मुंबई – आयपीएस अधिकारी परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या 100 कोटीच्या वसुलीप्रकरणी आता CBI अॅक्शन मोडमध्ये आली आहे. कारण आता कोर्टाच्या निर्देशानंतर CBI ने NIA च्या अटकेत असलेल्या सचिन वाझेसह एकूण 4 जणांचा जबाब नोंदवला आहे.
यावेळी सीबीआयने सचिन वाझे, ACP संजय पाटील यांच्यासह मुंबईचे माजी आयुक्त परमबीर सिंग आणि याचिकाकर्त्या जयश्री पाटील यांचा जबाब नोंदविण्यात आला आहे. आता या चारही जणांनी आपल्या जबाबात नेमकं काय म्हटलं आहे यावर पुढील चौकशी अवलंबून राहणार आहे. तसंच माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचंही भवितव्य याच चौकशीवर अवलंबून आहे.