‌Breaking: यंदा अंतिम वर्षांच्या परीक्षा शक्यच नाहीत! आजच्या बैठकीत निर्णय – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‌Breaking: यंदा अंतिम वर्षांच्या परीक्षा शक्यच नाहीत! आजच्या बैठकीत निर्णय

मुंबई – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी मंत्रालयामध्ये राज्य आपत्ती व्यवस्थापन समितीची महत्त्वाची बैठक घेतली. त्यानंतर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी घोषणा केली की, राज्यात अंतिम वर्षांच्या परीक्षा न घेण्याच्या निर्णयावर ठाकरे सरकार ठाम आहे. आम्ही गेल्या आठवड्यात जो निर्णय घेतला तोच निर्णय कायम आहे. पुढील दोन महिने तरी ऑफलाइन किंवा ऑनलाईन परीक्षा घेता येणार नाहीत. त्यामुळे आम्ही यूजीसीला आवाहन करीत आहोत की, कृपया विद्यार्थ्यांना कोरोना महामारीच्या खाईत लोटू नका!

उदय सामंत यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले की, महाराष्ट्र सरकार अंतिम वर्षांच्या परीक्षा घेणारच नाही, असे आम्ही म्हटले नव्हते. फक्त परीक्षा घेणे शक्य नाही, असे आम्ही म्हटले होते. महाराष्ट्रात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या २,५४,००० पेक्षा जास्त आहे. आतापर्यंत १०,२८९ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. महाराष्ट्रात १२,१४९ कंटेनमेंट झोन आहेत. त्यामध्ये एक कोटी पेक्षा जास्त लोक बंद आहेत. अशावेळी साडेआठ लाख विद्यार्थ्यांना कोणाच्या संकटात लोटायचे का? कोरोना महामारी संपल्यावर महाराष्ट्र सरकार परीक्षा घ्यायला तयार आहे. मात्र पुढचे दोन महिने परीक्षा घेणे शक्य नाही. आम्हीच नव्हे तर दिल्ली, पश्चिम बंगाल हरियाणा तामिळनाडू मेघालय अधिराज यांनी सुद्धा कोरोना महामारीच्या काळात परीक्षा घेता येणार नाहीत, असे यूजीसीला आणि केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्र्यांना कळविले आहे. कर्नाटकने अंतिम वर्षाची परीक्षा घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी एकाच वेळी एका सेंटर मधील ५० विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली. म्हणून माझी देशाच्या पंतप्रधानांना कळकळीची विनंती आहे की, कृपया विद्यार्थ्यांना तोरणाच्या संकटात लोटू नका !

उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी यूजीसीला सवाल केला आहे की, महाराष्ट्रातील कोरोनाच्या भीषण परिस्थितीत ती तुम्ही परीक्षा घेऊन दाखवाल का? यूजीसीचे उपाध्यक्ष डॉक्टर भूषण पटवर्धन यांनी केंद्र सरकारची बाजू न मांडता आपल्या महाराष्ट्राची बाजू मांडावी. कोरोना महामारी गेल्यावर महाराष्ट्र सरकार परीक्षा घ्यायला तयार आहे. एटीकेटी मिळालेल्या विद्यार्थ्यांना सरासरी गुण देऊन आणि विद्यापीठामार्फत ग्रेस गुण देऊन उत्तीर्ण करण्याचा निर्णय कुलगुरुंशी चर्चा करून आणि त्यांनी तसा अहवाल दिल्यावर आणि शिफारस केल्यावरच घेण्यात आला आहे. हा निर्णय आजही कायम आहे, असे उदय सामंत यांनी ठामपणे सांगितले.

काय म्हणाले उदय सामंत?

एटीकेटीबाबत सर्व कुलगुरूंनी सकारात्मक निर्णय घेतला आहे. बंगळुरूमध्ये 50 जणांची परीक्षा घेतली यात निम्म्या विद्यार्थ्यांना कोविडची बाधा झाली. मग हजारो विद्यार्थ्यांची जबादारी कोण घेणार? वाईन शॉप आणि विद्यार्थी यांची तुलना करू नका. पालक आणि विद्यार्थी या सर्वांनी या परीक्षेला विरोध केला. सरकारला कुठला इगो नाही. 12 हजार कंटेन्मेंट झोन, या मध्ये 1 कोटी लोक आहेत, मग येथील विद्यार्थ्यांची परीक्षा कशी घेणार? विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळू नका, असं उदय सामंत यांनी म्हटलंय.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

एअर इंडियाच्या विमानाला केरळमध्ये अपघात, विमानाचे दोन तुकडे

कोझीकोड – केरळमधील एअर इंडियाचं विमान लँडिंग करताना अपघात घडला आहे. लँडींग होत असताना धावपट्टीवरून विमान घसरलं. या विमानात १९१ प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते. दुबईहून...
Read More
post-image
मनोरंजन

सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात चर्चेत आलेली श्रुती मोदी नक्की कोण?

मुंबई – सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी रोज नवनव्या लोकांची नावे समोर येत आहेत. त्यातच काल सीबीआयने सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय. त्यात श्रुती मोदी सध्या बरीच...
Read More
post-image
महाराष्ट्र

तंत्रशिक्षण प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया १० ऑगस्टपासून

मुंबई – शैक्षणिक वर्ष २०२०-२१ करिता तंत्रशिक्षण (पॉलिटेक्निक ) प्रथम वर्ष  पदविका अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया १० ते २५ ऑगस्ट २०२० या कालावधीत राबविण्यात येणार आहे....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा देश विदेश

गुड न्यूज! भारतात २०२१ साली विश्वचषक होणार

मुंबई – भारतामध्ये होणारा विश्वचषक वेळेनुसार २०२१ साली होणार आहे. आज झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत याबाबत चर्चा करण्यात आली. आयसीसीने काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियामधील ट्वेन्टी-२० विश्वचषक...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या कोरोना महाराष्ट्र मुंबई

आज राज्यात 10 हजारपेक्षा जास्त रुग्णांची नोंद, तर 300 मृत्यू

मुंबई – राज्यात आज नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची थोडी अधिक असून आजदेखील १० हजार ९०६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर १०...
Read More