पंतप्रधानांसोबत ‘ही’ मंडळीही असणार राम मंदिराच्या भूमिपूजनाला – eNavakal
देश

पंतप्रधानांसोबत ‘ही’ मंडळीही असणार राम मंदिराच्या भूमिपूजनाला

अयोध्या – अयोध्येतील राम मंदिराचे भूमिपूजन ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर सरसंघचालक मोहन भागवत आणि भाजपा नेत्या उमा भारती, अवधेशानंद सरस्वती, साध्वी ऋतंभरा, रामभद्राचार्य, इकबाल अन्सारी, कल्याण सिंह, विनय कटियार यांनादेखील भूमिपूजनासाठी निमंत्रण देण्यात आलं आहे. आजतकनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

भूमिपूजनाचा कालावधी अल्प राहिला असल्याने तिथे जय्यत तयारी सुरू आहे. त्यातच, या भूमिपूजनाला कोणकोण उपस्थित राहणार आहेत, याबाबत चर्चा रंगल्या आहेत. पंतप्रधान उपस्थित राहणार असले तरीही इतर राज्यातील मुख्यमंत्री, नेते उपस्थित राहणार का प्रश्न आहे. तसेच, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि गृहमंत्री अमित शाह हे भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. परंतु आता ते येणार नसल्याचं म्हटलं जात आहे. तर वयापरत्वे आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी आणि मुरली मनोहर जोशी हेदेखील अयोध्येत येण्याची शक्यता नसल्याचं सांगण्यात येत आहे.परंतु सर्व धर्मांच्या प्रतिनिधींना मात्र या भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी निमंत्रण देण्यात आलं आहे.

२२ किलो ६०० ग्रॅम वजनाची चांदीची वीट ठेवून राम मंदिराचा पाया रचला जाणार आहे. या वीटेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नावही लिहिण्यात आलं आहे. तसंच जय श्रीराम असंही लिहिण्यात आलं आहे. एवढंच नाहीतर या विटेवर राम मंदिराच्या भूमिपूजनाचा मुहूर्तही लिहिण्यात आला आहे. एवढंच नाही तर भूमिपूजन करण्यासाठी देशातल्या पवित्र नद्यांचं पाणीही आणलं जाणार आहे. तसंच पवित्र मातीही आणली जाणार आहे. त्यासंबंधीची तयारी सुरु करण्यात आली असल्याचं नवभारत टाईम्सनं दिलेल्या वृत्तात म्हटलं होतं.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र

राज्य सरकारचा काजू उद्योगाला दिलासा; काजू व्यावसायिकांना राज्य जीएसटीची शंभर टक्के प्रतिपूर्ती

मुंबई – काजू व्यावसायिकांना चालू आर्थिक वर्षापासून राज्य वस्तू आणि सेवा कराच्या (स्टेट जीएसटी) रकमेची शंभर टक्के प्रतिपूर्ती करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार...
Read More
post-image
महाराष्ट्र

पार्थ पवार शरद पवारांच्या भेटीसाठी सिल्वर ओक येथे दाखल

मुंबई – पार्थ पवार अपरिपक्व आहेत, असं शरद पवारांनी वक्तव्य केल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. पार्थ पवार आता वेगळा राजकीय स्टॅण्ड घेणार...
Read More
post-image
महाराष्ट्र

एमपीएससीची परीक्षा आता राज्यातील सर्व विभागीय केंद्रावर होणार

मुंबई – महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची 20 सप्टेंबरला होणारी विविध पदांसाठीची भरती परीक्षा, आता फक्त मुंबई आणि पुणे येथे न होता, राज्यातील सर्व विभागीय...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या कोरोना महाराष्ट्र मुंबई

राज्यात आज ११ हजारपेक्षा जास्त रुग्णांची नोंद, तर ९ हजारपेक्षा जास्त रुग्णांना डिस्चार्ज

मुंबई – राज्यात आज 11 हजार 813 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली असून एकूण संख्या आता 560126 पोहोचली आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे...
Read More
post-image
महाराष्ट्र

कल्याण डोंबिवलीत ३३० नवे रुग्ण तर ९ जणांचा मृत्यू

कल्याण – कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात  आज ३३० नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ९ जणांचा मृत्यू झाला असून ३०९ जणांना गेल्या २४ तासांत डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजच्या या ३३० रूग्णांमुळे पालिका...
Read More