एअरटेल, वोडाफोन, आयडिया कंपन्यांच्या योजनावर “ट्राय”ची बंदी – eNavakal
अर्थ देश

एअरटेल, वोडाफोन, आयडिया कंपन्यांच्या योजनावर “ट्राय”ची बंदी

नवी दिल्ली – खासगी दूरसंचार क्षेत्रामध्ये अंबानींच्या जिओ कंपनीने इतर कंपन्यांना हादरवून सोडले आहे. त्यामुळे आपले ग्राहक जपण्यासाठी भारती एअरटेल, वोडाफोन आणि आयडिया या कंपन्यांनी विशेष ग्राहकांना जास्त स्पीडची इंटरनेट सेवा देण्‍याची प्रीमियम योजना जाहीर केली आहे. हा सरळ सरळ इंटरनेटच्या बाबतीत ग्राहकांमध्ये केला जाणारा भेदभाव असून नेट तटस्थता (न्यूट्रीआलीटी) संपविण्याच्या आणि इंटरनेटचा बाबतीत भेदभाव करणाऱ्या खाजगी दूरसंचार कंपन्यांच्या प्रयत्नांना दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजेच “ट्राय”ने लगाम लावला आहे. भारती एअरटेल, आयडिया आणि वोडाफोन यांनी या योजना बंद कराव्यात, असे आदेश “ट्राय” ने दिले आहेत.

वाचा – डिजिटल भारतासाठी गुगलची ७५ हजार कोटींची गुंतवणूक, सुंदर पिचाई यांची घोषणा

भारती एअरटेल वोडाफोन आणि आयडिया या कंपन्यांनी विशेष ग्राहकांसाठी जास्त मूल्य घेऊन वेगवान इंटरनेट सेवा देण्‍याच्या योजना जाहीर केल्या आहेत.अन्य ग्राहकांच्या सेवांचा दर्जा कमी करून विशेष ग्राहकांना चांगली सेवा देण्याचे आमिष खासगी दूरसंचार कंपन्या दाखवीत आहेत काय? असा सवाल “ट्राय”ने उपस्थित केला आहे. हाच सवाल यापूर्वी अनेक ग्राहक विचारीत होते. “ट्राय”ने याची दखल घेऊन भारती एअरटेल, आयडिया, वोडाफोन या दूरसंचार कंपन्यांना त्यांच्या या प्रीमियम योजना परत घेण्याचे आदेश दिले आहेत. तसेच “ट्राय”ने या विशेष योजनांची माहिती भारती एअरटेल, वोडाफोन व आयडिया या कंपन्यांकडून मागविली आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र

तंत्रशिक्षण प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया १० ऑगस्टपासून

मुंबई – शैक्षणिक वर्ष २०२०-२१ करिता तंत्रशिक्षण (पॉलिटेक्निक ) प्रथम वर्ष  पदविका अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया १० ते २५ ऑगस्ट २०२० या कालावधीत राबविण्यात येणार आहे....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा देश विदेश

गुड न्यूज! भारतात २०२१ साली विश्वचषक होणार

मुंबई – भारतामध्ये होणारा विश्वचषक वेळेनुसार २०२१ साली होणार आहे. आज झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत याबाबत चर्चा करण्यात आली. आयसीसीने काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियामधील ट्वेन्टी-२० विश्वचषक...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या कोरोना महाराष्ट्र मुंबई

आज राज्यात 10 हजारपेक्षा जास्त रुग्णांची नोंद, तर 300 मृत्यू

मुंबई – राज्यात आज 10 हजार 483 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 4 लाख 90 हजार 262 वर पोहोचला आहे....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

खासगी रुग्णालयांच्या मनमानीला बसणार चाप, भरारी पथके नेमण्याचे आदेश

मुंबई – राज्यात कोरोनाच्या उपचारासाठी खासगी रुग्णालयांकडून आणि रुग्णवाहिकांकडून वाजवी शुल्क आकारण्याबाबत राज्य शासनाने वेळोवेळी निर्देश दिले आहेत. यासर्व निर्देशांच्या अंमलबजावणीसाठी आणि तपासणीसाठी राज्यात...
Read More
post-image
महाराष्ट्र

कल्याण डोंबिवलीत २३९  नवे रुग्ण तर ९ जणांचा मृत्यू

कल्याण – कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज २३९ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ९ जणांचा मृत्यू झाला असून ३२७  जणांना गेल्या २४...
Read More