World Press Freedom Day: पत्रकार आणि छायाचित्रकारांना पोट्रेटद्वारे मानवंदना – eNavakal
Uncategoriz महाराष्ट्र मुंबई

World Press Freedom Day: पत्रकार आणि छायाचित्रकारांना पोट्रेटद्वारे मानवंदना

मुंबई – कोरोनाविरोधातील लढाई जिंकण्यासाठी आरोग्य कर्मचारी, पोलीस, शासकीय अधिकारी यांनी आपल्या जीवाची बाजी लावली आहे. त्याचसोबत जनसामान्यापर्यंत इंत्थभूत माहिती पोहोचवण्याचे काम पत्रकार मंडळी करत आहेत. त्यामुळे कोरोनायोद्धांमध्ये पत्रकार बांधवांचाही समावेश करण्यात आलाय. आपल्या जीवाची पर्वा न करता घराबाहेर राहून लोकांना अपडेट करणाऱ्या पत्रकारांना मानवंदना म्हणून पवईतील चेतन राऊत या कलाकाराने पुशपिनांपासून पोट्रेट साकारले आहे. वर्ल्ड प्रेस फ्रीडम डे च्या निमित्ताने चेतनने पत्रकार आणि छायाचित्रकारांसाठी ही कलाकृती सादर केली आहे.


तळागाळांत जाऊन परिस्थितीची संपूर्ण माहिती लोकांपर्यंत पोहोचवणाऱ्या ५३ पत्रकारांना मध्यंतरी कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. त्यातील अनेकांनी कोरोनावर मातही केली आहे. काही दिवसांनी हे योद्धे पुन्हा आपल्या कार्यात सज्ज होतील. आपल्या जीवावर उदार होऊन असे अनेक पत्रकार कंटेन्टमेंट झोनसारख्या ठिकाणी, शासकीय कार्यालये, अधिकृत माहिती पुरवणाऱ्या व्यक्तीच्या संपर्कात येत आहेत. त्यामुळे पत्रकार, कॅमेरामन, व्हिडिओग्राफरना यांनाही आपल्या परिवारापासून लांब राहावं लागत आहे. मात्र देश आणि आपला परिसर या संकटापासून वाचावा म्हणून आनंदाने त्यांनी हे सुद्धा स्वीकारले आहे. म्हणून त्यांच्या कार्यप्रती मानवंदना देण्यासाठी कलाकार चेतन राऊत याने पत्रकार आणि छायाचित्रकार यांच्यासाठी दोन पोट्रेट साकारले आहे. पत्रकारासाठी साकारलेले पोट्रेट 30 इंच x 18 इंच आकाराचं असून त्यासाठी 4860 पुशपिनांचा वापर करण्यात आला आहे. तर, छायाचित्ररकारांसाठी साकारलेले पोट्रेट 24 इंच x 24 इंच असून त्यासाठी 5184 पुशपिनांचा वापर करण्यात आला आहे.

पुशपिनांपासून साकारले आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचे पोट्रेट

पणत्यातून रामदरबार साकारणारा चेतन

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

खासदार नवनीत राणा यांची प्रकृती स्थिर, आयसीयूतून सामान्य कक्षात हलवले

मुंबई- कोरोनाचा संसर्ग झाल्याने लिलावती रुग्णालयात उपचार घेत आलेल्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा कौर यांना आयसीयूतून सामान्य कक्षात हलवण्यात आले आहे. प्रकृतीत थोडी सुधारणा...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश विदेश

पाकिस्तानची वेबसाईट हॅक, भारताचा तिरंगा फडकला

नवी दिल्ली- आज देशात स्वातंत्र्यदिन सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला. याच दिवशी पाकिस्तानच्या वेबसाइट्सवरही शुभेच्छांचे संदेश दिसून आले आहेत. पाकिस्तानच्या फातिमा जिन्ना महिला विद्यापीठासह...
Read More
post-image
विदेश

९० दिवसांत टिकटॉकच्या संपत्तीची विक्री करण्याचा डोनाल्ड ट्रम्पचा आदेश

न्यूयॉर्क – काही दिवसांपूर्वी अमेरिकेने सुरक्षेच्या कारणास्तव टिकटॉकवर बंदी घातली होती. त्यानंतर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चिनी कंपनी बाईटडान्सला ९० दिवसांत अमेरिकेतील टिकटॉकची...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश महाराष्ट्र मुंबई

अभिमानास्पद! कॅप्टन अमोल यादव यांनी बनविले भारतीय बनावटीचे पहिले विमान

मुंबई – आज भारताच्या स्वातंत्र्य दिनी मराठी माणसाची छाती अभिमानाने फुलून यावी अशी ऐतिहासिक घटना घडली आहे. कांदिवली चारकोप येथे राहणारे कॅप्टन अमोल शिवाजी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

शरद पवारांचं एक आदर्श कुटुंब, पार्थ पवारांविषयीचा प्रश्न एका मिनिटांत सोडवतील-राजेश टोपे

जालना – ‘पार्थ पवार अपरिपक्व आहेत, त्यांच्या शब्दाला कवडीची किंमत देत नाही, असं शरद पवार यांनी म्हटल्यानंतर राष्ट्रवादीत अंतर्गत वाद असल्याचं बोललं जात आहे....
Read More