नंदुरबार – खान्देशात मोठी राजकीय उलथापालथ होणार असल्याचे चिन्ह दिसत आहेत. भाजप नेते विजयकुमार गावित यांची राष्ट्रवादीत घरवापसी होणार अशी शक्यता आहे. कॉंग्रेसने नंदुरबार मतदारसंघ सोडला तर विजयकुमार यांची घरवापसी होऊ शकते. गावितांसाठीच राष्ट्रवादीने नंदुरबार मतदारसंघावर दावा केला आहे. गावित यांच्यासोबतच त्यांची मुलगी हीना देखील राष्ट्रवादीत परतणार अशी चर्चा आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर खान्देशात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. तर दुसरीकडे एकनाथ खडसेंनी देखील भाजपा सोडण्याचे संकेत दिले आहेत. कुणी एकाच पक्षाचा शिक्का लावून राहत नाही असे वक्तव्य खडसेंनी केले आहे.
