मुंबई महानगर क्षेत्रातील वीज खंडित प्रकरणी मुख्यमंत्र्यांचे तातडीने चौकशीचे आदेश – eNavakal
Uncategoriz महाराष्ट्र

मुंबई महानगर क्षेत्रातील वीज खंडित प्रकरणी मुख्यमंत्र्यांचे तातडीने चौकशीचे आदेश

मुंबई – मुंबई महानगर क्षेत्रातील वीज खंडित झाल्याच्या घटनेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली असून तातडीने या घटनेची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. ऊर्जा मंत्री डॉ नितीन राऊत यांच्याशी देखील त्यांनी चर्चा केली व मुंबई तसेच मुंबई महानगर क्षेत्रातील वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने सर्वतोपरी प्रयत्न करावेत अशा सूचना दिल्या. भविष्यात परत अशी घटना घडू नये यासाठी सतर्कता बाळगावी असेही त्यांनी सांगितले.

मुंबईतील संपूर्ण वीज जाण्याच्या घटनेमागे कोणते तांत्रिक दोष आहेत तसेच कोण जबाबदार आहेत त्याबाबत चौकशी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. दरम्यान सकाळी मुख्यमंत्र्यांनी रुग्णालयांना वीज पुरवठा अबाधित राहण्यासाठी पर्यायी व्यवस्था सुरळीतपणे सुरू राहावी जेणे करून अडचण होणार नाही याबाबत महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनाही सूचना दिल्या.

या सर्व काळात वीज पुरवठा खंडित असल्याने इतर काही अपघात होणार नाहीत यादृष्टीने नियंत्रण कक्ष, अग्निशमन दल यांनी सतर्क राहावे व तात्काळ मदत करावी असेही त्यांनी मुख्य सचिव व मंत्रालय नियंत्रण कक्षास सांगितले.

उपनगरीय रेल्वेला याचा फटका बसला असून तिथेही प्रवाशांच्या मदतीला तात्काळ धावून जाण्याबाबत रेल्वे प्रशासनाशी समन्वय साधावा असेही त्यांनी निर्देश दिले

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
Uncategoriz महाराष्ट्र

मुंबई महानगर क्षेत्रातील वीज खंडित प्रकरणी मुख्यमंत्र्यांचे तातडीने चौकशीचे आदेश

मुंबई – मुंबई महानगर क्षेत्रातील वीज खंडित झाल्याच्या घटनेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली असून तातडीने या घटनेची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश महाराष्ट्र

मोदी सरकारकडून उत्सव योजना जाहीर, केंद्रीय कर्मचाऱ्यांना उत्सवांसाठी मिळणार 10 हजार रुपये ऍडव्हान्स

नवी दिल्ली – अर्थव्यवस्थेला पुन्हा एकदा उभारी देण्यासाठी केंद्र सरकारनं आर्थिक उपाययोजना हाती घेतल्या आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सरकारकडून करण्यात येणाऱ्या...
Read More
post-image
महाराष्ट्र

सत्तेसाठी ठाकरे सरकार आंधळे-बहिरे झाले, चंद्रकांत पाटलांची टीका

पुणे – महिलांवरील अन्याय अत्याचाराच्या घटना राज्यात घडत आहेत. या घटनांच्या पार्श्वभूमीवर सरकारने तातडीने निर्णय घ्यावा. मात्र, सरकार याबाबत काही करताना दिसत नाही. उद्धव ठाकरे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

जवळपास अडीच तासांनी मुंबई, उपनगरांतील वीजपुरवठा हळूहळू सुरू

मुंबई – देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईसह ठाणे, कल्याण आणि नवी मुंबई परिसरातील वीजपुरवठा आज सकाळी दहाच्या सुमारास खंडित झाला. मुंबईमध्ये वीजपुरवठा करणाऱ्या महावितरण,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

मुंबईतील रुग्णालयांमधील वीज पुरवठा खंडित नाही – आयुक्त

मुंबई – गेल्या काही तासांपासून मुंबई आणि लगतच्या परिसराचा वीजपुरवठा ठप्प झाला आहे. महत्त्वाचे म्हणजे आयसीयूमधील वीज पुरवठ्यावर परिणाम झालेला नसून आठ तास वीज...
Read More