तापसी पन्नू दिसणार आता खेळाडूच्या भूमिकेत – eNavakal
मनोरंजन

तापसी पन्नू दिसणार आता खेळाडूच्या भूमिकेत

विविध साहसी भूमिका साकारणाऱ्या तापसी पन्नू आता एका खेळाडूची भूमिका साकारणार आहे. भारताची वेगवान धावपट्टू रश्मीचा लवकरच बायोपिक येणार असून या चित्रपटात तापसी रश्मीची भूमिका साकारणार आहे. रश्मि रॉकेट असं या चित्रपटाचं नाव असून हा चित्रपट एक स्पोर्ट्स ड्रामा असणार आहे. तसेच, येत्या नोव्हेंबर महिन्यापासून या चित्रपटाच्या चित्रिकरणाला सुरूवात होणार आहे.
भारतातील एक वेग‌वान धावपट्टू रश्मी हिची कहाणी या चित्रपटात पाहता येणार आहे. ती एक अविश्वसनीय वेगवान धावपटू आहे आणि त्यामुळे गाववाले तिला ‘रॉकेट’ म्हणूनच ओळखतात. जेव्हा आपल्या  प्रतिभेला व्यावसायिक रुपात साकारायची तिला संधी मिळते तेव्हा या संधीला ती वाया जाऊ देत नाही. फिनिश लाइनपर्यंत पोहोचण्याची ही शर्यत अनेक अडथळ्यांची आहे आणि एका एथलेटि प्रमाणेच ही शर्यत देखील तिच्यासाठी सन्मान, आदर आणि इतकेच नव्हे तर स्वतःला सिद्ध करण्याच्या लढाईत परावर्तित होऊन जाते.  ​​
नंदा पेरियासामी, अनिरुद्ध गुहा आणि कनिका ढिल्लन यांच्याद्वारे ही कथा लिहिण्यात आलेली असून आकर्ष खुराना यांनी त्याचे दिग्दर्शन केले आहे. अभिनेत्री तापसीसोबत या चित्रपटात ‘एक्सट्रैक्शन’ फेम प्रियांशु पेंथुली प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.
चित्रपटाच्या चित्रिकरणाविषयी आणि आपल्या भूमिकेविषयी बोलताना तापसी म्हणाली की “मी या प्रॉजेक्टमध्ये अगदी सुरुवातीपासून सहभागी आहे आणि त्यासाठी हे सर्व माझ्यासाठी खास आहे. कोरोनाच्या अगदी आधी, मी एका स्प्रिंटरच्या व्यक्तिरेखेत उतरण्यासाठी 3 महिन्यांपासून ट्रेनिंग घेत होते. हा एक मोठा ब्रेक झाला आहे मात्र या विषयामुळे पुन्हा एकदा याची सुरुवात करायला उत्सुक आहे ज्याची सुरुवात ट्रेनिंगने होईल.”
देव डी, लुटेरा, क्वीन, केदारनाथ सारख्या चित्रपटांचे संगीतकार अमित त्रिवेदी आता ‘रश्मि रॉकेट’मध्ये आपल्या संगीताने रंग भरणार आहेत. नेहा आनंद आणि प्रांजल खंडाड़िया यांच्यासोबत रॉनी स्क्रूवाला यांची निर्मिती असलेला ‘रश्मि रॉकेट’ 2021 मध्ये प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
मनोरंजन

तापसी पन्नू दिसणार आता खेळाडूच्या भूमिकेत

विविध साहसी भूमिका साकारणाऱ्या तापसी पन्नू आता एका खेळाडूची भूमिका साकारणार आहे. भारताची वेगवान धावपट्टू रश्मीचा लवकरच बायोपिक येणार असून या चित्रपटात तापसी रश्मीची...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा देश

राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार जाहीर, रोहीत शर्मा आणि कुस्तीपटू विनेश फोगट यांची मोहोर

नवी दिल्ली – राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार जाहीर झाले असून भारतीय क्रिकेट संघाचा हिटमॅन रोहित शर्मा आणि महिला कुस्तीपटू विनेश फोगट यांना हा पुरस्कार मिळाला...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

पवारांच्या बारामती येथील निवासस्थानीही कोरोनाचा शिरकाव

पुणे -राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार  यांच्या मुंबईतील सिल्वर ओक या निवास्थानी कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. आता त्यांच्या बारामतीतील निवासस्थानीही कोरोनाची लागण झाली...
Read More
post-image
मुंबई

मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडपांवर तपासणी पथकांची देखरेख

मुंबई – सार्वजनिक उत्सवासाठी उभारण्यात येणाऱ्या मंडपांच्या तपासणीसाठी मुंबई शहर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुंबई महानगरपालिका क्षेत्रात तीन समित्या व नऊ पथकांची नियुक्ती केली आहे. आगामी सणासुदीच्या कालखंडात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

यंदा गणपतीच्या दर्शनासाठी कुणालाही परवानगी देऊ नका! अजित पवारांचे आदेश

पुणे – पुण्यात कोरोनाचा संसर्ग अजून काही थांबलेला नाही. त्यामुळे यंदा मानाच्या गणपतीसह कुठल्याही गणपतीच्या दर्शनासाठी कोणालाही परवानगी देऊ नका, असे आदेश उपमुख्यमंत्री अजित...
Read More