मुंबई – बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येप्रकरणी एनसीबीने चार्जशीट दाखल केले आहे. या चार्जशीटमध्ये ३३ जणांचा समावेश असून अभिनेत्री दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर आणि सारा अली खान यांच्या जबाबांचा समावेश आहे.
सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी ३० हजार पानी आरोपपत्र मुंबई सत्र न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. या आरोपपत्रात रिया चक्रवर्ती, शौविक चक्रवर्ती, सॅम्युअल मिरांडा, दिपेश सावंत अशा ३३ जणांची आरोपी म्हणून नावं आहेत. तसेच, दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर, रकुल प्रीत सिंग यांसारख्या बॉलिवूडमधील बड्या अभिनेत्रींचा जबाबाचा समावेश आहे. आरोपपत्रात त्यांचा आरोपी म्हणून उल्लेख केलेला नाही.
बॉलिवूडमधील हरहुन्नरी अभिनेता म्हणून ओळख असलेला सुशांत सिंह राजपूत याने 14 जूनला वांद्रे येथील राहत्या घरी गळफास घेऊन त्यांनं आत्महत्या केली. सुशांत हा नैराश्यात होता अशी माहिती सुशांतच्या घरी काम करणाऱ्या नोकराने दिली आहे. सुशांत डिप्रेशनमध्ये होता त्याच्यावर उपचार सुरू होते. सुशांतच्या घरी पोलिसांना काही औषधे मिळाली आहे त्यावरुन हा अंदाज लावण्यात आलेला आहे. मात्र आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. सुशांतच्या घरात सुसाइड नोट सापडलेली नाही.