न्युयॉर्क – हॉलीवुड चित्रपट ‘कॅप्टन मार्वल’ हा आगामी अमेरिकन ‘सुपरहिरो चित्रपट’ आहे. हा चित्रपट मार्वल कॉमिक्स आणि कॅरोल डॅनव्हर्स यांच्यावर आधारित आहे. मार्वल कॉमिक्स हे अमेरिकेतील एका ब्रॅंडचे नाव आहे, तर कॅरोल डॅनव्हर्स हा एका लघु कथेमधील राजा असल्याचे सांगितले जात आहे. हा चित्रपट ‘मार्वल स्टुडिओ’ यांच्याकडून निर्मित केला आहे, तर ‘वॉल्ट डिझनी स्टुडिओ अॅंड मोशन पिक्चर’ यांच्याकडून वितरीत करण्यात आला.
हा चित्रपट लवकरच भारतात इंग्रजीसोबत, हिंदी, तामिळ, तेलुगु आणि मल्याळम या भाषांमध्ये प्रदर्षित होणार आहे. येत्या 8 मार्च 2019 रोजी अमेरिकेमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला हा चित्रपट येणार असल्याची माहिती, चित्रपट निर्मिती मंडळाने दिली.
कसा आहे या चित्रपटाचा ट्रेलर? नक्की पहा…