मोठ्याप्रमाणात लसीकरणासाठी ११ ते १४ एप्रिल दरम्यान टीका उत्सव राबवा, पंतप्रधानांचे सर्व मुख्यमंत्र्यांना आवाहन – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश महाराष्ट्र

मोठ्याप्रमाणात लसीकरणासाठी ११ ते १४ एप्रिल दरम्यान टीका उत्सव राबवा, पंतप्रधानांचे सर्व मुख्यमंत्र्यांना आवाहन

नवी दिल्ली – देशात लसीकरणाची जनजागृती होण्याकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ ते १४ एप्रिल दरम्यान टीका उत्सवाचे आयोजन केले आहे. ११ एप्रिलला महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आहे तर १४ एप्रिलला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. त्यामुळे या चार दिवसांच्या काळात देशात मोठ्या प्रमाणात टीका उत्सावादरम्यान लसीकरण मोहीम राबवावी. या मोहिमेत देशात एकही लस खराब होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशभरातील मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. या संवादादरम्यान राज्याराज्यात काय उपयायोजना राबवायला हव्यात यावर भाष्य केले.

वाचा  कोविडच्या लढाईत महाराष्ट्र कुठेही मागे नव्हता आणि राहणार नाही, ठाकरेंचे मोदींना आश्वासन

मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत पंतप्रधान मोदी यांनी कोरोनापासून बचावासाठी सूचना मागितल्या आहेत. देशात पुन्हा एकदा आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झालीय. काही राज्यात चिंताजनक स्थिती असल्याचं पंतप्रधान यावेळी म्हणाले. देशाने कोरोना संसर्गाची पहिली लाट पार केली. पण दुसरी लाट पहिल्यापेक्षा प्रभावी आहे. सर्वांसाठी हा चिंतेचा विषय आहे. यावेळी देशातील नागरिकही पहिल्यापेक्षा जास्त बिनधास्त बनले आहेत. त्यामुळे आपल्याला पुन्हा एकदा युद्ध पातळीवर काम करणं गरजेचं असल्याचं मत पंतप्रधानांनी या बैठकीत मांडलं. कोरोनाला रोखण्यासाठी जनतेच्या भागिदारीसह आपले डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचारी आजही त्यात ऊर्जेने काम करत असल्याचंही मोदी यावेळी म्हणाले.


मायक्रो कंटेन्मेंट झोनवर लक्ष गरजेचं

जगभरात रात्रीची संचारबंदी स्वीकारण्यात आलीय. आता आपल्याला हा नाईट कर्फ्यू कोरोना कर्फ्यू म्हणून लक्षात ठेवावा लागेल. त्याचबरोबर कोरोना रोखण्यासाठी आपल्याला मायक्रो कंटेन्मेंट झोनवर लक्ष केंद्रीत करणं गरजेचं असल्याचंही मोदी म्हणाले. यावेळी आपल्याकडे कोरोनाशी लढा देण्यासाठी सर्व उपाय उपलब्ध आहेत. आता कोरोना प्रतिबंधक लसही आहे, असं सांगताला लोकांच्या हलगर्जीपणावर मात्र मोदींना नाराजी व्यक्त केली आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

राज्यात रुग्णवाढ कायम! आज 56 हजार रुग्ण सापडले, डिस्चार्ज रुग्णांचीही संख्या जास्त

मुंबई – राज्यात कोरोनाचा धोका कमी झालेला नसून आज दिवसभरात तब्बल 56 हजार 286 बाधितांची वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून रुग्णवाढ होत असल्याने...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

कोविडच्या लढाईत महाराष्ट्र कुठेही मागे नव्हता आणि राहणार नाही, ठाकरेंचे मोदींना आश्वासन

मुंबई – संपूर्ण देश कोविडशी लढत असताना महाराष्ट्र देखील कुठेही मागे नव्हता आणि नाही हे ठामपणे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देशातील सर्व पक्षांच्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश महाराष्ट्र

मोठ्याप्रमाणात लसीकरणासाठी ११ ते १४ एप्रिल दरम्यान टीका उत्सव राबवा, पंतप्रधानांचे सर्व मुख्यमंत्र्यांना आवाहन

नवी दिल्ली – देशात लसीकरणाची जनजागृती होण्याकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ ते १४ एप्रिल दरम्यान टीका उत्सवाचे आयोजन केले आहे. ११ एप्रिलला महात्मा...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

कोणत्याही अटी-शर्थींशिवाय नक्षलवाद्यांनी जवानाला सुरक्षित सोडलं

रायपूर – छत्तीसगडमध्ये झालेल्या नक्षलवाद्यांच्या हल्ल्या २२ जवान शहीद झाले होते. यामध्ये एक जवान नक्षलवाद्यांच्या तावडीत सापडला होता. या जनावाला सोडवण्यासाठी हरतर्हेचे प्रयत्न सुरू...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

सीबीआयने सचिन वाझेंसह चौघांचा जबाब नोंदवला, अनिल देशमुखांचे भवितव्य टांगणीला

मुंबई – आयपीएस अधिकारी परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या 100 कोटीच्या वसुलीप्रकरणी आता CBI अॅक्शन मोडमध्ये आली आहे. कारण आता कोर्टाच्या...
Read More