#SayNoToDrugs मुंबई पोलिसांचा युथला ‘रियालिटी चेक’ – eNavakal
मुंबई

#SayNoToDrugs मुंबई पोलिसांचा युथला ‘रियालिटी चेक’

मुंबई – आपल्या कर्तव्यदक्षतेसाठी मुंबई पोलीस जगभरात ओळखले जातात. ऑन फिल्डवर तत्पर असणारे मुंबई पोलीस सोशल मीडियावरही अॅक्टीव्ह असल्याचे पाहायला मिळत आहेत. नुकतेच त्यांनी अंमली पदार्थांपासून दूर राहण्याचा संदेश देणारा ट्विट मुंबई पोलिसांनी केला आहे. या मिम्सचा आधार घेत अंमली पदार्थाच्या आहारी गेलेल्या तरुणाईला योग्य दिशा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ड्रग्सचे सेवन केल्याने तुम्हाला काय वाटते पण ड्रग्सचे सेवन केल्याने तुम्हाला खरचं काय मिळते, याचा रियालिटी चेक फोटोद्वारे जनजागृती मुंबई पोलीसांनी युथला दिला आहे.

रोज अनेक हॅशटॅगही ट्रेन्ड होतात. अशा ट्रेन्डींग हॅशटॅगचा ट्विटमध्ये वापर करून मुंबई पोलीस नेहमी सामजिक संदेश देण्याचा प्रयत्न करत आहेत. काहीच दिवसांपूर्वी ‘घर से निकलते ही’ नावाचा हॅशटॅग वापरून घरातून बाहेर पडल्यानंतर तुमचा प्रवास जवळचा असेल वा दूरचा, पण हेल्मेट वापरा… अशा आशयाचा संदेश देत मुंबई पोलिसांनी दोन फोटोही शेअर केलेले. आज मुंबई पोलिसांनी ‘से नो टू ड्रग्स’ हॅशटॅग वापरून अंमली पदार्थांमुळे होणारे दुष्परिणाम सांगणारा फोटो शेअर केला आहे. ड्रग्सच्या सेवनामुळे काही वेळापुरती गुंगी येते, मेंदूला उत्तेजना मिळाल्याचा आभास होतो. मात्र ड्रग्स सेवनाने अनेकांचे जीवन उद्ध्वस्त होते याचा विचारच केला जात नाही, अशा आशयाचे फोटो शेअर केले आहे.

समाजमाध्यमांचे वाढते महत्त्व आणि आवाका लक्षात घेऊन मुंबई पोलिसांचेही ट्विटर हँडल सुरू करण्यात आले आहे. उल्लेखनीय म्हणजे मुंबई पोलिसांच्या ट्विटर हॅन्डलची लोकप्रियता वेगानं वाढताना दिसतेय. गेल्या काही काळापासून या ट्विटर हॅन्डलच्या फोलोअर्सची संख्याही वाढलीय.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

वंचित आघाडीने अशोक चव्हाण व सुशीलकुमार शिंदेंना हरविले

मुंबई – महाराष्ट्राचे दोन माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी केला. अशोक चव्हाण यांचा पराभव ‘वंचित’च्या यशपाल...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

बंद कर रे टीव्ही!

मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोल्हापूर, सातारा, सांगली, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर, मुंबई अशी जिथे जिथे भाषणे घेतली तेथील काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार पडले. याचा...
Read More
post-image
क्रीडा विदेश

#FrenchOpen फ्रेंच स्पर्धेत जोकोविचला नादाल, फेडररकडून धोका

पॅरिस – येत्या रविवारपासून सुरू होत असलेल्या यंदाच्या वर्षातील दुसर्‍या फ्रेंच ग्रँडस्लॅम अजिंक्यपद स्पर्धेत माजी विजेत्या नोवाक जोकोविचला नादाल-फेडररकडून धोका संभवतो. ही स्पर्धा दुसर्‍यांदा...
Read More
post-image
लेख

वृत्तविहार : जनतेचे ‘अभिनंदन’ करा  

पुढचा किमान महिनाभर लोकसभा निवडणुकीचे कवित्व चालू राहील. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि नेते हा विजय एकट्या मोदींमुळे कसा मिळाला आणि काँग्रेसचे नेतृत्व कसे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

हा जनतेचा आणि लोकशाहीचा विजय आहे! पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली – आज लोकसभा निवडणूक २०१९चे निकाल जाहीर झाले. भाजपाने या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयानंतर भाजपा मुख्यालयात जल्लोष करण्यात आला. पंतप्रधान...
Read More