केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोदी सरकारकडून मोठं दिवाळी गिफ्ट, दसऱ्यापर्यंत खात्यात जमा होणार बोनस – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश

केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोदी सरकारकडून मोठं दिवाळी गिफ्ट, दसऱ्यापर्यंत खात्यात जमा होणार बोनस

नवी दिल्ली – केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोदी सरकारने दिवाळी गिफ्ट दिलं आहे. मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने आज 30 लाख कर्मचाऱ्यांना दिवाळीचं गिफ्ट दिलं आहे. मोदींच्या कॅबिनेटने आज 2019-2020 साठी प्रोडक्टिव्हिटी लिंक्ड बोनस (पीएलबी) आणि नॉन-प्रोडक्टिव्हिटी लिंक्ड बोनसला मंजुरी दिली आहे.

कॅबिनेटच्या या निर्णयांबाबत माहिती देताना केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले की, केंद्रीय कर्मचाऱ्यांना 3,740 कोटी रुपयांचा बोनस दिला जाणार आहे. 30 लाख कर्मचाऱ्यांना बोनसची रक्कम दसऱ्यापर्यंत त्यांच्या खात्यावर जमा झालेली पाहायला मिळेल.

केंद्र सरकारने रेल्वे, टपाल, संरक्षण, EPFO, ESIC सारख्या वाणिज्यिक आस्थापनांमधील विना-राजपत्रित कर्मचार्‍यांना 2019-2020 साठी प्रोडक्टिव्हिटी लिंक्ड बोनस (PLB) देण्यास मान्यता दिली आहे. यावर 2,791 कोटी रुपये खर्च होणार आहे.

तर, केंद्र सरकारच्या विना-राजपत्रित कर्मचार्‍यांना नॉन-पीएलबी किंवा अ‍ॅडहॉक बोनस मंजूर करण्यात आले आहेत. याचा फायदा 13.70 लाख कर्मचार्‍यांना होईल आणि त्यावर एकूण 946 कोटी रुपये खर्च होणार आहेत.

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 12 ऑक्टोबर रोजी सणासुदीच्या आधी अर्थव्यवस्थेला 73,000 कोटी रुपये देण्याची घोषणा केली होती. एलटीसी कॅश व्हाउचर योजना आणि केंद्र सरकार तसेच सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचार्‍यांसाठी विशेष फेस्टीव्हल अ‍ॅडव्हान्स स्कीम या दोन योजना सुरू करण्यात आल्या आहेत.

केंद्र सरकारचा कर्मचारी आता एलटीसीसाठी पात्र आहे, तसेच तो चार वर्षांच्या कालावाधीत दोनदा स्वतःच्या गावी किंवा इतर कोणत्याही ठिकाणी जाण्यासाठी दहा दिवसांचे पैसे घेऊ शकतो.

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर प्रवास करण्यास मर्यादा आल्या आहेत, त्यामुळे आता केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांना एलटीसी भाड्याच्या तुलनेत रोख रकमेचा पर्याय उपलब्ध करुन दिला आहे. कर्मचारी आता एलटीए किंवा एलटीसीच्या करमुक्त भागाच्या बदल्यात वस्तू व सेवा खरेदी करण्यास पात्र आहेत.

 

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
News महाराष्ट्र मुंबई

कल्याण डोंबिवलीत  २२१ नवे रुग्ण तर ७ जणांचा मृत्यू

कल्याण – कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज नव्या २२१ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ७ जणांचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत ३०१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे....
Read More
post-image
महाराष्ट्र

पंकजा मुंडेंनी आता शिवसेनेत यावं, अर्जुन खोतकरांचं आवाहन

जालना -भाजपला रामराम ठोकल्यानंतर एकनाथ खडसे याांनी राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेण्याचे ठरवले आहे. त्यामुळे शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोदी सरकारकडून मोठं दिवाळी गिफ्ट, दसऱ्यापर्यंत खात्यात जमा होणार बोनस

नवी दिल्ली – केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोदी सरकारने दिवाळी गिफ्ट दिलं आहे. मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने आज 30 लाख कर्मचाऱ्यांना दिवाळीचं गिफ्ट दिलं आहे....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

“चिल्लर… थिल्लर, जे काही असेल त्याकडे बघायला मला वेळ नाही,” फडणवीसांना ठाकरेंचा टोला

सोलापूर – राज्यातील विविध भागात परतीच्या पावसानं शेतमालाच प्रचंड नुकसान झालं असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या अतिवृष्टीचा फटका बसलेल्या भागांचा दौरा करत आहेत. सोलापूर...
Read More
post-image
News आघाडीच्या बातम्या देश महाराष्ट्र मुंबई

“बाबांच्या निर्णयाचं दुःख, पण मी भाजपमध्येच राहणार”, रक्षा खडसेंची प्रतिक्रिया

मुंबई – भाजपविरोधातील नाराजी खुलेआम उघड करणारे एकनाथ खडसे यांनी अखेर भाजपला रामराम ठोकला. त्यांच्या या निर्णयामुळे सर्वच स्थरातून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे....
Read More