कोरोनानंतर चीनमध्ये पूराचे थैमान; २५ ठार, २ लाख नागरिकांचे स्थलांतर – eNavakal
विदेश

कोरोनानंतर चीनमध्ये पूराचे थैमान; २५ ठार, २ लाख नागरिकांचे स्थलांतर

बिजिंग: आधीच कोरोनाने घातलेले थैमान आणि त्यातून झालेले देशाचे अनेक प्रकारचे नुकसान यातून चीन कुठेतरी सावरताना दिसत असतानाच चीनसमोर पुन्हा एक नवीन संकट आवासून उभे आहे. चीनमध्ये आता पुराचे संकट ओढवले आहे. चीन मधील अनेक शहरात मोठ्या प्रमाणात पावसाने थैमान घातले आहे आणि यामुळे अनेक ठिकाणी पूर आल्याने अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
दरम्यान, चीन सरकारने म्हटले आहे की चीनच्या हेनान प्रांतातील पूरात २५ लोकांचा मृत्यू झाला आहे. आणखी ७ जणांचा शोध सुरु आहे. सोमवारी चीनच्या हेनान प्रांतात मुसळधार पावसाने राजधानी झेंग्झोला जोरदार तडाखा बसला. रस्ते पाण्याखाली जाऊन येथील सामान्य जीवन विस्कळीत झाले आहे. हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या तीन दिवसांत ६४० मि.मी. पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. शहरात वाढलेल्या पुरामुळे दोन लाखाहून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. पुरामुळे अनेकजण कार्यालयातच थांबले आहेत. तर, काहींनी हॉटेलमध्ये थांबण्याचा निर्णय घेतला आहे. काही ठिकाणी मदत आणि बचाव कार्यासाठी लष्कराची मदत घेण्यात येत आहे. मुसळधार पावसामुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. शहरातील प्रमुख परिवहन सेवांपैकी एक असलेल्या मेट्रो जवळ पूरस्थिती निर्माण झाली असून तेथे गाड्या पाण्याखाली गेल्याचे दिसत आहे. सामान्य पावसापेक्षा या पावसाची विक्रमी नोंद करण्यात आली असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले आहे. आयफोनसाठी जगातील सर्वात मोठे उत्पादन केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मध्यवर्ती चीनी शहरातून अनेकांचे स्थलांतर करण्यात आले आहे.
दरम्यान, चीनमध्ये चालू असलेल्या पावसाचे व्हिडियो अनेक ठिकाणी व्हायरल झाले आहेत. हि दृश्य अगदी मन हेलावून टाकणारी आहेत. बौद्ध भिक्खूंच्या मार्शल आर्टमधील प्रभुत्वासाठी प्रसिद्ध असलेल्या झेंग्झूच्या उत्तरेकडील प्रसिद्ध शाओलिन मंदिरालाही मुसळधार पाऊस, पुराचा फटका बसला आहे. मु सळधार पाऊस आणि आलेल्या पुरामुळे वीज पुरवठा खंडीत झाला आहे. काही उपकेंद्रांमध्ये पाण्याचा शिरकाव झाला आहे. असा वादळी पाऊस पाहिला नसल्याची प्रतिक्रिया अनेकांनी दिली. चीनमध्ये मान्सून दरम्यान मुसळधार पाऊस आणि पूर येतो. मात्र, यावर्षीची परिस्थिती भयावह असल्याचे काहींनी म्हटले.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
विदेश

कोरोनानंतर चीनमध्ये पूराचे थैमान; २५ ठार, २ लाख नागरिकांचे स्थलांतर

बिजिंग: आधीच कोरोनाने घातलेले थैमान आणि त्यातून झालेले देशाचे अनेक प्रकारचे नुकसान यातून चीन कुठेतरी सावरताना दिसत असतानाच चीनसमोर पुन्हा एक नवीन संकट आवासून...
Read More
post-image
महाराष्ट्र मुंबई

ठाण्याची तहान भागवणारं बारवी धरण ५२ टक्के भरले

ठाणे –   दमदार पावसामुळे ठाणेकरांची तहान भागवणारं बारवी धरण 52 टक्के भरले आहे. या धरणाची पाणीपातळी 65.80 मीटरवर पोहोचली आहे. आणखी काही दिवस पाऊस असाच बरसत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

CoronaUpdate: बरे झालेल्या रुग्णांपेक्षा नव्या कोरोनाबाधितांची संख्या अधिक, मृतांचाही आकडा वाढतोय

मुंबई – राज्यात गेल्या २४ तासांत ८ हजार १५९ नव्या कोरोनाबाधितांची नोंंद झाली आहे. तर ७ हजार ८३९ बाधित कोरोनामुक्त झाले आहेत. तर गेल्या...
Read More
post-image
मनोरंजन महाराष्ट्र

राज कुंद्राच्या कार्यालयातील सर्व्हर पोलिसांच्या हाती

मुंबई – पॉर्न फिल्म बनविल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या राज कुंद्राच्या कार्यालयातील सर्व्हर पोलिसांच्या हाती लागला आहे. या सर्व्हरच्या माध्यमातून अ‍ॅप आणि दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर पोर्नोग्राफिक...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

मुंबईत लसीकरणाला दुसऱ्या दिवशीही ब्रेक, खासगी रुग्णालयात मात्र साठा उपलब्ध

मुंबई – कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी ब्रेक लागला आहे. पुरेसा लस साठ्याअभावी उद्या गुरुवारीही मुंबईतील शासकीय आणि महानगरपालिका केंद्रांवर लसीकरण...
Read More