‘…तर हा अपराध मी वारंवार करेन’- संजय राऊत – eNavakal
गुन्हे मनोरंजन महाराष्ट्र मुंबई

‘…तर हा अपराध मी वारंवार करेन’- संजय राऊत

मुंबई – शिवसेना आणि कंगना रानौतमधील वाद अद्यपाही मिटलेला दिसत नाहीय. कंगना नियमित शिवसेनेला टार्गेट करताना दिसतेय. त्यातच, संजय राऊतांना तिने खटल्यात आरोपी केल्याने राऊतांनी प्रतिक्रिया व्यक्त केलीय. मुंबई महापालिकेने अभिनेत्री कंगना रानौतचं कार्यालय तोडलं. त्यामुळे तिने मलाही या खटल्यात पार्टी केल्यानं आश्चर्य वाटलं आणि धक्काही बसला. माझ्यावर यापूर्वीही शेकडो खटले झाले आहेत. अशा खटल्यांना मी घाबरत नाही. महाराष्ट्राच्या बदनामीविरुद्ध लढलो म्हणून मला जर कुणी तुरुंगात टाकत असेल तर मी तुरुंगातही जायला तयार आहे, असा इशारा शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी दिला. ‘टीव्ही9 मराठी’शी बोलत होते.

वाचा  कोरोनामुळे उपासमार सुरु असलेल्या लोककलावंतांचे पंढरपुरात उपोषण

”कंगनाशी माझं कोणतंही वैयक्तिक भांडण नाही. मराठी माणूस म्हणून मी मराठी द्वेषाविरोधात उभं राहिलो आणि राहतो यापुढेही राहिन. महाराष्ट्र आणि मराठीच्या अस्मितेसाठी भूमिका घेणं हा जर कुणाला अपराध वाटत असेल तर हा अपराध मी वारंवार करत राहील, असं सांगतानाच मला मराठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी लढण्यापासून कोणीही रोखू शकत नाही,” असा इशाराही राऊतांनी दिला.

वाचा  आजूबाजूला एकही मित्र देश नसणे भारतासाठी धोकादायक, राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल

यापूर्वीही माझ्यावर शेकडो केसेस झाल्या आहेत. अगदी शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत माझ्यावरही अग्रलेखावरुन खटले दाखल झाले. प्रत्येक वेळी बाळासाहेब माझ्यामागे खंबीरपणे उभे राहिले, असं सांगतानाच महाराष्ट्राची अस्मिता, मराठीची अस्मिता आणि महाराष्ट्राच्या बदनामीविरुद्ध लढलो म्हणून कोणी जर मला तुरुंगात टाकत असेल तर तुरुंगात जायला मी तयार आहे, असं ते म्हणाले.

फाळकेंचं नाव उच्चारता येणारे आम्हाला शिकवतात

यावेळी त्यांनी उत्तर प्रदेशात निर्माण होणाऱ्या फिल्म सिटीबाबतही प्रतिक्रिया व्यक्त केली. बॉलिवूडमध्ये कुणालाही प्रवेश नाकारला नाही. इथे सर्वांचेच स्वागत आहे. या महाराष्ट्राने देशाच्या सिनेसृष्टीचा पाया घातला. त्यामुळे कुणी आम्हाला अक्कल शिकवू नये, असं सुनावतानाच ज्यांना दादासाहेब फाळके यांचं नाव उच्चारता येत नाही. ते आम्हाला शिकवतात यापेक्षा मोठा विनोद नाही, असा टोलाही त्यांनी कंगनाला तिचं नाव न घेता लगावला.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
गुन्हे मनोरंजन महाराष्ट्र मुंबई

‘…तर हा अपराध मी वारंवार करेन’- संजय राऊत

मुंबई – शिवसेना आणि कंगना रानौतमधील वाद अद्यपाही मिटलेला दिसत नाहीय. कंगना नियमित शिवसेनेला टार्गेट करताना दिसतेय. त्यातच, संजय राऊतांना तिने खटल्यात आरोपी केल्याने...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

महिला पायलट आता राफेल चालवणार, शिवांगी सिंह ठरल्या पहिल्या महिला फायटर पायलट

नवी दिल्ली – भारतीय हवाई दलात नुकतेच नव्यानेच समावेश झालेल्या राफेल विमानच्या पहिल्या स्क्वार्डनमध्ये फ्लाइट लेफ्टनंट शिवांगी सिंह या महिला फायटर पायलटचा समावेश करण्यात आला...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

राज्यसभा अनिश्चित काळासाठी स्थगित, सभापती एम. व्यंकय्या नायडू यांची घोषणा

नवी दिल्ली – कृषी विधेयकासह अनेक महत्त्वाची विधेयके मंजूर झाल्यानंतर राज्यसभेचे पावसाळी अधिवेशन अनिश्चित काळासाठी संस्थगित करण्यात आले आहे, अशी घोषणा सभापती एम. व्यंकय्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

शक्तीशाली लोकांच्या यादीत शाहीन बागमधील बिलकिस

नवी दिल्ली – जगातील सर्वात शक्तिशाली १०० लोकांच्या टाइम्सने जाहीर केलेल्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह दिल्लीच्या शाहीन बागमधील आंदोलनांमुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या दीदी म्हणजे...
Read More
post-image
गुन्हे मनोरंजन मुंबई

प्रसिद्ध अभिनेत्री व मॉडेल पूनम पांडेच्या पतीला अटक, छेडछाड-मारहाणीचा आरोप

पणजी – प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडे नेहमीच आपल्या बोल्ड छायाचित्र आणि व्हिडीओसाठी चर्चेत असते. मात्र गेल्या काही दिवसांपासून ती तिच्या लग्नामुळे चर्चिली...
Read More