मुंबई – माजी क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर याने कोरोनावर मात केली असून त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्याला २७ मार्च रोजी कोरोनाची लागण झाली होती, त्यानंतर अधिक त्रास जाणवू लागल्याने २ एप्रिल रोजी रुग्णालयात दाखल झाला होता. त्यानंतर आज त्याला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. यासंदर्भात त्याने ट्विटरवरून माहिती दिली.
सचिन तेंडुलकरनं ट्विट करत थोड्यावेळापूर्वी रुग्णालयातून घरी परतलो. सध्या विलगीकरणात आराम करत आहे. सर्व चाहत्यांनी केलेल्या प्रार्थनेसाठी त्यांचे आभार मानतो. रुग्णालयातील सर्व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे आभार मानतो, असं सचिन तेंडुलकर यांनं म्हटलं आहे.
— Sachin Tendulkar (@sachin_rt) April 8, 2021