कुंद्रा प्रकरणात आरोपी म्हणून फोटो; अभिनेता उमेश कामतकडून कारवाईचा इशारा – eNavakal
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

कुंद्रा प्रकरणात आरोपी म्हणून फोटो; अभिनेता उमेश कामतकडून कारवाईचा इशारा

मुंबई – उद्योजक राज कुंद्राला अटक झाल्यानंतर अश्लील चित्रपट रॅकेट प्रकरणात सातत्याने नवीन माहिती समोर येतेय. राज कुंद्राचा माजी पीए उमेश कामत याला काही महिन्यांपूर्वीच या प्रकरणात अटक झालेली आहे. त्यामुळे वृत्तवाहिन्यांवर राजसह त्याचे नावही वारंवार झळकत आहे. मात्र यात मोठा घोळ झालेला दिसतोय. तो म्हणजे आरोपीशी असलेल्या नामसाधर्म्यामुळे काही वृत्तवाहिन्यांनी वृत्तांकन करताना मराठीतील सुप्रसिद्ध अभिनेता उमेश कामत याचा फोटो वारंवार दाखवला आहे. परिणामी आपला फोटो या प्रकरणाशी जोडलेला पाहून अभिनेता उमेश कामत प्रचंड संतापला असून त्याने वृत्तवाहिन्यांनी आपली बदनामी केल्याचा आरोप करत कारवाईचा इशारा दिला आहे. तशी पोस्टच त्याने सोशल मीडियावर शेअर केली आहे.

या पोस्टमध्ये उमेशने म्हटलंय, ‘आज राज कुंद्रा प्रकरणात चालवण्यात आलेल्या बातमीमध्ये, या प्रकरणातील एक आरोपी ‘उमेश कामत’ याचा फोटो म्हणून माझा फोटो लावला जातो आहे. कुठलीही शहानिशा न करता वृत्तवाहिन्यांनी या प्रकरणात माझा फोटो लावून माझी बदनामी केली आहे. या प्रकारामुळे होणाऱ्या माझ्या वैयक्तिक, व्यावसायिक आणि सामाजिक हानीसाठी या वृत्तमाध्यमांना जबाबदार धरले जाईल. या प्रकरणी संबंधित मी योग्य ती कायदेशीर कारवाई निश्चितच करेन’, असा इशारा उमेश कामतने सोशल मीडियावरून दिला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Umesh Kamat (@umesh.kamat)

दरम्यान, उमेश कामत हा मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आहे. २००२ साली आभाळमाया मालिकेतून त्याने आपल्या कारकिर्दीस सुरुवात केली. त्यानंतर वादळवाट, असंभव, ह्या गोजिरवाण्या घरात, शुभमकरोति, एका लग्नाची दुसरी गोष्ट, एका लग्नाची तिसरी गोष्ट यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये तो महत्त्वाच्या भूमिकेत झळकला. तर सध्या तो ‘अजूनही बरसात आहे’ या मालिकेत अभिनेत्री मुक्ता बर्वेसह मुख्य व्यक्तिरेखेत दिसत आहे. त्याचबरोबर समर एक संघर्ष, टाईमप्लीज, लग्न पहावे करुन, बाळकडू, असेही एकदा व्हावे यांसारख्या चित्रपटांतही उमेशने काम केले असून नवा गडी नवं राज्य, दादा एक गुड न्यूज आहे यांसारख्या नाटकांमधील त्याच्या भूमिकाही गाजल्या आहेत.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

कुंद्रा प्रकरणात आरोपी म्हणून फोटो; अभिनेता उमेश कामतकडून कारवाईचा इशारा

मुंबई – उद्योजक राज कुंद्राला अटक झाल्यानंतर अश्लील चित्रपट रॅकेट प्रकरणात सातत्याने नवीन माहिती समोर येतेय. राज कुंद्राचा माजी पीए उमेश कामत याला काही...
Read More
post-image
विदेश

पाकमध्ये २०२५ पर्यंत मोठे पाणीसंकट; थेंबा थेंबासाठी तडफडतील नागरिक

इस्लामाबाद – सतत दहशतवादाचा पुरस्कार करत आलेल्या पाकिस्तानवर आता मोठे पाणीसंकट कोसळणार, अशी भीती व्यक्त केली जात आहे. आताच या पाणी समस्येची झळ पाकिस्तानमधील...
Read More
post-image
देश

युट्यूबने लाँच केले नवे ‘सुपर थँक्स’, व्हिडीओ क्रिएटर्सची बक्कळ कमाई

नवी दिल्ली – सध्या तरुणाईमध्ये युट्यूब आणि त्यावरील व्हिडीओ हा चर्चेचा आवडीचा विषय बनला आहे. पण आता व्हिडीओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म यूट्यूबने एक नवीन ‘सुपर...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

आता एटीएममधून पैसे काढणे महागणार

मुंबई – सध्या कोरोनाच्या काळात अनेकजण आर्थिकदृष्ट्या चिंतेत असताना आता एटीएममधून पैसे काढणाऱ्या लोकांनाही मोठा दणका बसणार आहे. आता आपलेच पैसे एटीएममधून काढणे अधिक...
Read More
post-image
देश

केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता २८ टक्क्यांपर्यंत वाढला

नवी दिल्ली – देशातील केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांना महागाई भत्ता २८ टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा आदेश केंद्रीय अर्थ मंत्रालयाने जारी केला आहे. विशेष म्हणजे हा आदेश १...
Read More