येत्या काळात निवडणुकांसाठी काय असतील नियम? निवडणूक आयोगाची नियमावली जाहीर – eNavakal
देश

येत्या काळात निवडणुकांसाठी काय असतील नियम? निवडणूक आयोगाची नियमावली जाहीर

नवी दिल्ली – कोरोना काळात निवडणुकांचं आयोजन कसं करावं हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, यावर उपाय म्हणून निवडणूक आयोगाने याबाबात नियमावली जारी केली आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर पाळावयाच्या नियमांसोबतच इतर अनेक नियम या नियमावलीत समाविष्ट करण्यात आले आहे.

येत्या काही दिवसांत बिहारमध्ये निवडणुका होणार आहेत. त्यामुळे तेथील राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाकडूनही याची तयारी सुरू करण्यात आली आहे. कोरोना काळात डोर टू डोर कँपेनिंग करताना उमेदवार आपल्या सोबत जास्तीत जास्त 5 लोकांना नेऊ शकणार आहे. गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार सार्वजनिक सभा आणि रोड शो ला परवानगी देण्यात आली आहे. बिहार विधानसभेचा कालावधी 29 नोव्हेंबरला संपतोय, त्या पार्श्वभूमीवर ही नियमावली जाहीर करण्यात आली आहे.

पाहुयात काय आहेत नियम?

  • उमेदवाराचा अर्ज भरताना त्याच्यासोबत केवळ दोनच व्यक्तींना जाण्यास परवानगी.
  • मतदान करायला गेल्यावर तिथे कोरोनाची लक्षणं दिसल्यास मतदाराला एक टोकन देऊन परत पाठवलं जाईल, सर्वात शेवटी त्याचं मतदान नोंदवलं जाईल
  • मतदान कक्षात रजिस्टरवर सही करण्यासाठी, ईव्हीएमचं बटण करण्यासाठी मतदाराला ग्लोव्हजची व्यवस्था केली जाईल.
  • सर्व मतदारांनी चेहऱ्याला मास्क लावूनच मतदानाला यावं, फक्त मतदान कक्षात प्रवेश करण्याआधी त्यांना मास्क काढून ओळख पटवावी लागेल. रांगेत उभं राहतानाही सोशल डिस्टन्सिंगनं राहावं लागेल.
  • एका मतदान केंद्रावर जास्तीत जास्त 1 हजार लोकांचंच मतदान ठेवलं जाईल, याआधी ही मर्यादा दीड हजार इतकी होती. कोरोना काळात कमी गर्दीसाठी हा उपाय केला जाईल.
  • मतदानाच्या प्रचारासाठी एखादं मैदान निश्चित करताना तिथे प्रवेश आणि निर्गमनाचे वेगवेगळे मार्ग आहेत का याची खात्री केली जाईल. मैदानावर लोकांना सोशल डिस्टन्सिंगचे मार्किंग करुनच बसवलं जाईल.
  • कोविड काळात जितक्या लोकांना परवानगी आहे, त्यापेक्षा अधिक लोक या सभेला एकत्रित येणार नाहीत यावर निवडणूक अधिकारी बारकाईनं लक्ष ठेवतील.
  • पोस्टल बॅलेटची सुविधा ही अपंग, 80 वर्षांपेक्षा अधिक वृद्धांसह कोविड पेशंट, होम क्वारंन्टाईन झालेले संशयित यांनाही दिली जाईल.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
देश

येत्या काळात निवडणुकांसाठी काय असतील नियम? निवडणूक आयोगाची नियमावली जाहीर

नवी दिल्ली – कोरोना काळात निवडणुकांचं आयोजन कसं करावं हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, यावर उपाय म्हणून निवडणूक आयोगाने याबाबात नियमावली जारी...
Read More
post-image
अर्थ देश

अनिल अंबानींची दिवाळखोरी, NCLTने दिले कारवाईचे आदेश

नवी दिल्ली – कर्ज फेडण्यास असमर्थ ठरल्याने अनिल अंबानी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. नॅशनल कंपनी लॉ ट्रायब्युनलने ( NCLT)अनिल धीरुभाई अंबानी ग्रुप (ADAG)चे मालक अनिल...
Read More
post-image
देश

श्रीशैलम जलविद्युत प्रकल्पात भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू

हैदराबाद – ठिकठिकाणी आगीच्या घडत असून तेलंगणातील श्रीशैलम जलविद्युत प्रकल्पातही गुरुवारी भीषण आग लागली होती. या आगीत जवळपास ९ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. गुरुवारी...
Read More
post-image
महाराष्ट्र मुंबई

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते डोंबिवलीतील कोविड रुग्णालयाचे ऑनलाइन उद्घाटन

कल्याण – एकजिनसीपणे संघटितपणे कोविड निर्मूलनाचे काम हाती घेतले आहे, त्‍यामुळे महाराष्‍ट्राला लवकरात लवकर या संकटातुन बाहेर काढू, असा आशावाद मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज व्‍यक्‍त केला. डोंबिवली जिमखाना, येथे...
Read More
post-image
मनोरंजन

तापसी पन्नू दिसणार आता खेळाडूच्या भूमिकेत

विविध साहसी भूमिका साकारणाऱ्या तापसी पन्नू आता एका खेळाडूची भूमिका साकारणार आहे. भारताची वेगवान धावपट्टू रश्मीचा लवकरच बायोपिक येणार असून या चित्रपटात तापसी रश्मीची...
Read More