अनिल देशमुख आणि ठाकरे सरकारला सुप्रीम कोर्टाचा धक्का, सीबीआय चौकशीविरोधातील याचिका फेटाळल्या – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

अनिल देशमुख आणि ठाकरे सरकारला सुप्रीम कोर्टाचा धक्का, सीबीआय चौकशीविरोधातील याचिका फेटाळल्या

मुंबई – राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सीबीआय चौकशीला मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी दिली होती. याविरोधात अनिल देशमुख आणि राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले होते. मात्र, सीबीआय चौकशीच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे. अनिल देशमुख आणि राज्य सरकार यांनी स्वतंत्र याचिका दाखल केल्या होत्या. सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळल्याने सीबीआयची चौकशी सुरु राहणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

महाराष्ट्रातील अनेक मोठे अधिकारी या प्रकरणात गुंतले असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. अनिल देशमुख यांची बाजू मांडणारे कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद करताना कायदा प्रत्येकासाठी समान असला पाहिजे. फक्त एका पोलीस अधिकाऱ्याने काही म्हटलं म्हणून त्याचे शब्द पुरावा होत नाही असं म्हटलं. यावर सुप्रीम कोर्टाने आरोप करणारे तुमचे (अनिल देशमुख) शत्रू नव्हते, पण आरोप अशा व्यक्तीने केले आहेत जो जवळपास तुमचा राईट हॅण्ड माणूस (परमबीर सिंह) होता असं सांगितलं. तसंच अनिल देशमुख आणि परमबीर सिंह या दोघांचीही चौकशी झाली पाहिजे असं मत सुप्रीम कोर्टाने नोंदवलं.

अनिल देशमुखांनी १०० कोटींचं टार्गेट दिलं होतं, असा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला होता. त्यामुळे याप्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी दिली होती. त्यावर, सीबीआयने १५ दिवसांमध्ये प्राथमिक चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने सोमवारी दिल्यानंतर अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. भ्रष्टाचाराच्या आरोपाबाबत सीबीआय चौकशीच्या उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि राज्य सरकारने मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात दोन स्वतंत्र याचिका दाखल केल्या. याचिकांवर तातडीने सुनावणी घेण्याची विनंतीही करण्यात आली होती.


देशमुख यांच्याबरोबरच राज्य सरकारनेही या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. गृहमंत्र्यांविरोधात चौकशीची मागणी करताना उच्च न्यायालयासमोर कोणतीही वस्तुनिष्ठ माहिती व युक्तिवाद करण्यात आला नाही. त्यामुळे सीबीआय चौकशीचा आदेश संयुक्तिक नसल्याचा मुद्दा राज्य सरकारने याचिकेद्वारे मांडला होता. देशमुख यांच्याविरोधात याचिका करणाऱ्या वकील जयश्री पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात कॅव्हिएट दाखल करत , राज्य सरकार व देशमुख यांच्या याचिकांवर कोणतेही निर्देश देण्यापूर्वी आपले म्हणणे ऐकून घेतले जावे, अशी विनंती केली होती.

राज्याच्या परवानगीविना केंद्र सरकार सीबीआय चौकशी करू शकत नाही. या प्रकरणात राज्य सरकारकडे केंद्राने कोणतीही विनंती केलेली नव्हती. तरीही उच्च न्यायालयाने थेट सीबीआय चौकशीचे निर्देश दिले आहेत, असा हरकतीचा मुद्दा राज्य सरकारच्या वतीने उपस्थित करण्यात आला होता.

उच्च न्यायालयाने प्रक्रियेचे पालन न करताच थेट सीबीआयकडे चौकशी सोपवल्याचा मुद्दा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलेल्या याचिकेत उपस्थित केला होता. एखाद्या विद्यमान मंत्र्याविरोधात त्याला प्रतिवादाची संधी न देताच चौकशी करण्याचा आदेश यापूर्वी कधीही दिला गेला नव्हता. उच्च न्यायालयाने आपल्याला म्हणणे मांडण्याची संधी दिली नाही. आता मंत्रिपद नसल्याने पोलिसांकडूनही चौकशी केली जाऊ शकते. पण, राज्याच्या पोलीस यंत्रणेवर न्यायालयाने अविश्वाास दाखवला असल्याचा आक्षेपाचा मुद्दा देशमुख यांच्या याचिकेद्वारे मांडण्यात आला होता.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

अनिल देशमुख आणि ठाकरे सरकारला सुप्रीम कोर्टाचा धक्का, सीबीआय चौकशीविरोधातील याचिका फेटाळल्या

मुंबई – राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सीबीआय चौकशीला मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी दिली होती. याविरोधात अनिल देशमुख आणि राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयाचे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

राज्यात पुन्हा लोकल प्रवासावर निर्बंध येण्याची शक्यता, वडेट्टीवारांची माहिती

मुंबई – राज्यात कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होतेय. त्यात देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत तर दिवसाला १० हजारांपेक्षा जास्त रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे कोरोनाच...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

महाविकास आघाडी नसून महावसुली आघाडी, यांच्यामुळे महाराष्ट्राच्या अब्रुची लक्तरं निघाली- प्रकाश जावडेकर

नवी दिल्ली – “गेल्या ३० दिवसांमध्ये महाराष्ट्रात अशा उलथापालथी होत आहेत, रोज इतके नवनवे खुलासे होत आहेत की त्यांचा ट्रॅक ठेवणं देखील कठीण जात आहे....
Read More
post-image
आरोग्य जीवनशैली

Work from home करताना आरोग्याच्या समस्या वाढल्या? मग ‘या’ टिप्स नक्की वाचा

मुंबई – गेल्या वर्षभरापासून सुरु असलेला कोरोनाव्हायरस संसर्गासोबतची लढाई आजही सुरुच आहे. आता भारतात दुसरी लाट आली पुन्हा एकदा संसर्गाचे प्रमाण वाढले आहे. या...
Read More
post-image
महाराष्ट्र

महाराष्ट्रातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था नीट चालू नये अशी दिल्लीतील काही लोकांची इच्छा – जयंत पाटील

मुंबई – देशात रुग्णांची संख्या सर्वात जास्त महाराष्ट्रात असताना सर्वात जास्त लसी महाराष्ट्राला मिळायला हव्यात, मात्र तसे मुद्दाम होऊ दिले जात नाही आहे. महाराष्ट्रातील सार्वजनिक...
Read More