…तर आम्ही जनतेला मोफत लस देऊ, दिल्लीकरांना केजरीवालांचा शब्द – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश

…तर आम्ही जनतेला मोफत लस देऊ, दिल्लीकरांना केजरीवालांचा शब्द

दिल्ली हिंसाचार : मृतांच्या नातेवाईंकाना १० लाखांची नुकसान भरपाई

नवी दिल्ली – भारतात १६ जानेवारीपासून आपत्कालीन वापरासाठी लसीकरणाला सुरुवात होणार आहे. मात्र, हे लसीकरण मोफत असणार की नाही याबाबत अद्यापही खुलासा झालेला नाही. त्यामुळे केंद्र सरकारने कोरोना प्रतिबंधक लसीचा पुरवठा मोफत केला नाही तर आम्ही दिल्लीकरांना मोफत लस उपलब्ध करून देऊ असा विश्वास दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केला आहे.

अरविंद केजरीवाल म्हणाले की, “सर्व देशवासियांना ही लस मोफत उपलब्ध करुन देण्याचे मी केंद्र सरकारला आवाहन केले आहे. कारण आयुष्य वाचवणारी ही लस विकत घेणे, अनेकांना परवडणारे नाही. केंद्र काय करते, ते आम्ही पाहू. केंद्राने मोफत लस उपलब्ध करुन दिली नाही, तर आम्ही दिल्लीच्या जनतेला ती लस मोफत उपलब्ध करुन देऊ” असे अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे.

लसीबद्दल अफवा न पसरवण्याचे सुद्धा त्यांनी जनतेला आवाहन केले. “सुरक्षितता आणि सर्व आवश्यक काळजी घेऊन, केंद्र आणि आपल्या शास्त्रज्ञांनी या लसीला मान्यता दिलीय. त्यामुळे कुठलाही संशय न बाळगता लोकांनी लसीकरणासाठी पुढे आले पाहिजे” असे केजरीवाल म्हणाले.

“आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी आणि कोरोना योद्ध्यांना सर्वप्रथम या लसीचा डोस दिला जाईल. मागच्या वर्षभरापासून लोक त्रास सहन करतायत. लसीमुळे त्यांना दिलासा मिळेल” अशी अपेक्षा केजरीवाल यांनी व्यक्त केली.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

…तर आम्ही जनतेला मोफत लस देऊ, दिल्लीकरांना केजरीवालांचा शब्द

नवी दिल्ली – भारतात १६ जानेवारीपासून आपत्कालीन वापरासाठी लसीकरणाला सुरुवात होणार आहे. मात्र, हे लसीकरण मोफत असणार की नाही याबाबत अद्यापही खुलासा झालेला नाही....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मुंडेवर बलात्काराचा आरोप झाल्यानंतर जयंत पाटील यांनी मांडली भूमिका, म्हणाले…

अहमदनगर – धनंजय मुंडे यांच्या वर बलात्काराचा आरोप झाल्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी यावर काय भूमिका घेणार याकडे साऱ्यांचे...
Read More
post-image
मनोरंजन

महाराष्ट्राच्या मातीतला संघर्ष ‘केसरी’ 15 जानेवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला

इरॉस नाऊने मोठ्या स्वप्नांसह लहान शहरातील तरुण होतकरू कुस्तीपटूची प्रेरणादायक कहाणी सादर करण्याची घोषणा केली आहे, कठोर परिश्रम करून यशस्वी होण्यासाठी केलेली धडपड महेश...
Read More
post-image
आरोग्य महाराष्ट्र मुंबई

गरोदरपणातील थायरॉईडच्या वाढत्या पातळीवर नियंत्रण ठेवणं महत्त्वाचं

आपण गर्भवती आहात? मग, गर्भधारणेदरम्यान थायरॉईड हार्मोनची पातळी नियंत्रणात राहणे गरजेचं आहे. कारण हॉर्मान पातळी योग्यप्रमाणात असल्यास बाळासाठी अतिशय फायदेशीर ठरते. त्यामुळे गर्भारपणात थायरॉईडच्या वाढत्या पातळीवर...
Read More
post-image
मनोरंजन

१९ फेब्रुवारीला ‘प्रीतम’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला

फेब्रुवारी महिना आला कि प्रेमवीरांना वेध लागतात ते ‘व्हॅलेंटाईन डे’ चे. एकमेकांवरचं प्रेम व्यक्त करण्याचा हा दिवस जगभरात साजरा होतो. प्रेमाच्या या उत्सवाला आता...
Read More