सीमाभागातील नागरिक पिढ्यानपिढ्या यातना सहन करत आलेत- शरद पवार – eNavakal
महाराष्ट्र

सीमाभागातील नागरिक पिढ्यानपिढ्या यातना सहन करत आलेत- शरद पवार

मुंबई – बेळगाव, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे” ही संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील मागणी अजूनही अपूर्ण असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यासह राजकीय नेत्यांनी कर्नाटकव्याप्त सीमाभागातील मराठी भाषिकांना न्याय देण्यावर आज जोर दिला. निमित्त होतं, ‘महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद: संघर्ष आणि संकल्प’ या पुस्तकाच्या प्रकाशनाचं. यावेळी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनीही भूमिका मांडली.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सीमाभागातील नागरिकांच्या लढ्याचे वर्णन करुन वर्षानुवर्षे शेतकरी, विद्यार्थी, तरुण, वृद्ध आदी सर्वच घटकांनी हा लढा चालू ठेवला असं सुरूवातील नमूद केलं. पवार म्हणाले, “सीमाभागात ‘महाराष्ट्र एकीकरण समिती’ची स्थापना करुन सत्याग्रहाची भूमिका घेतली. यासाठी अनेकांनी यातना भोगल्या. तथापि, सीमाभागातील नागरिक या सगळ्या यातना पिढ्यानपिढ्या सहन करत आहेत,” अशी हळहळ त्यांनी यावेळी व्यक्त केली.

महाजन आयोगाची स्थापना, मधु मंगेश कर्णिक यांच्यासह सीमाप्रश्नातील न्यायालयीन प्रकरणासाठी पुरावे जमा करण्यासाठी केलेले प्रयत्न, महाराष्ट्र एकीकरण समितीची स्थापना तसेच सत्याग्रह, त्यात राजकीय नेतृत्त्वाने भोगलेला तुरुंगवास आदींचा उल्लेख करत शरद पवार म्हणाले, “सर्वोच्च न्यायालयातील लढा हे सीमावादातील शेवटचे शस्त्र असून, आता आपण अंतिम पर्वाच्या दिशेने आहोत. तेथे राज्याची भूमिका ठामपणे मांडावी लागेल आणि त्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे हे स्वत: लक्ष घालत आहेत,” असं पवार यांनी सांगितलं.

“महाराष्ट्राने सातत्याने सीमाभागातील नागरिकांना पाठिंबा दिला. एस एम जोशी यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र एकीकरण समितीची नेमणूक झाली. बाळासाहेब ठाकरे, प्राध्यापक एम. जे. पाटील असे अनेक सहकारी यामध्ये सामील झाले. सत्याग्रहाचं हत्यार पुन्हा एकदा करावं, अशी भूमिका घेतली गेली. पहिला सत्याग्रह मी करावा, नंतर सेनेच्या वतीन छगन भुजबळ यांनी करावा, असं समितीने सांगितलं. त्यानंतर सत्याग्रहांची मालिका सुरुच राहिली. या सगळ्या सत्याग्रहाच्या प्रसंगी तिथल्या प्रचलित सरकारची भूमिका अत्यंत चमत्कारिक अशा प्रकारची होती. मला फार त्रास दिला नाही. एक दिवस कुठेतरी ठेवलं. पण छगन भुजबळ यांच्यावर फार वेगळं प्रेम दाखवलं. भुजबळ वेशांतर करुन तिथे गेले. नटसम्राटमध्ये कुणी काम करतंय की काय अशा पद्धतीने वेशांतर करुन ते गेले. पण शेवटी एका सरकारी अधिकाऱ्याने त्यांना ओळखलं. तुम्ही फसवणूक करण्याचा आमचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप ठेवून त्यांना काही महिन्यांसाठी डांबून ठेवलं. असे अनेकांना त्या संबंध कालखंडात यातना सहन कराव्या लागल्या,” अशा आठवणी यावेळी पवारांनी सांगितल्या.

 

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र मुंबई

छातीपासून बेंबीपर्यंत जोडलेल्या होत्या १४ दिवसांच्या जुळ्या मुली, वाडिया रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया

मुंबई – परेल येथील बाई जेरबाई वाडिया हॉस्पीटलमध्ये जन्माला आलेल्या जुळ्या मुली छातीपासून ते बेंबीपर्यत जोडलेल्या होत्या. त्यांना वेगळे करण्यासाठी डॉक्टरांच्या विशेष टीमला तब्बल...
Read More
post-image
महाराष्ट्र

सीमाभागातील नागरिक पिढ्यानपिढ्या यातना सहन करत आलेत- शरद पवार

मुंबई – बेळगाव, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे” ही संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील मागणी अजूनही अपूर्ण असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यासह राजकीय नेत्यांनी कर्नाटकव्याप्त...
Read More
post-image
महाराष्ट्र मुंबई

भांडण झाल्याने प्रियकराने प्रेयसी समोरच मारली खाडीत उडी

नवी मुंबई – नवी मुंबईतील वाशी खाडीपुलावर काल रात्री 10 वाजेच्या सुमारास रवी रेड्डी या तरुणाने भांडण झाल्याने प्रेयसी समोरच वाशीच्या खाडीपुलावरून उडी मारली....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा देश

सौरव गांगुली पुन्हा रुग्णालयात दाखल

कोलकाता – बीबीसीआयचे अध्यक्ष आणि टीम इंडियाचे माजी क्रिकेट कर्णधार सौरव गांगुली यांची तब्येत पुन्हा बिघडली आहे. सौरव गांगुली यांच्या आज अचानक छातीत दुखू...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

कर्नाटकव्याप्त भूभाग महाराष्ट्रात आणणारच, मुख्यमंत्र्यांची ग्वाही

मुंबई – कर्नाटकव्याप्त भूभाग महाराष्ट्रात आणणारच असा निर्धार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. “मला आता नुसत्या रडकथा नकोत, तर जिंकण्याच्या दृष्टीने प्रत्येक पाऊल...
Read More