श्रीशैलम जलविद्युत प्रकल्पात भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू – eNavakal
देश

श्रीशैलम जलविद्युत प्रकल्पात भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू

हैदराबाद – ठिकठिकाणी आगीच्या घडत असून तेलंगणातील श्रीशैलम जलविद्युत प्रकल्पातही गुरुवारी भीषण आग लागली होती. या आगीत जवळपास ९ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. गुरुवारी मध्यरात्री ही घटना घडल्यानंतर एनडीआरएफच्या तुकडीला पाचारण करण्यात आलं होतं. त्यानंतर आगीत अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू होते. मात्र, ९ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात जवानांचे प्रयत्न अपयशी ठरले.

तेलंगणा व आंध्र प्रदेशच्या सीमा भागात असलेल्या श्रीशैलम जलविद्युत प्रकल्प आहे. या प्रकल्पातील पॉवर हाऊसमध्ये गुरूवारी मध्यरात्री अचानक आग लागली. यावेळी तिथे १९ कर्मचारी होते. मात्र, ९ कर्मचारी आगीमुळे अडकून पडले. या कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफच्या पथकाला पाचारण करण्यात आलं. बचाव मोहीम हाती घेण्यात आली. मात्र, शुक्रवारी दुपारी आधी सहा तर थोड्या वेळानं आणखी तीन जणांचे मृतदेह जवानांना मिळाले. ९ जणांचा आगीत होरपळून जागीच मृत्यू झाला.

९ मृतदेह बाहेर काढण्यात आले असून, तिघांची ओळख पटली आहे. तिघेही सहाय्यक अभियंता पदावर कार्यरत होते. सुंदर नाईक, मोहन कुमार आणि फातिमा अशी ओळख पटलेल्या तीन मृतांची नावं आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, बचाव मोहीम अजूनही सुरू आहे. लेफ्ट बँक पॉवर स्टेशनमध्ये तीन कर्मचारी अडकलेले आहेत. त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
देश

श्रीशैलम जलविद्युत प्रकल्पात भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू

हैदराबाद – ठिकठिकाणी आगीच्या घडत असून तेलंगणातील श्रीशैलम जलविद्युत प्रकल्पातही गुरुवारी भीषण आग लागली होती. या आगीत जवळपास ९ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. गुरुवारी...
Read More
post-image
महाराष्ट्र मुंबई

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते डोंबिवलीतील कोविड रुग्णालयाचे ऑनलाइन उद्घाटन

कल्याण – एकजिनसीपणे संघटितपणे कोविड निर्मूलनाचे काम हाती घेतले आहे, त्‍यामुळे महाराष्‍ट्राला लवकरात लवकर या संकटातुन बाहेर काढू, असा आशावाद मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज व्‍यक्‍त केला. डोंबिवली जिमखाना, येथे...
Read More
post-image
मनोरंजन

तापसी पन्नू दिसणार आता खेळाडूच्या भूमिकेत

विविध साहसी भूमिका साकारणाऱ्या तापसी पन्नू आता एका खेळाडूची भूमिका साकारणार आहे. भारताची वेगवान धावपट्टू रश्मीचा लवकरच बायोपिक येणार असून या चित्रपटात तापसी रश्मीची...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा देश

राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार जाहीर, रोहीत शर्मा आणि कुस्तीपटू विनेश फोगट यांची मोहोर

नवी दिल्ली – राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार जाहीर झाले असून भारतीय क्रिकेट संघाचा हिटमॅन रोहित शर्मा आणि महिला कुस्तीपटू विनेश फोगट यांना हा पुरस्कार मिळाला...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

पवारांच्या बारामती येथील निवासस्थानीही कोरोनाचा शिरकाव

पुणे -राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार  यांच्या मुंबईतील सिल्वर ओक या निवास्थानी कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. आता त्यांच्या बारामतीतील निवासस्थानीही कोरोनाची लागण झाली...
Read More