राज्यात आज २०९१ नवे रुग्ण; आतापर्यंत १६ हजाराहून अधिक जण कोरोनामुक्त – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

राज्यात आज २०९१ नवे रुग्ण; आतापर्यंत १६ हजाराहून अधिक जण कोरोनामुक्त

मुंबई -राज्यात आज नव्या २०९१ कोरोना रुग्णांची नोंद झाली असून २४ तासांत ९७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आज ११६८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत १६ हजार ९५४ जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णसंख्या आता ५४, ७५८ इतकी झाली असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली आहे.

राज्यात एकूण ३६००४ एक्टीव्ह रुग्ण आहेत. कोरोनाची ही स्थिती दिवसेंदिवस अधिक कठीण होत असून आरोग्य यंत्रणेचा ताण देखील वाढ आहे. त्यामुळे राज्यातील राजकारण देखील तापलं आहे. कोरोनाच्या सस्थितीवरूनच विरोधकांनी ठाकरे सरकारला घेरलं आहे. तर राज्य सरकार कोरोनाची स्थिती नियंत्रणात आण्यासाठी आपल्या परीने प्रयत्न करत असल्याचं दिसत आहे.

मृतांची माहिती

राज्यात ९७ करोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये ३९ मृ्त्यू मुंबईत, ठाण्यात १५, कल्याण डोंबिवलीत १०, पुण्यात ८, सोलापुरात ७, औरंगाबादमध्ये ५, मीरा भाईंदरमध्ये ५, मालेगावमध्ये ३, उल्हासनगरमध्ये ३ आणि नागपुरात १ मृत्यूची नोंद झाली आहे.

आज झालेल्या ९७ मृ्त्यूंमध्ये ६३ पुरुष तर ३४ महिला होत्या. त्यामुळे एकूण मृतांची संख्या १७९२ इतकी झाली आहे. एकूण मृत्यूंपैकी ३७ रुग्ण हे ६० वर्षे किंवा त्यावरच्या वयाचे होते. तर ४९ रुग्ण हे ४० ते ५९ या वयोगटातले होते. ११ जण ४० वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयाचे होते. ९७ पैकी ६५ रुग्णांना मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग असे गंभीर आजार होते.

एकूण मृत्यूंपैकी ३५ मृत्यू हे मागील दोन दिवसांमधले आहेत. तर उर्वरित मृत्यू हे १७ ते २३ एप्रिल ते २३ मे या कालावधीतले आहेत. आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या ३ लाख ९० हजार १७० नमुन्यांपैकी ५४ हजार ७५८ चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत इतर निगेटिव्ह आल्या आहेत. सध्या राज्यात ५ लाख ६७ हजार ६२२ जण होम क्वारंटाइन आहेत. तर ३५ हजार २०० लोक संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र

राज्याला पंधराव्या वित्त आयोगातील १ हजार ४५६ कोटी रुपये प्राप्त

मुंबई – राज्यामधील ग्रामपंचायती, पंचायत समिती व जिल्हा परिषदांसाठी पंधराव्या वित्त आयोगातील 1 हजार 456 कोटी 75 लाख रुपयांचा बंधीत निधी काल प्राप्त झाला...
Read More
post-image
महाराष्ट्र

कुपोषणमुक्तीसाठी सकस आहार पुरवठ्याला गती देणार – मंत्री ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती – कोरोना संकटकाळात निर्माण झालेल्या विविध अडचणींचा सामना करत शासन- प्रशासनाने विविध सुविधा व योजनांना चालना दिली. प्रभावी उपचारयंत्रणेसाठी प्रयोगशाळा, प्लाझ्मा सुविधा, कोविड...
Read More
post-image
देश

चीनचा डोळा आता हिंद महासागरावर,पाकिस्तानच्या बंदरात खलबतं सुरू

मुंबई -चीन भारतविरोधी सतत कारवाया करत असून आता चीनचा हिंद महासागरावरही डोळा आहे. दक्षिण चीन समुद्रात चीनची नाकाबंदी सुरु झाल्यामुळे चीननं ही नवी चाल...
Read More
post-image
Uncategoriz देश शिक्षण

स्कूल फ्रॉम होममुळे ७२.८% विद्यार्थ्यांच्या दैनंदिन प्रक्रियेवर परिणाम, सर्वेक्षण

मुंबई – लॉकडाऊनच्या काळात स्कूल फ्रॉम होम सुरू झाले आहे. मात्र या नव्या पद्धतीचं शिक्षण घेताना विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांना कसरत करावी लागत...
Read More
post-image
देश

‘या’ आयटी कंपनीत ५०० कर्मचारी कपात, भारतीय परदेशातून परतणार

नवी दिल्ली -भारतातील अनेक तंत्रकुशल नागरिक इंग्लड, अमेरिकेसारख्या देशात नोकरीसाठी वात्सव्यास आहेत. मात्र कोरोनाच्या काळात त्यांच्या नोकरीवर गदा येण्याची शक्यता आहे. कारण, का आघाडीच्या आयटी...
Read More