चेन्नई – थुथुकुडी येथील झालेल्या स्टरलाईट विरोधी आंदोलनात मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबीयांची तमिळनाडूचे मुख्यमंत्री एडाप्पदी के. पलानिस्वामी 9 जूनला भेट घेणार असून जखमी झालेल्यांनाही भेटणार आहेत. थुथुकुडी येथे स्टरलाईट कंपनीविरोधात झालेल्या आंदोनादरम्यान पोलिसांनी 12 मे रोजी केलेल्या गोळीबारात 13 जणांचा मृत्यू झाला तर 60 हून अधिक लोक जखमी झाले होते. कॉलिवुड स्टार विजय याने या आंदोलनात मृत्यू पावलेल्या आंदोलकांच्या कुटुंबीयांना भेट दिली आणि प्रत्येक कुंटुंबाला 1 लाख रुपयांची मदत केली. याशिवाय सुपरस्टार रजनीकांत यांनीही थुथुकुडी येथील सामान्य रुग्णालयातील जखमींना भेट दिली. यावेळी त्यांनी आंदोलनातील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 2 लाख रुपयांच्या मदतीची घोषणा केली आहे. यापूर्वी मे महिन्यात कमल हसन यांनीही येथील सामान्य रुग्णालयात जाऊन आंदोलनात जखमी झालेल्यांची भेट घेतली होती. गेल्या महिन्यात, स्टरलाईट कॉपर मिनिंग इन्डस्ट्रीच्या नवीन शुद्धीकरण प्रकल्प उभारणी विरोधात येथील नागरिक रस्त्यावर उतरले होते.
