२१ दिवसांत ७१७ दशलक्ष डॉलर्सची रक्कम भरा; न्यायालयाचे अंबानींना आदेश – eNavakal
आघाडीच्या बातम्या विदेश

२१ दिवसांत ७१७ दशलक्ष डॉलर्सची रक्कम भरा; न्यायालयाचे अंबानींना आदेश

मुंबई – २०१२ सालच्या व्यावसायिक कर्ज प्रकरणी रिलायन्स (एडीजी) समूहाचे प्रमुख अनिल अंबानी यांच्या अडचणीत आता आणखी वाढ झाली आहे. लंडनमधील एका न्यायालयाने अंबानी यांना २१ दिवसांत चीनच्या तीन बँकांना ७१७ दशलक्ष डॉलरची रक्कम परतफेड करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे अनिल अंबानींची डोकेदुखी आणखी वाढली आहे.

सदर प्रकरणात अनिल अंबानी यांनी वैयक्तिक कर्जाची हमी दिली होती. त्यामुळे त्यांना ही रक्कम भरावीच लागणार असल्याचं हायकोर्ट ऑफ इंग्लडन अँड वेल्सच्या व्यावसायिक विभागाचे न्यायमूर्ती नीगेल टियरे यांनी सांगितलं आहे. त्यामळे एकूण रक्कम ७१ कोटी ६९ लाख १७ हजार ६८१ डॉलर्स इतकी असून ती अनिल अंबानी यांना भरावी लागणार असल्याचं टियरे यांनी म्हटलं आहे.

काय आहे प्रकरण 

इंडस्ट्रियल अँड कमर्शिअल बँक ऑफ चीन लि. चीन डेव्हलपमेंट बँक आणि एक्स्पोर्ट-इम्पोर्ट बँक ऑफ चीनने २०१२ मध्ये अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कम्युनिकेशनला ९२५.२० मिलियन डॉलर (६४,७५० कोटी रु) कर्ज दिले होते. त्यावेळी अनिल अंबानी यांनी कर्जाची वैयक्तिक हमी देण्याबात म्हटले होते. पंरतु २०१७ नंतर अंबानी यांची कंपनी कर्ज फेडण्यास अपयशी ठरली. दरम्यान अंबानी यांनी हे कर्ज वैयक्तिकरित्या घेतलं नव्हतं, असं त्यांच्या प्रवक्त्यांनी म्हटलं आहे. तर अनिल अंबानी सध्या अन्य कायदेशीर बाबींची चर्चा करत आहेत. त्यानंतर ते पुढील कार्यवाही करतील, असं त्यांच्या प्रवक्त्यांनी म्हटलं आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
विदेश

अमेझॉनच्या जंगलातही पोहोचला कोरोना; ९८० आदिवासींना लागण

ब्रासिलिया – कोरोनाने जगभरात थैमान घातले आहे. पण आता ज्याठिकाणी लोक कधीही उत्स्फूर्तपणे जात नाहीत, तिथे जाणे टाळतात. अशा जंगल भागातही कोरोना पोहोचला आहे....
Read More
post-image
महाराष्ट्र

रंकाळा तलावाच्या स्वच्छतेला सुरूवात; पाण्यातून काढले ५०० नारळ

कोल्हापूर – कोल्हापूरच्या रंकाळा तलावाच्या स्वच्छतेला सुरूवात झाली आहे. तलावात तांबट कमान परिसरात पडलेल्या पूजाअर्चेच्या साहित्यामुळे प्रदुषणामध्ये भर पडत होती. त्यामुळे येथे मासे, कासव मृत...
Read More
post-image
महाराष्ट्र

साताऱ्यात २४ तासांत २७ जण कोरोना पॉझिटिव्ह; तर दोघांचा मृत्यु

सातारा – सातारा जिल्ह्यात गेल्या २४ तासांत २७जण पॉझिटिव्ह आल्याने आता कोरोनाबाधितांचा आकडा ३३६ वर पोहचला आहे. तसेच या कालावधीत वाई तालुक्यातील दोन कोरोनाबाधीत...
Read More
post-image
मनोरंजन

ईदनिमित्त भाईजानकडून ५,००० कुटुंबांना अन्नदान

मुंबई – सध्या राज्यात लॉकडाऊन आहे. त्याचा मोठा फटका बहुतांश मजुरांना बसला आहे. अशा संकटाच्या काळात ईदच्या दिवशी कुणीही उपाशी राहू नये. यासाठी अभिनेता...
Read More
post-image
अपघात

कोपरगाव -सिन्नरच्या सीमेवर ट्रकने चेकपोस्टला उडवले

शिर्डी – कोपरगाव -सिन्नर तालुक्यातील सीमेवर पाथरे फाटा येथे लावण्यात आलेल्या चेकपोस्ट जवळच्या तंबूत नाशिकहून भरधाव येणारा ट्रक काल रात्री घुसला आणि कर्तव्यावर असलेले...
Read More