वॉशिंग्टन – काही विशिष्ट परिस्थितीत पोलीस करत असलेल्या ‘चॉकहोल्ड’ तंत्राचा वापर थांबवला गेला पाहिजे, असे सूतोवाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे. ‘चॉकहोल्ड’ एखादया व्यक्तीवर नियंत्रण आणण्यासाठी त्याच्या गळ्यावर हाताने घट्ट करण्याचे तंत्र आहे. पोलीस त्याचा वापर क्वचित प्रसंगी करत असतात.
टॉक्स फॉक्स न्यूज चॅनलला दिलेल्या एका मुलाखतीत डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, मला चॉकहोल्ड आवडत नाही, हे तंत्र थांबवलेच पाहिजे. मात्र पोलीस अधिकारी जेव्हा एकटे असतात आणि ते अनेक लोकांशी लढत असतात त्यावेळी अशा तंत्रास ट्रम्प यांनी पाठिंबा दर्शविला आहे. ते म्हणाले, अशा परिस्थितीत पोलीस त्याचा वापर करू शकतील. जॉर्ज फ्लॉईड यांच्या मृत्यूनंतर चॉकहोल्डबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.