डॉक्टरांविषयी आदरच आहे, अपमान आणि कोट्यांमधला फरक समजून घ्या – संजय राऊत – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

डॉक्टरांविषयी आदरच आहे, अपमान आणि कोट्यांमधला फरक समजून घ्या – संजय राऊत

मुंबई – जागतिक आरोग्य संघटनेला काय कळंतय? डॉक्टरांपेक्षा कंपाऊंड हुशार असतात, असे वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी खासदार संजय राऊत गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होते. त्यांच्यावर टीकेची झोड उठल्यानंतर त्यांनी आता नरमाईची भूमिका घेतली असून मला डॉक्टरांबाबत आदरच आहे. डॉक्टरांच्या मदतीला अनेकदा धावून गेलो आहे, असं संजय राऊत बोलले. आज पत्रकार परिषदेत ते पत्रकारांंशी संवाद साधत होते.

कोरोनाच्या काळात शिवसेनेच्या अनेक लोकांनी डॉक्टरांविरोधात आंदोलन केलं. तेव्हा त्यांची मी समजूत काढली. अनेकदा मी डॉक्टरांच्या बाजूने उभं राहिलो आहे. मार्डच्या अनेक संप आणि मागण्यांबाबत मी भक्कमपणे बाजू मांडली आहे. काही विशिष्ट पक्षांचे लोक डॉक्टरांना हाती घेऊन मोहीम चालवत आहेत. माझ्याकडून डॉक्टरांचा अपमान झाला नाही. माझी ती भावनाही नव्हती. अपमान आणि कोट्यांमधला फरक समजून घेतला पाहिजे,” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, पार्थ पवारांविषयी त्यांना प्रश्न विचारला असता पवार कुटुंबीयातील वाद सोडवण्यासाठी शरद पवार सक्षम आहेत, असं राऊत म्हणाले. तसेच, अजित पवार हे महाविकास आघाडीतील एकदम सक्षम नेते आहेत, असंही राऊत म्हणाले.

कंपाऊंडर काही टाकाऊ नसतात. उलट माझं कौतुक केलं पाहिजे. डॉक्टरांनी आपला कंपाऊंडरही ताकदीचा निर्माण केला आहे हे कौतुकास्पद आहे. हे जगात कुठे नाही तर भारतातच आहे. कंपाऊंडरचा सन्मान केला म्हणून इतकं टोकाची भूमिका घेण्याची गरज नाही,” असं संजय राऊत यांनी सांगितलं.

“जागतिक आरोग्य संघटना ही राजकीय संघटना झाली आहे. हे माझंच नाही तर अनेक देशांचं म्हणणं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीरपणे त्यांना फटाकलं आहे. संबंधही तोडले आहेत. कारण तिथे डॉक्टर कमी आणि राजकारणी जास्त झाले आहेत. कोरोनाचा फैलाव होण्यासाठी जागतिक आरोग्य संघटना जबाबदार असल्याचं अनेक देशांनी म्हटलं आहे. येथील डॉक्टरांना ते विधान गांभीर्याचं घेण्याची गरज नाही,” असं संजय राऊत यांनी सांगितलं आहे.

“रशियानेसुद्धा जागतिक आरोग्य संघटनेविरोधात विधानं केली आहेत. पण मग तुम्ही ट्रम्प आणि रशियाचाही निषेध करणार का ? ट्रम्प यांच्या वक्तव्यामुळे अमेरिकेतील डॉक्टर संपावर गेलेते का ? पुतीन यांनी जागतिक आरोग्य संघटनेला न विचारता लस बाजारात आणली म्हणून तेथील डॉक्टर आंदोलन करत आहेत का ? आज प्रत्येक देश आणि राज्य आपापली परिस्थिती हाताळत आहे,” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

“मला कोणीतरी क्लिप पाठवली. नरेंद्र मोदींनी लंडनला जाऊन डॉक्टरांचा अपमान केला होता. आमच्याकडील डॉक्टर कसे व्यापारी आहेत आणि त्यांना रुग्णसेवेत रस नसून औषधं विकण्यात आणि पैसै कमावण्यात कसा रस आहे आहे यासंबंधी हे विधान आहे. लंडन येथील डॉक्टरांनी त्यांचा निषेध केला होता, येथील नाही. त्यावेळी येथील संघटनांनी आक्षेप घेतला नाही,” अशी विचारणा संजय राऊत यांनी केली आहे.

“जर कोणाचा गैरसमज झाला असेल तर तो दूर करावा. मी त्यांच्याशी बोलायला तयार आहे. माफी मागण्याआधी मी काय बोललो ते समजून घ्या. मी अपमानच केलेला नाही. माझी भूमिका जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रश्नावर होती. बोलण्याच्या ओघात एक शब्द येतो आणि त्यावर अशा पद्धतीने राजकारण होत आहे. हे होऊ नये असं मला वाटतं,” असं संजय राऊत यांनी म्हटलं.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र

दिल्लीत गणपती आणि मोहरमच्या मिरवणुकांवर कोरोनामुळे बंदी

नवी दिल्ली – कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत यावेळी दिल्लीत मोहरमच्या मिरवणुका आणि गणेश आगमन मिरवणुकांवर बंदी घालण्यात आली आहे....
Read More
post-image
देश

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी अद्यापही व्हेटिंलेटरवरच

नवी दिल्ली – भारताचे माजी राष्ट्रपती यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना अद्यापही व्हेन्टिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. त्यांच्यावर दिल्लीतल्या आर्मी हॉस्पीटलमध्ये...
Read More
post-image
देश विदेश

राजकीय पक्ष आणि राजकारण न पाहता आम्ही काम करतो, फेसबुकचं स्पष्टीकरण

न्यूयॉर्क – भारतात फेसबूक आणि व्हॉट्सअॅपवर भारतीय जनता पक्षाचं नियंत्रण आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला होता. द वॉल स्ट्रीट जर्नलमध्ये छापून आलेल्या...
Read More
post-image
देश

दिल्लीत संसद इमारतीच्या सहाव्या मजल्यावर आग

नवी दिल्ली – संसदेच्या अ‍ॅनेक्सी इमारतीत आज सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. आगीच्या माहितीनंतर तात्काळ अग्निशामक दलाच्या ७ गाड्या घटनास्थळी रवाना...
Read More
post-image
देश

धक्कादायक! मुलांनी वडिलांचा मृतदेह सायकलवरुन स्मशनात नेला

बेळगाव – वडिलांचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी स्मशानात नेण्यासाठी रुग्णवाहिका किंवा इतर कोणतेही वाहन न मिळाल्याने मुलांनी मृतदेह थेट सायकलवरुन स्मशानभूमीत नेला. ही घटना बेळगाव जिल्ह्यातील...
Read More