केंद्राकडून महाराष्ट्रातील जनतेच्या जीवाशी खेळ सुरु आहे – संजय राऊत – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

केंद्राकडून महाराष्ट्रातील जनतेच्या जीवाशी खेळ सुरु आहे – संजय राऊत

मुंबई – महाराष्ट्राची लक्तरं निघाली असल्याची टीका केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली होती. त्यावर प्रत्युत्तर देताना संजय राऊतांनी जावडेकरांवर निशाणा साधला आहे. जावडेकर हे फक्त पत्रकार परिषदा घेतात आणि आपल्याच राज्याच्या सरकारवर टीका करतात. हे आपल्या पुणेकर जावडेकरांना शोभा देत नाही, अशा शब्दात राऊतांना जावडेकरांना प्रत्युत्तर दिलंय. तसेच,  कोरोना विषाणूच्या संसर्गाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडे यांनाही संजय राऊतांनी खोचक टोला लगावलाय.

प्रकाश जावडेकर यांनी महाविकास आघाडी सरकारचा महावसुली आघाडी सरकार असा उल्लेख केलाय. त्यावर लोक मोदींच्या सरकारलाही अनेक शब्दप्रयोग वापरतात. त्यात फेकू सरकार असाही एक शब्दप्रयोग आहे. मग मोदी सरकार फेकू सरकार आहे का? असा प्रश्न संजय राऊतांनी विचारलाय. लसीच्या बाबतीत केंद्र सरकार आणि भाजपकडून अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय. भाजपशासित राज्यांना लसीचा पुरवठा गरजेपेक्षा जास्त होतो. तर महाराष्ट्र सरकारच्या मागणीला केराची टोपली दाखवली जातेय. केंद्राकडून महाराष्ट्रातील जनतेच्या जीवाशी खेळ सुरु आहे. याचं उत्तर केंद्रात बसलेल्या महाराष्ट्राच्या जावडेकरांनी द्यावं. जावडेकरांना काही माहिती नाही. जावडेकर हे फक्त पत्रकार परिषदा घेतात आणि आपल्याच राज्याच्या सरकारवर टीका करतात. हे आपल्या पुणेकर जावडेकरांना शोभा देत नाही, अशा शब्दात राऊतांना जावडेकरांना प्रत्युत्तर दिलंय.

“कोणत्या शहाण्याने हा मास्क लावण्याचा सिद्धांत काढला आहे. काही गरज नाही मास्क लावण्याची, हा सगळा मूर्खपणा आहे”, असं संभाजी भिडे म्हणाले. हा मूर्खपणा सुरु आहे. कोरोना हा रोगच नाहीय. हा गां* वृत्तीच्या लोकांना होणारा रोग आहे, असं वादग्रस्त वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलं आहे. त्यावर बोलताना संजय राऊत यांनी संभाजी भिडेंना टोला लगावलाय. संभाजी भिडे हे विद्वान आहे. ते ज्या विचारांचे आहेत. त्या विचाराच्या पक्षातील केंद्र आणि राज्यातील अनेक नेते, मंत्र्यांना कोरोना झाला. त्यामुळे संभाजी भिडे जे बोललात ते तथ्य असेलही, असा टोला राऊतांनी लगावला आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

केंद्राकडून महाराष्ट्रातील जनतेच्या जीवाशी खेळ सुरु आहे – संजय राऊत

मुंबई – महाराष्ट्राची लक्तरं निघाली असल्याची टीका केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली होती. त्यावर प्रत्युत्तर देताना संजय राऊतांनी जावडेकरांवर निशाणा साधला आहे. जावडेकर हे...
Read More
post-image
महाराष्ट्र

कौमार्य चाचणीत नापास झाल्याने कांजरभाट समाजातील तरुणींता विवाह मोडला

कोल्हापूर – कंजारभाट समाजातील कौमार्य चाचणी परीक्षा अद्यापही सुरूच असून यामुळे दोघींची लग्न मोडल्याचा प्रकार समोर आला आहे. कोल्हापुरातील कंजारभाट समाजातील दोन तरुणींचा विवाह बेळगावमधील...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश महाराष्ट्र

‘लसींचा पुरवठा लोकसंख्येच्या आधारावर नाही, तर राज्यांच्या लसीकरणातील कामगिरीच्या आधारावर’

मुंबई – महाराष्ट्रात कोरोना लसीचा तुटवडा जाणवत असून काही ठिकाणी लसीकरण बंद करण्यात आल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. त्यातच, केंद्र सरकार महाराष्ट्रासोबत दुजाभाव करत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

अनिल देशमुख आणि ठाकरे सरकारला सुप्रीम कोर्टाचा धक्का, सीबीआय चौकशीविरोधातील याचिका फेटाळल्या

मुंबई – राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सीबीआय चौकशीला मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी दिली होती. याविरोधात अनिल देशमुख आणि राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयाचे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

राज्यात पुन्हा लोकल प्रवासावर निर्बंध येण्याची शक्यता, वडेट्टीवारांची माहिती

मुंबई – राज्यात कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होतेय. त्यात देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत तर दिवसाला १० हजारांपेक्षा जास्त रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे कोरोनाच...
Read More