दिल्लीतील कृषी कायद्याविरोधातील आंदोलनातून दोन संघटनांची माघार – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश

दिल्लीतील कृषी कायद्याविरोधातील आंदोलनातून दोन संघटनांची माघार

नवी दिल्ली – केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या दोन महिन्यांपासून विविध शेतकरी संघटना एकत्र येऊन करत असलेल्या आंदोलनात आज फूट पडली. या आंदोलनातून भारतीय किसान युनियन आणि राष्ट्रीय किसान मजदूर संघानं आपलं आंदोलन थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही संघटनांचे नेते व्ही. एम. सिंग आणि ठाकूर भानूप्रताप सिंह यांनी बुधवारी याची घोषणा केली.

भारतीय किसान युनियनचे नेते ठाकूर भानूप्रताप सिंह चिल्ला बॉर्डर येथे पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले, “दिल्लीत काल जे काही घडलं यानं मला खूपच दुःख झालं. त्यामुळे आम्ही ५८व्या दिवशी आमचं आंदोलन थांबवत आहोत.” भाकियूच्या या गटाला संयुक्त किसान मोर्चाने यापूर्वीच आंदोलनापासून वेगळं केलं होतं. कारण सुरुवातीला सरकारच्या मंत्र्यांशी चर्चा झाल्यानंतर त्यांनी आंदोलन संपवण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, सर्व शेतकऱ्यांच्या भावना पाहता त्यांनी आंदोलन सुरुच ठेवलं होतं.

तर राष्ट्रीय किसान मजदूर संघटनचे व्ही. एम. सिंग म्हणाले, “ज्यांचा हिंसाचाराचा मार्ग आहे त्यांच्यासोबत आम्ही आमचं आंदोलन पुढे नेऊ शकत नाही. आंदोलन चालू ठेवण्यासाठी आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत पण व्ही. एम. सिंग आणि राष्ट्रीय किसान मजदूर संघटन या आंदोलनातून आणि ऑल इंडिया किसान संघर्ष कोऑर्डिनेशन कमिटीतून माघार घेत आहे.”

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र

‘आधी औरंगाबादचे संभाजीनगर करा, नाही तर…’, अतुल भातखळकरांची टीका

मुंबई – मराठी अस्मिता, मराठी शक्ती जोपर्यंत एकवटत नाही, तोपर्यंत कर्नाटक सीमवादाचा प्रश्न सुटणार नाही, असं सांगतानाच कर्नाटक व्याप्त भूभाग केंद्रशासित प्रदेश म्हणून जाहीर करा,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

दिल्लीतील कृषी कायद्याविरोधातील आंदोलनातून दोन संघटनांची माघार

नवी दिल्ली – केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या दोन महिन्यांपासून विविध शेतकरी संघटना एकत्र येऊन करत असलेल्या आंदोलनात आज फूट पडली. या आंदोलनातून भारतीय किसान...
Read More
post-image
महाराष्ट्र मुंबई

छातीपासून बेंबीपर्यंत जोडलेल्या होत्या १४ दिवसांच्या जुळ्या मुली, वाडिया रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया

मुंबई – परेल येथील बाई जेरबाई वाडिया हॉस्पीटलमध्ये जन्माला आलेल्या जुळ्या मुली छातीपासून ते बेंबीपर्यत जोडलेल्या होत्या. त्यांना वेगळे करण्यासाठी डॉक्टरांच्या विशेष टीमला तब्बल...
Read More
post-image
महाराष्ट्र

सीमाभागातील नागरिक पिढ्यानपिढ्या यातना सहन करत आलेत- शरद पवार

मुंबई – बेळगाव, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे” ही संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील मागणी अजूनही अपूर्ण असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यासह राजकीय नेत्यांनी कर्नाटकव्याप्त...
Read More
post-image
महाराष्ट्र मुंबई

भांडण झाल्याने प्रियकराने प्रेयसी समोरच मारली खाडीत उडी

नवी मुंबई – नवी मुंबईतील वाशी खाडीपुलावर काल रात्री 10 वाजेच्या सुमारास रवी रेड्डी या तरुणाने भांडण झाल्याने प्रेयसी समोरच वाशीच्या खाडीपुलावरून उडी मारली....
Read More