आता एटीएममधून पैसे काढणे महागणार – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश

आता एटीएममधून पैसे काढणे महागणार

मुंबई – सध्या कोरोनाच्या काळात अनेकजण आर्थिकदृष्ट्या चिंतेत असताना आता एटीएममधून पैसे काढणाऱ्या लोकांनाही मोठा दणका बसणार आहे. आता आपलेच पैसे एटीएममधून काढणे अधिक महागणार आहे. बँकेने ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा अधिक पैसे एटीएममधून काढल्यानंतर बँका शुल्क आकारणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकांना एटीएमवर अशा प्रत्येक व्यवहारावरील शुल्कात २१ रुपये कपात करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे आता एटीएम वापरताना जपून वापरावे लागणार आहे.

हे सुधारीत दर १ जानेवारी २०२२ पासून लागू होणार आहेत. ग्राहक बँकेच्या एटीएममधून दर महिन्याला पाच वेळा विनामूल्य व्यवहार करू शकतात. त्यानंतरच्या प्रत्येक व्यवहाराला शुल्क आकारले जाणार आहे. तर डेबिट-क्रेडिट कार्ड्सद्वारे पेमेंट प्रकिया करणाऱ्यांवरही बँका अधिक फी घेणार असल्याचे समजते. रिझर्व्ह बँकेने नुकतीच मास्टरकार्डवर बंदी घातली आहे. यानंतर हे कार्ड चर्चेचा विषय बनले आहे. मास्टरकार्ड आणि व्हिसा हे दोघेही भारतातील पेमेंटसाठीचे सर्वात मोठे स्त्रोत मानले जातात. जेव्हा जेव्हा एखादा ग्राहक हे कार्ड वापरतो, तेव्हा त्याची संपूर्ण माहिती त्या कंपनीच्या सर्व्हरवर जाते. या कंपन्यांचे सर्व्हर परदेशात आहेत. जिथे माहितीची प्रक्रिया आणि व्हेरिफिकेशन केले जाते. ज्या बँका या कार्डच्या सेवा वापरतात त्या प्रत्येक ३ महिन्यानंतर फी भरतात. बँक बझारचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदिल शेट्टी यांनी एका मुलाखतीत सांगितले की, कार्डवरील प्रत्येक व्यवहारासाठी एक इंटरचेंज फी आकारली जाते. व्यवहारासाठी ही रक्कम फारच कमी आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

आता एटीएममधून पैसे काढणे महागणार

मुंबई – सध्या कोरोनाच्या काळात अनेकजण आर्थिकदृष्ट्या चिंतेत असताना आता एटीएममधून पैसे काढणाऱ्या लोकांनाही मोठा दणका बसणार आहे. आता आपलेच पैसे एटीएममधून काढणे अधिक...
Read More
post-image
देश

केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता २८ टक्क्यांपर्यंत वाढला

नवी दिल्ली – देशातील केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांना महागाई भत्ता २८ टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा आदेश केंद्रीय अर्थ मंत्रालयाने जारी केला आहे. विशेष म्हणजे हा आदेश १...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या कोरोना मुंबई

मुंबईत लसीकरणाला दुसऱ्या दिवशीही ब्रेक

मुंबई – कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी ब्रेक लागला आहे. पुरेशा लस साठ्याअभावी आज गुरुवारीही मुंबईतील शासकीय आणि महानगरपालिका केंद्रांवर लसीकरण...
Read More
post-image
मनोरंजन

रितेश देशमुख पुन्हा एकदा मराठी चित्रपटात, प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर करणार दिग्दर्शन

ताल, परदेस, कहो ना प्यार है, वेल कम बॅक आदी चित्रपटांचे चित्रिकरणाची धुरा सांभाळलेले कबीर लाल आता एका मराठी चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत. अदृश्य...
Read More
post-image
विदेश

कोरोनानंतर चीनमध्ये पूराचे थैमान; २५ ठार, २ लाख नागरिकांचे स्थलांतर

बिजिंग: आधीच कोरोनाने घातलेले थैमान आणि त्यातून झालेले देशाचे अनेक प्रकारचे नुकसान यातून चीन कुठेतरी सावरताना दिसत असतानाच चीनसमोर पुन्हा एक नवीन संकट आवासून...
Read More