‘मुंबई पोलिसांची कामगिरी उत्तमच, पण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत’ – eNavakal
आघाडीच्या बातम्या गुन्हे देश मनोरंजन महाराष्ट्र मुंबई

‘मुंबई पोलिसांची कामगिरी उत्तमच, पण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत’

मुंबई – अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आल्याने महाविकास आघाडीला धक्का बसल्याचं बोललं जात आहे. यावर राज्यातील विविध नेत्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आता, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले की, मुंबई पोलिसांची कामगिरी अत्यंत चागली होती, मात्र सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचंही स्वागत आहे. पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

सुशांतसिंह राजपूत आत्महत्याप्रकरणी मुंबई पोलिसांना टीकेचं धनी व्हावं लागलं आहे. तपास योग्य दिशेने होत नसल्याने हा तपास सीबीआयकडे सोपवण्यात यावा अशी मागणी अनेकांनी केली होती. मात्र, अनिल देशमुख ठामपणे मुंबई पोलिसांच्या पाठीशी उभे राहिले होते. यावेळीही त्यांनी ‘मुंबई पोलिसांनी अत्यंत चांगली कामगिरी केली असून न्यायालयानंही तपासात दोष आढळला नसल्याचं म्हटलं आहे आणि मुंबई पोलिसांसाठी ही अभिमानाची बाब आहे,’ असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

‘सुशांतसिंह आत्महत्येप्रकरणी विरोधी पक्षातील नेते राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहे. बिहारमध्ये लवकरच निवडणूका होणार आहेत त्यानुषंगानेचं राजकारण केले जात आहे,’ असाही पुनरुच्चार त्यांनी केला. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर राज्य सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार करणार का हा प्रश्न विचारला असता, त्यांनी याबाबत उत्तर देणं टाळलं आहे.

“डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या राज्यघटनेत संघराज्याची जी संकल्पना आहे त्याबाबत घटनातज्ज्ञांनी विचारमंथन करावं, असं मी सांगू इच्छितो. सीबीआयला तपास द्यावा की नाही, याबाबत राज्य सरकार निर्णय घेतो. राज्य सरकारने एनओसी दिली की तो तपास सीबीआयकडे जातो. पण सुप्रीम कोर्टाने निर्णय दिल्यानंतर त्यापद्धतीने राज्य सरकार सीबीआयला सहकार्य करेल,”असं देशमुख म्हणाले.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच अनिल देशमुख यांनी मुंबई पोलिसांची पाठराखण केली होती. मुंबई पोलीस या प्रकरणाचा व्यावसायिक पद्धतीनं तपास करत आहेत. सर्व बाजू तपासून पाहिल्या जात आहेत. त्यामुळं सीबीआय तपासाची गरज नाही, असं देशमुख यांनी स्पष्ट केलं होतं. याबाबतीत कुणीही राजकारण करू नये, असं त्यांनी विरोधकांना सुनावलं होतं.

अनिल देशमुख यांनी सीबीआय चौकशीला नकार दिल्यानंतर भाजप आक्रमक झाली आहे. अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे. मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी सुशांत प्रकरणात तब्बल दोन महिने साधा एफआयआर नोंदवून न घेणं हे दुर्दैवी आहे. ह्याची जबाबदारी घेऊन महाराष्ट्रचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा,’ अशी मागणी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या गुन्हे देश मनोरंजन महाराष्ट्र मुंबई

‘मुंबई पोलिसांची कामगिरी उत्तमच, पण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत’

मुंबई – अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आल्याने महाविकास आघाडीला धक्का बसल्याचं बोललं जात आहे. यावर राज्यातील विविध नेत्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

दादर आणि माहिमच्या चौपाटींवर भाविकांना बंदी

मुंबई – गणेशोत्सवाच्या काळात गर्दी टाळण्यासाठी मुंबई पालिकेने आणखी काही सूचना जारी केल्या आहेत. दरम्यान, दादर, पश्चिम चौपाटीवर भाविकांना प्रवेशबंदी करण्यात आली असून विसर्जनासाठी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

सरकारी नोकरीसाठी आता एकच सामायिक परीक्षा द्यावी लागणार, मोदी सरकारचा मोठा निर्णय

नवी दिल्ली – सरकारी नोकरीच्या शोधात विविध खात्यासाठी विविध परीक्षा द्यावा लागतात. मात्र, मोदी सरकारच्या नव्या घोषणेमुळे आता एकच सामायिक परीक्षा घेण्यात येणार आहे....
Read More
post-image
महाराष्ट्र

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर मोरी मासळींचा खच, श्रावण संपल्याने खरेदीसाठी खवय्यांची गर्दी

सिंधुदुर्ग – सिंधुदुर्ग किनारपट्टी भागात मच्छीमारी बांधवांना गेले 2 दिवस मोरी मासळीची चांगली बंपर खच मिळाली असून श्रावण महिना संपल्याने मोरी मासळीच्या खरेदीसाठी खवय्यांनी आज समुद्रकिनारी...
Read More
post-image
मनोरंजन महाराष्ट्र

65 वर्षांवरील कलाकारांना परवानगी, अमित देशमुख यांची घोषणा

मुंबई – चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या 65 वर्षांवरील कलाकार, क्रू सदस्यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती पूर्ण काळजी घेऊन चित्रीकरण करण्यास...
Read More