सोनू सूदने पोलिसांना दिल्या तब्बल २५ हजार फेस शिल्ड – eNavakal
मनोरंजन

सोनू सूदने पोलिसांना दिल्या तब्बल २५ हजार फेस शिल्ड

मुंबई – कोरोनाच्या संकटात बॉलिवूडचा अभिनेता सोनू सूद सर्वांनाच मदतीचा हात देत आहे. अशातच त्याने राज्यातील पोलिसांसाठी तब्बल २५ हजार फेस शिल्ड दिल्या. याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माहिती देत सोनू सूदचे आभारही मानले.

अनिल देशमुख यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर सोनू सूद आणि त्यांचा एक फोटो शेअर केला आहे. “आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांसाठी २५ हजार फेस शिल्ड दिल्याबद्दल सोनू सूद यांचे आभार,” असे कॅप्शनही त्यांनी या फोटोला दिले आहे. सोनू सूदच्या या कार्यांबद्दल अनेकांनी त्याची स्तुतीही केली. सोशल मीडियावरही अनेक युझर्सने त्याचे कौतुक केले आहे. तर दुसरीकडे सोनू सूदनंही तो फोटो शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहे. आपले पोलीस बांधव आणि भगिनी हे खरे हिरो आहेत. ते करत असलेल्या कार्यासमोर हे फारच कमी आहे, असे तो म्हणाले. दरम्यान,यापूर्वी सोनू सूदने प्रवासी मजुरांना त्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्यासाठी एक मोहीम सुरू केली होती.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

#DhoniRaina धोनीसोबतच सुरेश रैनाचीही निवृत्तीची घोषणा

मुंबई – भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने स्वातंत्र्य दिनी सायंकाळी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आपल्या निवृत्तीची घोषणा केल्याने जगभरातील क्रिकेटप्रेमींना मोठा धक्का बसला. मात्र चाहते...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

मै पल दो पल का शायर हूँ…! माही निवृत्त

नवी दिल्ली – गेल्या एक वर्षाहून अधिक काळ क्रिकेटप्रेमी महेंद्र सिंह धोनीची मैदानावर वाट पाहत होते. मात्र काल स्वातंत्र्य दिनी सायंकाळी अचानक त्याने आंतरराष्ट्रीय...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या कोरोना महाराष्ट्र मुंबई

मुंबईत १,२५४, पुण्यात २,४३२ नवे रुग्ण! राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ५ लाख ८४ हजार ७५४ वर

मुंबई – महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्यात शनिवारी दिवसभरात १२ हजार ६१४ नवे कोरोना रुग्ण आढळले. तर ३२२ मृत्यूंची नोंद झाली....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

खासदार नवनीत राणा यांची प्रकृती स्थिर, आयसीयूतून सामान्य कक्षात हलवले

मुंबई- कोरोनाचा संसर्ग झाल्याने लिलावती रुग्णालयात उपचार घेत आलेल्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा कौर यांना आयसीयूतून सामान्य कक्षात हलवण्यात आले आहे. प्रकृतीत थोडी सुधारणा...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश विदेश

पाकिस्तानची वेबसाईट हॅक, भारताचा तिरंगा फडकला

नवी दिल्ली- आज देशात स्वातंत्र्यदिन सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला. याच दिवशी पाकिस्तानच्या वेबसाइट्सवरही शुभेच्छांचे संदेश दिसून आले आहेत. पाकिस्तानच्या फातिमा जिन्ना महिला विद्यापीठासह...
Read More