सिनेमागृह लवकरच सुरू होणार, एसओपी तयार; मुख्यमंत्र्यांचे आश्वासन – eNavakal
Uncategoriz आघाडीच्या बातम्या मनोरंजन महाराष्ट्र

सिनेमागृह लवकरच सुरू होणार, एसओपी तयार; मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

मुंबई – राज्यातील सिनेमागृहे सुरु करण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाने पुढाकार घेऊन याबाबत एसओपी (आदर्श कार्यपद्धती) तयार केल्या आहेत. या एसओपी निश्चित झाल्यावर सिनेमागृहे सुरु करण्याबाबत विचार करण्यात येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

वाचा  बॉलिवूडला संपवण्याचे किंवा इतरत्र हलवण्याचे प्रकार सहन केले जाणार नाहीत, मुख्यमंत्र्यांचा इशारा

कोविड – १९ मुळे राज्यातील सिनेमागृहे गेल्या सहा महिन्यांहून अधिक काळ बंद असून याअनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी मल्टिप्लेक्स, सिनेमागृहे मालकांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे चर्चा केली. यावेळी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी राज्यातील सिनेमागृहे लवकरच सुरू करण्याबाबत आश्वस्त केले.


मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले की, राज्यातील कोविड – १९ चे संकट मोठे असून या संकटकाळात सिेनमागृहांचे मालक शासनासोबत आहेत याचे समाधान आहे. सिनेमा चालण्यासाठी सिनेमागृहांची आवश्यकता असते हे जरी खरे असले तरी महाराष्ट्राने पुनश्च: हरिओम करीत कामगारांना काम मिळावे यासाठी उद्योग क्षेत्र सुरु केले. त्यानंतर हॉटेल, रेस्टॉरंट ५० टक्के क्षमतेने सुरु करण्याबाबत नुकतीच परवानगी देण्यात आली. आता मेट्रो सेवा सुरु करण्यात आली आहे. रेल्वेमध्ये गर्दी होऊ नये यासाठी लोकलच्या फेऱ्याही वाढविण्यात आल्या आहेत. राज्यातील सिनेमागृहांबाबतही सकारात्मकता ठेवून निश्चित करण्यात आलेल्या एसओपीनुसार सिनेमागृहे सुरु करण्यात येतील. आतापर्यंत अनेक व्यवहार बंद होते ते आपण एकेक सुरू करत आहोत. मनोरंजन क्षेत्र हे राज्याच्या अर्थचक्राला गती देणारे क्षेत्र आहे. हे क्षेत्र बंद ठेवण्यात आपल्याला किंवा शासनाला आनंद नाही.

आपल्याला जगभरात काही देशांमध्ये कोविड – १९ चा संसर्ग वाढल्याने युरोप, ऑस्ट्रेलिया, स्वीडन यासारख्या ठिकाणी पुन्हा लॉकडाऊन करावा लागला. हिवाळ्यात कोविड- १९ चा प्रादुर्भाव वाढू शकतो असा इशारा देण्यात आल्याने आपल्याला काळजीपूर्वक पुढे जायचे आहे. महाराष्ट्रात आपण अनलॉक टप्प्याटप्प्याने करण्यामागे महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन करण्याची वेळ येऊ नये हाच उद्देश आहे. सिनेमागृहांमध्ये वातानुकुलित वातावरणात प्रेक्षक सिनेमा पहायला आल्यानंतर किमान दोन तास बंदिस्त ठिकाणी असतो त्यावेळी त्याला संसर्ग होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. सिनेमागृहांमधील स्वच्छता पाळली जाणे, सिनेमागृहे वेळोवेळी सॅनिटाईज करणे, सिनेमागृहात एकूण आसनक्षमतेच्या फक्त५० टक्के प्रेक्षक असणे याबाबी पाळल्या जाणे गरजेचे आहे.  एसओपीचे पालन, स्वच्छता, सुरक्षितता, प्रेक्षकांनी मास्क लावणे, सॅनिटाईज करणे आणि शारीरिक अंतर पाळणे हे गरजेचे असल्याचेही मुख्यमंत्री श्री. ठाकरे यावेळी म्हणाले.

 

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
Uncategoriz आघाडीच्या बातम्या मनोरंजन महाराष्ट्र

सिनेमागृह लवकरच सुरू होणार, एसओपी तयार; मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

मुंबई – राज्यातील सिनेमागृहे सुरु करण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाने पुढाकार घेऊन याबाबत एसओपी (आदर्श कार्यपद्धती) तयार केल्या आहेत. या एसओपी निश्चित झाल्यावर सिनेमागृहे सुरु...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन महाराष्ट्र

TRP SCAM: न्यूज चॅनल्सच्या रेटिंगला तीन महिने स्थगिती, BARC चा महत्त्वाचा निर्णय

नवी दिल्ली – टीआरपीमध्ये फेरफार केल्याप्रकरणी चॅनेल्सवर कारवाई करण्यात येत असतानाच ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काउंसिल अर्थात BARC ने मोठा निर्णय घेतला आहे. पुढचे ३ महिने...
Read More
post-image
देश

पबजी खेळताना झाली ओळख; तिघांकडून सामूहिक बलात्कार, व्हिडिओ दाखवून केले ब्लॅकमेल

भोपाळ – पबजी ऑनलाईन गेम खेळत असताना ओळख झालेल्या तरुणांनी एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एवढंच नव्हे तर, बलात्काराचा...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन महाराष्ट्र

बॉलिवूडला संपवण्याचे किंवा इतरत्र हलवण्याचे प्रकार सहन केले जाणार नाहीत, मुख्यमंत्र्यांचा इशारा

मुंबई  – अभिनेता सुशांत सिंहच्या मृत्यूप्रकरणानंतर बॉलिवूडमधील ड्रग्स प्रकरण उजेडात आले. यामुळे अनेक कलाकारांवर टीका करण्यात आली. अखेर या प्रकरणावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी...
Read More
post-image
News महाराष्ट्र राजकीय

…तर राज्यातील सर्व मदरसे बंद करा, अतुल भातखळकरांचे ठाकरेंना आवाहन

मुंबई –  राज्यातील धार्मिक स्थळे बंद असल्यामुळे राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले होते. या पत्राला उत्तर देताना आम्हाला हिंदुत्व सिद्ध करण्यासाठी कोणाच्याही प्रमाणपत्राची गरज नसल्याचं...
Read More