राम मंदिरासाठी २८ वर्षांपासून उपवास, ‘या’ आजी फक्त करतात फळाहार – eNavakal
ट्रेंडिंग

राम मंदिरासाठी २८ वर्षांपासून उपवास, ‘या’ आजी फक्त करतात फळाहार

अयोध्या येथे राम मंदिराच्या भूमिपूजनाची जय्यद तयारी सुरू आहे. या जागेवर राम मंदिरच व्हावं याकरता अनेक हिंदुत्ववादी संघटना, संस्थांनी पुढाकार घेतला होता. अनेकांनी वैयक्तिक पातळीवरही राम मंदिरासाठी प्रार्थना केली होती. त्याचप्रमाणे मध्य प्रदेश येथील जबलपूर येथे राहणाऱ्या ८१ वर्षांच्या उर्मिला चर्तुर्वेदी यांनीही असाच एक प्रण केला होता. राम मंदिर होण्यासाठी त्या गेल्या २८ वर्षांपासून उपोषण करत आहेत. तर, आता ५ ऑगस्टला राम मंदिराचं भूमिपूजन होणार असल्याने उर्मिला यांनी समाधान व्यक्त केलं असून त्यांना उर्वरित जीवन मंदिरातच व्यतीत करायचं आहे, असं त्या म्हणाल्या.

१९९२ साली अयोध्येत मोठा हाहाकार माजला होता. तेव्हा त्या ५३ वर्षांच्या होत्या. मंदिराचा ढाचा पाडल्यानंतर देशभरात दंगल उसळली होती. त्यावेळीच उर्मिला यांनी एक प्रण केला. ‘ज्यादिवशी या ठिकाणी पुन्हा राम मंदिराचं काम सुरू होईल तेव्हाच अन्नग्रहण करेन.’ त्यांच्या या व्रतामुळे त्या गेल्या २८ वर्षांपासून उपवास करत आहेत. मात्र अन्न ग्रहण न करताही त्या अगदी व्यवस्थित आहेत.

त्यांनी उपोषणाला सुरूवात केल्यानंतर त्या सतत पूजा-पाठ आणि रामायण वाचत बसतात. गेल्या कित्येक वर्षांत त्यांच्या या दिनचर्येत कोणताच बदल झाला नाही. उर्मिला चतुर्वेदी सकाळी लवकर उठून पूजा करतात. त्यानंतर घरातील लहान मुलांसोबत वेळ व्यतीत करतात. सोबतच रामायण, पूजा पाठ सुरू असते. त्या दिवसभर रामायण वाचत असतातच शिवाय त्यांच्या कुटुंबातील अनेकजण वेळ मिळेल तसं रामायण वाचत असतात.

उर्मिला यांची सून रेखा यांनी सांगितल्यानुसार, त्या दिवसाला फक्त दूध आणि फळाहार करतात. याव्यतिरिक्त ते अन्नाचा एकही दाना खात नाहीत. मात्र तरीही त्यांच्या आरोग्यावर याचा कोणताही परिणाम झालेला नाही.

गेल्या ३ ते ४ वर्षांपासून वृद्धापकाळाने त्यांना आता थकवा जाणवतो. पूर्वी स्वत:ची सर्व कामं त्या एकट्या करत असत. मात्र वृद्धापकाळामुळे त्यांना आता मदतीची गरज असते. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्या कुटुंबियांनी आणि नातेवाईकांनी ही उपवास सोडण्याचा आग्रहही धरला होता. मात्र, त्यांनी आपला उपवास सुरूच ठेवला.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
देश

उत्तर प्रदेशात चोरांच्या हल्ल्यात २ पोलीस जखमी

लखनऊ – कानपूरमधील पोलिसांवरील हल्ल्याची घटना ताजी असतानाच उत्तर प्रदेशातील कौशांबी जिल्ह्यात आज पुन्हा पोलिसांवर हल्ला झाल्याची घटना घडली. चोरांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला झाला....
Read More
post-image
मुंबई

चेंबूरमधील अदानीच्या कार्यालयासमोर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचे जोरदार आंदोलन

मुंबई – भरमसाठ वीजबिलाविरोधात चेंबूर येथील अदानीच्या कार्यालयासमोर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आज जोरदार आंदोलन केले आणि त्यांनी अदानीच्या वीज बिलांची होळी करत जोरदार घोषणाबाजी केली. वाचा...
Read More
post-image
देश

सर्वोच्च न्यायालयाची काही न्यायालये पुढच्या आठवड्यात प्रत्यक्ष उपस्थितीत सुरू होणार

नवी दिल्ली – 25 मार्चपासून गेले चार महिने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चालविले जाणारे सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज पुढच्या आठवड्यापासून वकिलांच्या व न्यायमूर्तींच्या प्रत्यक्ष उपस्थितीत सुरू होणार...
Read More
post-image
महाराष्ट्र

पीपीई किट घालून चोरांनी टाकला सराफा दुकानात दरोडा, घटना सीसीटीव्हीत कैद

नाशिक – कोरोनाच्या काळात गुन्हेगारी, चोऱ्यामाऱ्या कमी झाल्या होत्या. मात्र, आता चोर स्मार्ट झाले असल्याने त्यांनी चोरी करण्यासाठी नवी युक्ती शोधून काढली आहे. कोरोनाचा...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

‘रावसाहेब दानवे यांच्या त्रासाला कंटाळलो,’ हर्षवर्धन जाधव यांची कुटुंब न्यायालयात घटस्फोटासाठी धाव

औरंगाबाद – भाजपचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या त्रासामुळे त्यांचा जावई माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला आहे. हर्षवर्धन जाधव यांनी संजना...
Read More