#T20WorldCup टी-२० विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर, पाहा संपूर्ण वेळापत्रक – eNavakal
आघाडीच्या बातम्या क्रीडा विदेश

#T20WorldCup टी-२० विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर, पाहा संपूर्ण वेळापत्रक

सिडनी – आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. पहिल्यांदाच महिला आणि पुरुषांच्या विश्वचषकाचे सामने हे एकाच देशात होणार आहेत. पुरुषांच्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत यजमान ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात सलामीचा सामना होणार आहे. तर भारताचा सामना पाहण्यासाठी चाहत्यांना २४ ऑक्टोबरची वाट पाहावी लागणार आहे. महिलांचा टी-२० विश्वचषक २१ फेब्रुवारी २०२० साली सुरु होणार असून, यजमान ऑस्ट्रेलियाचा संघ भारतीय महिलांविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे.

टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिलांचा समावेश ‘अ’ गटात करण्यात आलेला असून भारतीय पुरुष संघाला ‘ब’ गटात स्थान देण्यात आले आहे. पुरुषांचा टी-२० विश्वचषक हा ऑस्ट्रेलियातच 18 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर या कालावधीत खेळवला जाणार आहे. या स्पर्धेत विराट कोहलीची टीम इंडिया २४ ऑक्टोबर रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आपला पहिला सामना खेळेल.

टी-20 विश्वचषकासाठी स्पर्धेची गटवारी पुढीलप्रमाणे –

महिला गट –

  • गट अ – ऑस्ट्रेलिया, भारत, न्यूझीलंड, श्रीलंका
  • गट ब – इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, विंडीज, पाकिस्तान

पुरुष गट –

  • गट अ – पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, विंडीज
  • गट ब – भारत, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

‘आयफा’ने गाजवली रात्र; ‘ही’ अभिनेत्री ठरली सर्वोत्कृष्ट

मुंबई – बॉलिवूड चित्रपटाचा सोहळा ‘आयफा’ सोमवारी मुंबईत पार पडला. यंदाचं आयफा पुररस्कारांचं हे २०वं वर्ष. दरवर्षी परदेशातच पार पडणाऱ्या या पुरस्कार सोहळ्याची रंगत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

राजनाथ सिंह आज ‘तेजस’मधून उड्डाण करणार

नवी दिल्ली – देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज ‘तेजस’ या भारतीय बनावटीच्या लढाऊ विमानातून प्रवास करणार आहेत. तेजसच्या दोन सीट असलेल्या एअरक्राफ्टमधून राजनाथ...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

गरज असेल तरच घराबाहेर पडा! आज अतिवृष्टीचा इशारा

मुंबई – मुंबई उपनगरासह राज्यातील अनेक भागांना काल रात्रभर पावसाने झोडपल्यानंतर आज मुंबई, रायगड, पुणे आणि सातारा जिल्ह्याला मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र हवामान

मुंबईसह कोकणात रेड अलर्ट, शाळा-महाविद्यालयांना सुट्टी

मुंबई – भारतीय हवामान विभागाने आज मुंबईसह उपनगर, ठाणे आणि कोकणात आज अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून शालेय शिक्षण मंत्री...
Read More
post-image
News मुंबई

मेट्रोच्या कारशेडसाठी कांजूरची जागा का नको-हायकोर्ट

मुंबई – मुंबईतील संवेदनशील आरे कॉलोनीतील हजारो झाडांचा बळी घेऊन आणि पर्यावरणाचा र्‍हास करून मेट्रो कारशेड उभारण्या ऐवजी कांजूरमार्ग येथे मोकळ्या जागेचा पर्याय म्हणून...
Read More