सुरक्षित डेटा ट्रान्सफरसाठी मराठमोळ्या तरुणाने बनवले SENDit अ‍ॅप, फिचर्स आहेत जबरदस्त – eNavakal
ट्रेंडिंग तंत्रज्ञान

सुरक्षित डेटा ट्रान्सफरसाठी मराठमोळ्या तरुणाने बनवले SENDit अ‍ॅप, फिचर्स आहेत जबरदस्त

भारत सरकारने सुरक्षिततेच्या कारणात्सव चीनच्या ५९ अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे. टीकटॉकसह अनेक महत्त्वाचे अ‍ॅप भारतातून बंद झाल्याने या अ‍ॅपला पर्याय शोधला जात आहे. त्यातच डेटा ट्रान्सफरसाठी प्रसिद्ध असलेला शेअर इट अ‍ॅपही हटवण्यात आलाय. मात्र त्याला पर्याय म्हणून आपल्या मराठमोळ्या तरुणाने सेंड इट हा अ‍ॅप (Send It App) तयार केलाय. भारतीय बनावटीचा (Made In India) हा अ‍ॅप पूर्णत: सुरक्षित असून डेटा ट्रान्सफर करताना अ‍ॅप युजरची कोणतीच माहिती इतरांपर्यंत जाणार नाही असा दावा या अ‍ॅपचा डेव्हलोपर तेजस तायडे याने केला आहे. तेजसने बनवलेला हा अ‍ॅप Vocal For Local चं एक उत्तम उदारहण ठरू शकेल.

वाचा – मुंबईच्या रस्त्यांवर ‘डिलिव्हरी गर्ल’ची चलती, महिलांना रोजगार मिळण्याकरता तरुणीचा उपक्रम

तेजस तायडे हा तरुण गेल्या ६ महिन्यांपासून एका जाहिरात कंपनीत काम करत होता. तेव्हापासूनच त्याच्या डोक्यात अ‍ॅप डेव्हलोपिंगचे विचार यायला लागले. आपल्याकडे सुरक्षित असे डेटा ट्रान्सफरचे अ‍ॅप नसल्याचं त्याच्या लक्षात आल्याने त्याने भारतीय बनावटीचा अ‍ॅप तयार करण्यासाठी  प्रयत्न सुरू केले. युएसमधील एक कंपनी अशा अ‍ॅपचे स्ट्रक्चर तयार करून देते. त्यामुळे त्यांनी अ‍ॅपचं स्ट्रक्चर तयार करण्यासाठी थेट युएसमध्ये संपर्क साधला. तिथून या अ‍ॅपचं स्ट्रक्चर तयार झाल्यानंतर त्या अ‍ॅपची उर्वरित कामे तेजस आणि त्याच्या काही मित्रांनी पार पाडली. या अ‍ॅपचं स्ट्रक्चर जरी युएस कंपनीने तयार केलं असलं तरीही हे अ‍ॅप कार्य कसं करेल यावर या तरुणांनी मेहनत घेतली आहे. गेल्या ३ महिन्यांपासून हे अ‍ॅप तयार करण्यात येत होतं. अखेर हे अ‍ॅप  १२ जुलै रोजी लॉन्च करण्यात आलं आहे.

वाचा – घरातच उघडले केक शॉप, लॉकडाऊनमध्ये तरुणींना मिळाला नवा रोजगार

खरंतर हे अ‍ॅप १५ जून रोजी लॉन्च करण्यात आलं होतं. मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे या अ‍ॅपची प्रसिद्धी करण्यात आली नाही. मात्र तांत्रिक अडचण दूर केल्यानंतर १२ जुलै रोजी या अ‍ॅपचं २.० वर्जन पुन्हा लॉन्च करण्यात आलं. येत्या काही दिवसांत या अ‍ॅपचं २.१ वर्जनही लॉन्च करण्यात येणार असल्याचं तेजसने सांगितलं. महत्त्वाचं म्हणजे या अ‍ॅपचे कोणतंही मार्केटिंग न करता १२ तासांच्या आत १०० पेक्षा जास्त लोकांनी डाऊनलोड केलं आहे.

या अ‍ॅपचं वैशिष्ट्य काय? (Features Of SENDit)

डेटा ट्रान्सफर करताना सर्वाधिक धोका असतो तो डेटा चोरीला जाण्याचा. वायफायच्या माध्यमातून फाईल ट्रान्सफर करताना त्यावर तिसऱ्याची नजरही असू शकते. त्यामुळे सेंड इट अ‍ॅपच्या माध्यमातून डेटा शेअर होत असताना तो डेटा इनक्रिप्ट केला जातो जेणेकरून डेटो इतर कोणीही चोरू शकणार नाही. हा डेटा समोरच्या  मोबाईलमध्ये पोहोचल्यानंतर तो डिक्रिप्ट होतो. तसेच, या अ‍ॅपचा वापर तुम्ही हॉटस्पॉट वापरत असतानाही करू शकता. शिवाय या अ‍ॅपच्या २.१ वर्जनमध्येही अनेक नवे फिचर्स पाहायला मिळतील असंही तेजसने सांगितलं.

वाचा – चित्रिकरणाला सुरुवात, तरुणाने सुरू केलेल्या ‘या’ नव्या व्यवसायामुळे ७०हून अधिकांना मिळाला रोजगार

फुड डिलिव्हरी अ‍ॅपही आणणार

आजघडीला अनेक फुड डिलिव्हरी अ‍ॅप उपलब्ध आहेत. मात्र स्थानिक पातळीवरील हॉेटेलचालकांना सोयीचं व्हावं या हेतुने तेजस आता फुड डिलिव्हरीचं अ‍ॅपही तयार करण्याच्या विचारात आहे.

 

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

एअर इंडियाच्या विमानाला केरळमध्ये अपघात, विमानाचे दोन तुकडे

कोझीकोड – केरळमधील एअर इंडियाचं विमान लँडिंग करताना अपघात घडला आहे. लँडींग होत असताना धावपट्टीवरून विमान घसरलं. या विमानात १९१ प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते. दुबईहून...
Read More
post-image
मनोरंजन

सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात चर्चेत आलेली श्रुती मोदी नक्की कोण?

मुंबई – सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी रोज नवनव्या लोकांची नावे समोर येत आहेत. त्यातच काल सीबीआयने सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय. त्यात श्रुती मोदी सध्या बरीच...
Read More
post-image
महाराष्ट्र

तंत्रशिक्षण प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया १० ऑगस्टपासून

मुंबई – शैक्षणिक वर्ष २०२०-२१ करिता तंत्रशिक्षण (पॉलिटेक्निक ) प्रथम वर्ष  पदविका अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया १० ते २५ ऑगस्ट २०२० या कालावधीत राबविण्यात येणार आहे....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा देश विदेश

गुड न्यूज! भारतात २०२१ साली विश्वचषक होणार

मुंबई – भारतामध्ये होणारा विश्वचषक वेळेनुसार २०२१ साली होणार आहे. आज झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत याबाबत चर्चा करण्यात आली. आयसीसीने काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियामधील ट्वेन्टी-२० विश्वचषक...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या कोरोना महाराष्ट्र मुंबई

आज राज्यात 10 हजारपेक्षा जास्त रुग्णांची नोंद, तर 300 मृत्यू

मुंबई – राज्यात आज नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची थोडी अधिक असून आजदेखील १० हजार ९०६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर १०...
Read More