तुफान पाऊस; घरे, बाजारपेठा तुडुंब – eNavakal
महाराष्ट्र

चिपळूणमध्ये तुफान पाऊस; घरे, बाजारपेठा तुडुंब

चिपळूण – कोकणात गेल्या २४ तासांत पावसाने रौद्ररुप घेतले आहे. रात्रभर झालेल्या तुफान पावसामुळे चिपळुणात भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. वाशिष्ठी आणि शिव नदीला पूर आला असून संपूर्ण चिपळूण या पुराच्या पाण्यात वेढले गेले आहे. शहरातील शेकडो घरांमध्ये पुराचे पाणी शिरले असून बाजारपेठाही पाण्याखाली गेल्या आहेत. जराही विश्रांती न घेता कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबई-गोवा महामार्ग आणि कराड रोड मार्गावरील वाहतूक पूर्ण ठप्प झाली आहे. तर शहरातील ब्रिटिशकालीन बहादूर शेख पूलही वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. दरम्यान, हवामान खात्याने चार दिवस हाय अलर्ट राहण्याचा इशारा दिल्यामुळे आणखी नुकसान होणार की काय, अशी भीती व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर पुण्याहून एनडीआरएफची तुकडी चिपळुणात दाखल झाली आहे.

रात्रभर मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने चिपळूण शहरातील जुना बाजार पूल आणि नवा पूल हे पूर्ण पाण्याखाली गेले असून दिसेनासे झाले आहेत. तर वाशिष्टी, शिव नदीला आलेल्या पुराच्या पाण्याची पातळी आणखी वाढत आहे. अनेक घरांमध्ये हे पुराचे पाणी शिरल्याने शेकडो लोक घरातच अडकून पडले आहेत. तसेच पुराचा फटका दुकानांनाही बसला असून शहरातील अनेक भागांत बाजार पेठ, मच्छी मार्केट, भाजी मार्केट परिसरात पाणी भरले आहे. त्याचबरोबर काजळी नदीलाही पूर आल्याने रत्नागिरी तालुक्यातील चांदेराई येथील बाजारपेठेतही पाणी भरले आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
विदेश हवामान

चीनच्या इतिहासातील विक्रमी पाऊस; हेनान प्रांतात पुरात २५ जणांचा मृत्यू

बीजिंग – चीनमधील मध्य हेनान प्रांतात प्रचंड अतिवृष्टी झाली आहे. चीनच्या हवामान विभागाच्या इतिहासातील हा विक्रमी पाऊस असल्याचे सांगितले जात आहे. या विक्रमी पावसाने...
Read More
post-image
महाराष्ट्र

चिपळूणमध्ये तुफान पाऊस; घरे, बाजारपेठा तुडुंब

चिपळूण – कोकणात गेल्या २४ तासांत पावसाने रौद्ररुप घेतले आहे. रात्रभर झालेल्या तुफान पावसामुळे चिपळुणात भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. वाशिष्ठी आणि शिव नदीला...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

दैनिक भास्करच्या कार्यालयांवर आयकर विभागाचे छापे

नवी दिल्ली – केंद्र सरकार आणि मध्य प्रदेश सरकारविरोधात बेधडक लिहिणारे देशातील आघाडीचे वृत्तपत्र ‘दैनिक भास्कर’च्या कार्यालयांवर आज आयकर विभागाने छापे टाकले. देशभरात पसरलेल्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

कुंद्रा प्रकरणात आरोपी म्हणून फोटो; अभिनेता उमेश कामतकडून कारवाईचा इशारा

मुंबई – उद्योजक राज कुंद्राला अटक झाल्यानंतर अश्लील चित्रपट रॅकेट प्रकरणात सातत्याने नवीन माहिती समोर येतेय. राज कुंद्राचा माजी पीए उमेश कामत याला काही...
Read More
post-image
देश

सलग दुसऱ्या दिवशी बिकानेर भूकंपाने हादरले; नागरिकांत भीती

बिकानेर – राजस्थानमधील बिकानेर जिल्ह्यात आज सलग दुसऱ्या दिवशी भूकंपाचे धक्के जाणवले. आज सकाळी ७ वाजून ४२ मिनिटांनी बिकानेरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची...
Read More