‘प्यार किया तो डरना क्या?’, अब्दुल सत्तार धनंजय मुंडेच्या बाजुने – eNavakal
महाराष्ट्र

‘प्यार किया तो डरना क्या?’, अब्दुल सत्तार धनंजय मुंडेच्या बाजुने

जालना – राज्याचे सामाजिक न्यामंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप झाल्याने विरोधकांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. त्यातच, शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी ‘प्यार किया तो डरना क्या?’, असं म्हणत धनंजय मुंडे यांची बाजू घेतली आहे.

एकीकडे धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधी पक्ष भाजप करत आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या गोटातून सावध प्रतिक्रिया येत आहेत. असं असताना एका कार्यक्रमादरम्यान सत्तार यांना याविषयी प्रश्न विचारण्यात आला असता ‘प्यार किया तो डरना क्या?’, अशा बिनधास्त शब्दात त्यांनी धनंजय मुंडे यांची पाठराखण केली आहे.

धनंजय मुंडे यांनी त्यांचे संबंध लपवून ठेवलेले नाहीत. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी सर्व खुलासा केला आहे. त्यांनी त्यांची बाजू महाराष्ट्रासमोर मांडली आहे. तसंच दोघांच्या संमतीने असलेल्या प्रेमाची कबुली दिली आहे. तर मग प्यार किया तो डरना क्या?”, असं म्हणत त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांनी गोपीनाथ मुंडे यांना वापरलेल्या वाक्याची आठवण करुन दिली.

दुसरीकडे धनंजय मुंडे यांनी निवडणूक शपथपत्रात अपत्यांची तसंच लग्नाची माहिती लपवल्याचा आरोप होत आहे. यावर बोलताना सत्तार म्हणाले, “भाजपच्या अनेक नेत्यांनी निवडणुकीच्या शपथपत्रात विविध प्रकारची माहिती लपवली आहे. त्या नेत्यांची नावे मी वेळ आल्यास जाहीर करीन”.

धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागणाऱ्या विरोधकांवर राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी जोरदार टीका केली आहे. आमच्याकडून नैतिकतेची अपेक्षा करणाऱ्या विरोधकांनी सत्तेत असताना किती नैतिकता पाळली होती? असा सवाल करतानाच विरोधकांनी आधी स्वत:ला आरक्षात पाहावे, असा घणाघाती हल्ला अमोल कोल्हे यांनी केला आहे. सांगलीत प्रसारमाध्यमांशी बोलताना अमोल कोल्हे यांनी धनंजय मुंडे प्रकरणावरून विरोधकांचे वाभाडे काढले. राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या राजीनाम्याची मागमी करणारे विरोधक जेवढ्या नैतिकतेची अपेक्षा आमच्याकडून करतात तेवढी नैतिकता विरोधकांनी सत्तेत असाताना पाळली होती का? विरोधकांनी आधी स्वत:ला आरक्षात पाहावे, अशी टीका अमोल कोल्हे यांनी केली.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र

‘प्यार किया तो डरना क्या?’, अब्दुल सत्तार धनंजय मुंडेच्या बाजुने

जालना – राज्याचे सामाजिक न्यामंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप झाल्याने विरोधकांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. त्यातच, शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी ‘प्यार किया तो डरना...
Read More
post-image
महाराष्ट्र

मुंबईतील सुरु असलेल्या व प्रस्तावित प्रकल्पांचा पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतला आढावा

मुंबई – पर्यावरण तथा वातावरणीय बदल, पर्यटन, राजशिष्टाचार मंत्री तसेच मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या वांद्रे कुर्ला संकूल...
Read More
post-image
देश

विशेष विवाह कायद्यात ३० दिवसांच्या पूर्व नोटीसीची गरज नाही, हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

अलाहाबाद  – विशेष विवाह कायद्यामध्ये अलाहाबाद हायकोर्टाने सर्वात मोठी सुधारणा केली आहे. कोर्टाने यासंदर्भात आदेश देताना विशेष विवाह कायद्यांतर्गत लग्न करणाऱ्या दाम्पत्याला ३० दिवसांच्या पूर्व...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

केंद्र शासनाच्या सूचनेनुसार जिल्हानिहाय लस वितरण – आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई – राज्यात कोरोना लसीकरणासाठी केंद्र शासनाकडून लस पुरवठा करण्यात आला असून त्यांच्या निर्देशनुसार सर्व जिल्ह्यांना लस वाटप केले जात आहे. दरम्यान केंद्र शासनाने...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन महाराष्ट्र

सोनू सूदच्या अवैध बांधकामप्रकरणी हायकोर्टानं राखून ठेवला निकाल

मुंबई – अभिनेता सोनू सुदला मुंबई महापालिकेने नोटीस बजावली आहे. अवैध बांधकामप्रकरणी त्याला नोटीस बजावण्यात आली. त्यामुळे त्याने याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली...
Read More