छातीपासून बेंबीपर्यंत जोडलेल्या होत्या १४ दिवसांच्या जुळ्या मुली, वाडिया रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया – eNavakal
महाराष्ट्र मुंबई

छातीपासून बेंबीपर्यंत जोडलेल्या होत्या १४ दिवसांच्या जुळ्या मुली, वाडिया रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया

मुंबई – परेल येथील बाई जेरबाई वाडिया हॉस्पीटलमध्ये जन्माला आलेल्या जुळ्या मुली छातीपासून ते बेंबीपर्यत जोडलेल्या होत्या. त्यांना वेगळे करण्यासाठी डॉक्टरांच्या विशेष टीमला तब्बल ६ तासांचा वेळ लागला. या मुलींच्या प्रसुतीपासून ते वेगळे करण्यापर्यंत प्रत्येक गोष्ट ही आव्हानात्मक असून हे आव्हान यशस्वीरित्या पेलण्यात वाडिया हॉस्पीटलला यश आले आहे. वाडिया हॉस्पीटलमध्ये जुळ्यांना विभक्त करणारी ही चौथी यशस्वी शस्त्रक्रिया आहे.

जन्माला आल्यानंतर या दोन्ही बाळांचे एकत्रितरित्या वजन ४.२ किलोग्रॅम इतके होते. बाळाच जीव वाचविण्याकरिता त्यांना विलग करणे गरजेचे होते. जन्मल्यानंतर त्वरीत त्यांना एनआयसीयुमध्ये देखरेखेखाली ठेवण्यात आले होते. या बाळांचे यकृत, छातीखालचा भाग तसेच आतडे एकत्र जुळलेल्या अवस्थेत होते. बालरोगतज्ञ, नवजात शिशूतज्ञ भूलतज्ञ, अस्थिरोगतज्ञ, थोरॅसिक सर्जन आणि प्लास्टीक सर्जन आदी डॉक्टरांची टिम तयार करण्यात आली होती. शस्त्रक्रियेबाबत पालकांशी चर्चा करण्यात आली होती तसेच त्याविषयी त्यांना सविस्तर माहिती देण्यात आली. हार्मोनिक स्कॅल्पेल आणि टी सील चा वापरुन यकृत कापण्याचे विशेष तंत्रज्ञान याठिकाणी वापरले जेणेकरून रक्त वाहण्याचा दर १० मिलीलीटरपर्यंत कमी करण्यात आला.

अशा ओम्फालोपॅग्ज जुळ्या जोड्या सर्व जुळ्या जोड्यांपैकी १० टक्के पहायला मिळतात. वाडिया रूग्णालयात यशस्वीरित्या जन्मलेल्या जुळ्यांमधील ही चौथी यशस्वी शस्त्रक्रिया आहे. कॉन्जॉईंटचा यशस्वी दर हा जवळपास ५० टक्के आहे. अचूक मूल्यांकन, नियोजन आणि व्यवस्थापनाच्या यशस्वी प्रयत्नानंतर शंभर टक्के यश मिळू शकते. बाई जेरबाई वाडिया हॉस्पीटलमध्ये जन्मलेल्या या जुळ्या मुलांवर आव्हानात्मक शस्त्रक्रिया करण्यात आली. या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे या बाळांना सामान्य आयुष्य लाभले असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे असे सीईओ डॉ. मिनी बोधनवाला म्हणाले.

जेव्हा आम्ही आई-बाबा होणार असे समजले तेव्हा आम्हाला खुपच आनंद झाला. पण जेव्हा आम्हाला या प्रेग्नेन्सीमध्ये असलेल्या गुंतागुतीविषयी डॉक्टरांनी माहिती दिली तेव्हा मात्र आम्ही घाबरलो. वाडिया हॉस्पीटलमधील डॉक्टरांनी आम्हाला शस्त्रक्रियेविषयी पूर्ण माहिती दिली. त्यानंतर ही दोनही बाळं सामान्य जीवन जगू शकतात याची खात्री दिली. विशेष म्हणजे रुग्णालयाने ही शस्त्रक्रिया मोफत केली असून आमच्यावर आर्थिक भार येऊ दिला नाही. शस्त्रक्रियेनंतर विभक्त झाल्यावर आम्हाला कोणतीही समस्या आली नाही आणि सामान्य मुलांप्रमाणे आम्ही त्यांची काळजी घेत आहोत. अशी प्रतिक्रिया या बाळांच्या पालकांनी व्यक्त केली.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र मुंबई

छातीपासून बेंबीपर्यंत जोडलेल्या होत्या १४ दिवसांच्या जुळ्या मुली, वाडिया रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया

मुंबई – परेल येथील बाई जेरबाई वाडिया हॉस्पीटलमध्ये जन्माला आलेल्या जुळ्या मुली छातीपासून ते बेंबीपर्यत जोडलेल्या होत्या. त्यांना वेगळे करण्यासाठी डॉक्टरांच्या विशेष टीमला तब्बल...
Read More
post-image
महाराष्ट्र

सीमाभागातील नागरिक पिढ्यानपिढ्या यातना सहन करत आलेत- शरद पवार

मुंबई – बेळगाव, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे” ही संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील मागणी अजूनही अपूर्ण असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यासह राजकीय नेत्यांनी कर्नाटकव्याप्त...
Read More
post-image
महाराष्ट्र मुंबई

भांडण झाल्याने प्रियकराने प्रेयसी समोरच मारली खाडीत उडी

नवी मुंबई – नवी मुंबईतील वाशी खाडीपुलावर काल रात्री 10 वाजेच्या सुमारास रवी रेड्डी या तरुणाने भांडण झाल्याने प्रेयसी समोरच वाशीच्या खाडीपुलावरून उडी मारली....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा देश

सौरव गांगुली पुन्हा रुग्णालयात दाखल

कोलकाता – बीबीसीआयचे अध्यक्ष आणि टीम इंडियाचे माजी क्रिकेट कर्णधार सौरव गांगुली यांची तब्येत पुन्हा बिघडली आहे. सौरव गांगुली यांच्या आज अचानक छातीत दुखू...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

कर्नाटकव्याप्त भूभाग महाराष्ट्रात आणणारच, मुख्यमंत्र्यांची ग्वाही

मुंबई – कर्नाटकव्याप्त भूभाग महाराष्ट्रात आणणारच असा निर्धार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. “मला आता नुसत्या रडकथा नकोत, तर जिंकण्याच्या दृष्टीने प्रत्येक पाऊल...
Read More